आम्ही साहित्याचे वाहक

On Marathi Literature

आम्ही साहित्याचे वाहक...
वृत्त.. छंद..नी अलंकार..
आमुचे सारथी...
शब्द भावना अबोल प्रीती
मन्मनीच्या गाभाऱ्यातूनी
कोऱ्या पानावरी उमटती...
कथा कादंबरी कविता
जणू साहित्याचे गर्भ...
चारोळ्या हायकू अग्रलेख
जाणती आयुष्याचे मर्म...
मनामनाला या आमुच्या
लेखणीचा छंद...
श्वासांशी या बांधला गेलाय
शब्दांचा अनुबंध...
याच अनुबंधातूनी दरवळतो
आमुच्या साहित्याचा सुगंध...!!

कु.हर्षदा नंदकुमार पिंपळे