Login

ओठ

Your Lips Beutiful
फिकट गुलाबी ओठांवर
लिपस्टिक चा एक थर
तरीही तीळ उठावदार
खरी ओठांची बहार

विलग होतात ओठ
मग हास्य सुमधुर
भाळलो मी कुमार
अर्पिली त्यांस जीव्हार

त्या ओठांच्या अवतीभवती
घुटमळतात कित्येक स्वर
परि ओठांवर जे स्वार
तेच खरे बहारदार

करतो कविता त्या ओठांवर
नित्य नव्या दर्जेदार
कवितांचा मज आधार
स्वप्नातच त्या ओठांचा दिदार

...... योगिता मिलिंद नाखरे