❤️लिमिटलेस लव्ह ❤️ #3

A Love Story

मी काय करत होतो नेमक ? स्वतःच्या आयुष्याशी खेळ करत होतो की विभाच्या ???...मार्टिन जे बोलत होता ते कितीही पोटतिडकीने बोलत होता ...पण मला काय झालंय ? नाही.....रेवा...मी फक्त तुझाच आहे...! मी मनाशीच बोललो.... अन् एक दीर्घ श्वास घेतला...

अन्  पुढचा जास्त विचार न करता तसाच पडून राहीलो ...

अचानक माझ्या डोळ्यासमोर ती दृश्ये येऊ लागली... रेवाची आणि माझी पहिली भेट ...आमची कहाणी त्या गाण्याच्या ओळींवर रचली गेली असावी..सगळीच सारखी नसली तरी त्या ओळींना स्पर्श करणारी नक्कीच होती..

मैने जब देखा था तुझको

रात भी वो याद है मुझको

तारे गिनते गिनते सो गया

दिल मेरा धड़का था कस्स के

कुछ कहा था तूने हस्स के

मैं उसी पल तेरा हो गया

आंख उठी मोहब्बत ने अंगड़ाई ली

दिल का सौदा हुआ चाँदनी रात में

ओह तेरी नज़रों ने कुछ ऐसा जादू किया

लूट गये हम तो पहली मुलाक़ात में

तीच रात्र...मी एम एस सी करत होतो ...मी आणि मार्टिन एकाच बॉइज् होस्टेल मध्ये राहत होतो ... नेहमीप्रमाणे आम्ही संध्याकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलो होतो .. स्वेटर च्या खिशात हात घालून आम्ही तितकी ऊब निर्माण करण्याचा प्रयत्न करत होतो ...आमच्या समोरच काही अंतरावर गर्ल्स हॉस्टेल होतं ...आम्हाला तिथे जाण्याची परवानगी नव्हती ...बाहेर काही मुली कायम गप्पा करत बसलेल्या दिसायच्या .. पण मला आणि मार्टिन ला इतर मुलांसारखा त्यांना न्याहाळत बसायचा नाद नव्हता ..आम्ही आमच्या केमिस्ट्री विषयाशी संबंधित गप्पा करत चाललो होतो..अचानक गर्ल्स हॉस्टेल मधून मोठा ओरडा ऐकू येऊ लागला ... आम्ही दोघांनी चमकून एकमेकांकडे पाहिलं ...

" यार काहीतरी गडबड आहे... दे नीड अवर हेल्प ...!!" मी बोललो...

" अरे काही नाही रे... या मुलींची नाटक असतात सगळी... काहीतरी झालं की उगाच ओरडायचं ...उद्या एक्झाम आहे,  चला अभ्यास करू !!" मार्टिन बोलला आणि आम्ही मागे फिरून परत हॉस्टेल कडे चाललो ...

" प्लीज हेल्प.....!!!" परत एक किंचाळता आवाज आमच्या कानी पडला ...मग मात्र आम्ही दोघेही धावत तिकडे पोहोचलो...जाऊन पाहतो तर गुंडांच्या एका टोळक्याने वॉचमनला  मारून आत प्रवेश केला होता...आणि ते मुलींना धमकवत होते...त्यांना नको तिथे स्पर्श करत होते ..त्यातल्या त्यात एकाने एका मुलीला पाठमोर पकडलं होतं...ती अक्षरश विव्हळत होती ..

" हीच काय रे ती कॉलेजची ब्युटी क्वीन ???.." तिला पकडलेला तो व्यक्ती भसाड्या आवाजात म्हणाला ...

" हा अमर भाई... तीच...हेच पाखरू हाय ते..!" दुसरा एक म्हणाला...

आम्हाला आता धोक्याची कल्पना आली होती..मी मार्टिन ला एक इशारा केला ...आणि तो हळूच कडेका झाला...लगेच त्याने फोन चालू केला आणि पोलिसांना बातमी कळवली...तो बातमी कळवून हळूच माझ्या जवळ आला....त्या गुंडांचे अनेक मुलींचे छळ करणे सुरू होते ..ती मुलगी त्याच्या पाया पडत होती पण त्याला काही फरक पडत नव्हता...त्याने आपला हात तिच्या छातीवर नेला अन् तिला स्पर्श करणार इतक्यात माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली ... मी वाचमन च्या हातातून पडलेल्या दंडुका उचलला आणि कसलीही पर्वा न करता त्या गुंडांच्या डोक्यात घातला... त्याक्षणी तो कळवळून खाली पडला .....मी पटकन त्या मुलीला बाजूला केले... ती आणि इतर मुली आमच्या दोघांकडे आश्चर्याने व भीतीने पाहत होत्या... त्याच्या इतर साथीदारांनी दुसऱ्या मुलींना सोडून मला घेरले आणि मला मारू लागले...मी आता हातातल्या दंडुक्याने शक्य तितका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत होतो ...पण मला ते वरचढ होऊ लागले....मला ही त्यांचा मार बसू लागला....मार्टिन ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न करीत होता पण ते अनेक जण असल्याने आम्हा दोघांवर भारी पडत होते ....तशाही अवस्थेत मला तिच्या वर नजर टाकावी वाटली.... त्या अंधुक प्रकाशात सुद्धा तिचा गोरापान चेहरा उजळून निघत होता ....पण पाठीत एक जोराची काठी बसल्याने माझी नजर हटवली गेली....मुली घाबरून फक्त पाहत होत्या...तर ती  रडत होती...

मी मार्टिन ला  एक इशारा केला आणि पोलीस येऊ पर्यंत त्यांचा मार खाण्याच ठरवलं... कारण आम्हाला ते मारत राहिले तर पोलीसाना त्यांच्यापर्यंत यायला वेळ मिळणार होता...तो गुंड सुद्धा आपलं डोकं चोळत उठला , आणि त्याने मला आणि मार्टिनला लाथा घालायला सुरुवात केली....ती आली आणि तिने मध्ये पडून आम्हाला वाचवायचा केविलवाणा प्रयत्न केला ....पण त्याने तिलाच बाखोटीला धरले आणि तिला बळजबरी आपल्या जवळ ओढून घेतलं ...बाकीच्या मुली आरडाओरडा करत होत्या...

" ओरडा ओरडा.....अमर भाई आहे मी... कोण कुत्र सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाही .... आणि हे जे दोन कुत्रे आले आहेत त्यांना बघतो मी .... त्या आधी मला एक किस दे ग राणी ...!!" तो राक्षसासारखा दिसणारा अमर बोलला.... काळ्याकुट्ट चेहऱ्याचा तो अंधारात नीट दिसत सुद्धा नव्हता ...ती त्याला प्रतिकार करू पाहत होती, आम्ही दोघे मार खात होतो...हो, मला मुद्दामच मार खायचा होता , पण मला मात्र त्या मुलीचे हाल बघवत नव्हते ...तो तिच्या ओठांच्या अगदी जवळ पोहोचला होता , मी कसतरी पुढे सरकलो आणि त्याला पाठीमागून लाथ घातली ...पण त्या एका लाथेने त्याने फक्त मागे वळून पाहिलं , आणि एक जोरात लाथा घातली मला....

मी अक्षरशः कलवळलो आणि बेशुद्ध पडलो....

नंतर मार्टिनने मला सांगितलं की मी बेशुद्ध पडताक्षणी त्याने अंगात आहे त्या बळाने त्यांना झाडायला सुरुवात केली....पण एकटा तो ,किती मारणार ??? ...त्याला सुद्घा ते मारू लागले....तो काळा अमर वारंवार तिला आपल्या जवळ घेण्याचा प्रयत्न करीत होता पण ती त्याच्या चेहऱ्याला ओरबडत होती , रडत होती....

अचानक हवेत गोळीबार झाला , आणि हँड्स अप असा आवाज आला आणि त्या गुंडांनी मागे पाहिलं, पटापट सगळ्या बाजूंनी पोलीस गोळा झाले होते ...

" भाई पोलीस....!!" त्यातलाच एक ओरडला ..अमर पोलिसांना बघून आधीपेक्षा जास्त चवताळला...आणि त्याने आपल्या कमरेचा पिस्तुल काढून अंदाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली...इतक्यात त्याच्या मागच्या बाजूच्या एका पोलिसाने त्याच्या पायात गोळी मारली ...तसा तो खाली कोसळला...तो पडल्याने त्याचे इतर साथीदार आपल्या हातातल्या काठ्या टाकून पळून चालले होते पण आणखी एकदा फायर करून त्यांना पळून न  जाण्याची सक्त ताकीद देण्यात आली ...त्या सगळ्या गुंडांना अन् अमर ला पकडून पोलीस घेऊन गेले...त्यांनी अँब्युलन्स बोलवून मला आणि अमर ला हॉस्पिटल मध्ये admit केलं....

आणि मी हॉस्पिटलमध्ये काही तासांनी शुद्धीत  आल्यावर माझ्यासमोर ती होती...मी डोळे उघडताच तिने एक मंद स्मित हास्य केलं, माझ्याकडे ला मार्टिन उभा होता ...मी तिलाच विचारलं...

" तू ठीक आहेस ना ???..ते गुंड ....." बोलताना च मी उठण्याचा प्रयत्न केला ..पण तिने मला बळजबरीने खाली झोपायला लावलं...

" मी ठीक आहे....बट आय एम सॉरी... माझ्यामुळे तुम्हाला ....!!!" ती पुढे बोलूच शकली नाही... तिच्या डोळ्यात पाणी भरलं ...

" अरे नो ... जे काही घडलं त्यात तुमची काही चूक नाही...मार्टिन ..काय झालं ? ते गुंड...." मी मार्टिन कडे पाहत म्हणालो...

मार्टिन ने मला झालेली सगळी घटना सांगितली ..आता मला थोडं हायस वाटलं... आणि परत एकदा मी तिच्याकडे नजर वळवली...खरंच, रात्री मी तिला नीट पाहू शकलो नव्हतो , पण ती खूप सुंदर दिसत होती... आपल्या अनिमिष नेत्रांनी ती मला पाहत होती...

त्यानंतर मला हॉस्पिटल मध्ये दोन तीन दिवस राहायला लागलं ...माझ्या एक्साम बुडाल्या...पण माझ्याविषयी आता सगळ्यांना माहिती झाल्यामुळे विद्यापीठाने मी बरा झाल्यावर मला पेपर द्यायची सोय देऊ केली ...मी बोलता बोलता तिला तिचं नाव विचारलं तेव्हा ती म्हणाली..

" रेवा...!! 

रेवा..! किती सुंदर नाव आहे... माझ्या तोंडातून आपसूकच उद्गार बाहेर पडले ...त्यानंतर हॉस्पिटलमध्ये दररोज ती माझ्यासाठी डबा घेऊन यायची .. मी आमच्या घरी काही कळू दिलं नाही ...आणि मार्टिन ला सुद्धा काही सांगू दिलं नाही ..हळूहळू रेवा आणि माझी मैत्री झाली...

रेवा च्या नजरेत मला नेहमी माझ्या विषयी असलेल भाव दिसायचे ... जणू ती काही सांगू पाहत असायची मला अनिमिष नेत्रांनी ... आता आम्ही तिघेजण चांगले मित्र झालो होतो ...मी , मार्टिन आणि रेवा...

एम एस सी सेकंड ईयर मध्ये गेलो .. आता तर माझी आणि रेवाची बॅच सुदैवाने एकच होती ...आणि मार्टिन ही... आता प्रॅक्टिकल करताना माझे आणि रेवाचे स्पर्श वाढले होते..कधी कधी वाटायचं ,आपण तिला मदत केल्याचा फायदा घेतो आहोत का ? मी तिला तसं स्पष्ट बोलून सुद्धा दाखवलं , पण ती फक्त एवढंच बोलली की याने तिला काहीच प्रॉब्लेम नाही ... आणि काही स्पर्श आजकाल आवडू लागलेत ... मला स्वतःला गिल्टी न वाटून घेण्याबाबत सुद्धा बजावलं...मी खुश झालो..याचा अर्थ मी ही तिला आवडत होतो , पण ते सरळ सरळ तसं काही सांगत नव्हती...मुलींना नेहमी घुमुन फिरून सांगण्यातच इंटरेस्ट असतो हे मार्टिन मला नेहमी म्हणायचा ....आता ते खरं निघालं होतं...

आता आमची जवळीक वाढली होती.. खरच मला रेवा खूप आवडू लागली होती... आमच्या कॉलेजमध्ये तिच्या इतके सुंदर कोणीच नव्हतं ...मागच्या वर्षी मी फक्त तिला पहायचो, कारण ती ही एमएससी ला होती.. पण एम एस सी फर्स्ट ईयर .... बीएससी फायनल इयरला चांगले पर्सेंटेज मिळाल्यामुळे मी एम एस्सी ला सुद्धा चांगला स्कोर करण्यासाठी प्रयत्नशील होतो..पण  रेवा विषयी एक अनामिक ओढ होती ..अगदी फर्स्ट इयर मध्ये असल्यापासूनच ...पण त्या गुंडांच्या प्रसंगामुळे सगळं काही ठरवूनच केल्याप्रमाणे घडत गेलं ....

आणखी एक प्रसंग घडला...आम्ही प्रॅक्टकल करत असताना रेवाच्या हातून एक केमिकल खाली पडलं , ते ज्वलनशील होतं , आणि कडेलाच बर्नर होता ..मी वेळ साधून पटकन रेवाला मागे ओढलं ...आम्ही दोघे पडणार इतक्यात मार्टिन ने  आम्हालाच आवरलं आणि पुढे ढकलल...अर्धी लॅब जळून खाक झाली...त्या दिवशी माझ्याविना रेवाची ,आणि मार्टिन शिवाय आमच्या दोघांची काय अवस्था झाली असती याची कल्पना सुद्धा करवत नव्हती...

असे जीवघेणे प्रसंग आम्ही अनुभवले...दोन्ही मध्ये आम्हा दोघांना ही एकमेकांची आयुष्य गमवावी लागत होती..पण आम्ही वाचलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो....

आमचा प्रेम कबुली नामा झाला..रेवा , रेवा आणि रेवा....माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आता  रेवा भरली होती ...मार्टिन आम्हाला प्रायव्हसी मोकळी करून देत होता ....सेकंड year झालं आणि आमच्या मध्ये आम्हाला सुद्धा अनियंत्रित करणारे काही क्षण येऊन गेले ...त्या क्षणात मी रेवाचा आणि रेवा माझी झाली होती ..माझं तिच्यावर आणि तीच माझ्यावर जिवापाड प्रेम होतं...आता मी एक छोटासा जॉब बघितला ..मला प्रोफेसर व्हायचं होतं , पण आता रेवा ला मिळवण्यासाठी मला काहीतरी जॉब करणं भाग होतं , कारण रेवा च्या घरच्यांना नोकरी करणारा मुलगा हवा होता असं तिनंच सांगितलं होतं ...मी नोकरी करत होतो आणि तिने आमच्या बद्दल तिच्या घरात सांगितलं ... माझ्या घरात तिच्याबद्दल सांगितलं तर नकार मिळणार नाही असा मला विश्वास होता...पण आधी रेवाच्या घरी विचारून पहायचं आमचं ठरलं ....आम्ही घरी गेलो, पण जॉब हलका असल्याने अन् कास्ट वेगळे असल्याने तिच्या घरच्यांनी मला नाकारलं ... तिच्या घरच्या वर जातीचा पगडा खूप होता ...आता तर त्यांनी मला रेवाला भेटू जायचं सुद्धा बंद केलं आणि आमची गाठभेट थांबली.... तिच्या घरच्यांना ते पळून जाईल असं वाटत होतं म्हणून त्यांनी तिला कोडून घातलं आणि त्यांच्या जातीतल्या एका श्रीमंत मुलाशी तिचं लग्न ठरवलं .... मला रेवा चा विरह सहन होत नव्हता...अक्षरशः धायमोकलून रडलो मी तिच्यासाठी तिच्या घरच्या समोर ...पण त्यांना दया आली नाही ...मी तसाच माघारी आलो...

काही दिवसांनी मला कळलं की रेवाच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरवलं होतं ते लग्न उद्याच करणार आहेत...मी आणि मार्टिन ने खूप प्रयत्न केले रेवाला तिथून सोडवण्यासाठी ....पण काही उपयोग झाला नाही... मी येणार हे त्यांना अपेक्षित होतं ,आणि त्यांनी तशी तयारी केली होती....मला त्यांनी एका जागी पकडून ठेवलं आणि लग्न करायला लागले....

आणि पुढच्याच क्षणी आरडाओरडा उठला की रेवा ने आत्म हत्या केली ...रेवा ने मरत्या वेळी एक चिठ्ठी लिहिली होती त्यात मी रिषभ ची नाही तर कुणाचीच नाही असं लिहिलं होतं....पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना आत्महत्येप्रकरणी प्रवृत्त करण्या बाबत अटक केली आणि इथेच आमच्या स्वप्नातीत लव्ह स्टोरी चा अंत झाला होता .....मला साधा चेहरा , तिचं अंतिम दर्शन सुद्धा घेता आलं नव्हतं...आमच्या एकत्र राहण्याच्या आणाभाका अशा चुर झाल्या होत्या...आणि आमची प्रेमकथा ही..पण रेवा मला आजही समोर दिसते...जणू माझ्यावर नजर रोखून बसली आहे, मला अजूनही त्या अनिमिष नेत्रांनी पाहत आहे असं वाटतं..

मी माझे डोळे पुसले....तिला जाऊन आता कित्येक दिवस झाले होते....पण इतकं सगळं होऊन ही माझ्या घरी मी काही सुद्धा कळू दिलं नव्हतं....आणि आता माझ्या त्या यशस्वी प्रेमाला मला कुणाला सांगायच सुद्धा नव्हतं...तसाच मनात रेवाला घेऊन बसलो होतो...शेवटी माझं पहिलं प्रेम होत रेवा ....

" कॉफी.....!!!" समोरून आवाज आला आणि मी पुढे बघितलं....समोर विभा कॉफीचा ट्रे घेऊन उभी होती ...तिला पाहिल्याबरोबर मला अपराधी वाटलं...माझ्या आयुष्यात मी तिला का येऊ दिलं ? त्यालाही कारणे होती...एखाद्याच्या आयुष्याची सासेहोल्पट म्हणजे काय ते मी अनुभवलं होतं ...पण विभा ला माझ्या आयुष्यात येऊ द्या मागे अनेक कारणे होती ...माझी मजबुरी ,लाचारी होती.. घरच्यांपासून सत्यस्थिती लपवण्याच्या नादात केली गेलेली एक चूक तर नव्हती ???  

" अहो...कॉफी...!!" परत समोरून आवाज आला..

" हा...!! " मी म्हणालो...अजूनही डोक्यात रेवा घुमत होती...

मी कॉफी घेतला..ती थोडीशी हसली..मीही स्मितहास्य केलं...एक घोट घेतला, ती तशीच उभी होती..कदाचित मनात काहीतरी चालू होतं तिच्या...बोटांशी चाळा करत होती ती...

" तू घेतलीस ??..." मी विचारलं..तिने मान वर केली..तिच्या गळ्या भोवती फिट्ट झालेलं नेकलेस , मध्यभागी रुळणारे मंगळसूत्र आणि आणखी एक हार... खरंच खूप सुंदर दिसत होती ती...तिच्या गोऱ्या गळ्यावर तिचे दागिने शोभून दिसत होते...

" नाही....!! " ती बोलली..

मग मलाच कसतरी वाटलं...

" एक कप आणतेस का ? .." मी बोललो..

" ओके..." ती म्हणाली आणि कप आणायला निघून गेली..एक गोष्ट मला जाणवली की ती साडीत आपलं शक्य तितकं अंग झाकून घेत होती, अगदी सोज्ज्वळ गृहिणी सारखी...मी डोळे मिटून घेतले..हातातल्या कॉफीची गरम वाफ तोंडावर धरली...फार बरं वाटलं..कधी कधी सामान्य गोष्टी सुद्धा किती आनंदी वाटतात माणसाला....नाही ? ..माझाच एक प्रश्न..

थोड्या वेळात ती कप घेऊन आली..माझ्या मनात एक प्रश्न आला...मी हिच्याशी एक पत्नी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून तर चांगला बोलूच शकातो ना ??? काही विचार केला नाही, तिच्याकडे असलेला एक कप घेतला..आणि अर्धी कॉफी तिला दिली..तिनेही काही तक्रार न करता घेतली...अचानक माझ्या मनात आलं ,इथेच जर रेवा अस्ती आणि अशी कंडीशन असती तर आपण काय केलं असतं ? एका कपात दोंघे जण........

" एक विचारू का ....??.."  विभा माझ्या विचारांची तंद्री भंग करत म्हणाली...

" हा ....!!" मी बोललो..

ती कप खाली ठेऊन माझ्या जवळ आली...माझ्या डोळ्यात डोळे घालुन तिने पाहिलं..मला तर तिची जरा भीतीच वाटली , म्हणजे आता काय विचारेल ती याची...तिचे मोठाले डोळे मला धडकी भरवत होते..

" तुम्ही माझ्याशी का नीट बोलत नाही ? बायको आहे ना मी तुमची ? सतत मला का टाळता ???..." तिने बॉम्ब टाकला...आणि मी नखशिखांत हादरलो..खरंच ती असं काही विचारेल याची मी कल्पनाही केली नव्हती...

" म्हणजे ? ...असं काही नाहीये वि..विभा..." मी कसाबसा बोललो..

" मग कसं आहे ? किती हौसेने मी तुम्हाला इडली डोसा आवडतो म्हणून बनवून दिला.. त्यावर तुम्ही मला जराही बोलला नाहीत...वाटलं , काहीतरी बिघडलं असेल तुमचं, मुड ठीक नसेल...पण काल ही तिथे गॅलरी त येऊन इथे काय करते आहेस याच्या पलीकडे काही बोलला नाहीत ...का असं ? माझ्याशी बोलावंसं नाही वाटत तुम्हाला ?? गेले दोन तीन दिवस माझ्याशी एका मिनिटा पेक्षा जास्त बोलला आहात तुम्ही ???.." विभा बोलली..

मला तिला काय उत्तर द्यावं ते कळेना...ती कधीतरी हे विचारणार हे माझ्या लक्षातच कसं  आलं नाही..? शेवटी काही केलं तरी समाजासाठी माझी पत्नी होती, आणि तिलाही तेच वाटत होतं ..पण मला वाटत होतं का ते ? आय नो मी तिच्यावर अन्याय करत होतो पण मी तरी जय करणार...माझाही नाईलाज आहे..मी स्वतःची समजूत काढत होतो...

" प्लीज बोला...आज मला उत्तर हवंय..." विभा परत बोलली...तिच्या चेहऱ्यावर यत्किंचितही राग नव्हता होतं ते दुःख..  पण मला आता बोलावं लागणार होतं ... खोटं ही सही..

" हे बघ विभा...मला..मला जास्त बोलायला नाही आवडत...आणि तुझं म्हणशील तर तू स्वयंपाक छानच करतेस...पण कॉलेज मध्ये कंटाळा येतो खूप...त्यामुळे काही इच्छाच राहत नाही काही करायची...प्लीज समजून घेशील मला ??.." मी बोललो त्यातील अर्धे अधिक म्हणणे खोटं होतं हे मला माहीत होतं ..

" बरं...पण माझ्याशी जवळीक का टाळता ? इतकी वाईट नाही ना दिसत मी ..मग किमान माझ्या जवळ सुध्धा येत नाही त्याच काय ? मी नाही म्हणत की ....माझ्याशी त्या प्रकारची जवळीक करा म्हणून...पण मलाही मन आहे..मी तुमचं मन जपण्याचा प्रयत्न करते, तुम्ही एकदा तरी माझ्याशी नीट बोलला आहात ? नका ना असं करू..खूप त्रास होतोय मला...बोला माझ्याशी....!! " विभा बोलली..

शेवटच्या क्षणी तर मला ती रडवेली वाटली...

मी पटकन तिचे अश्रू पुसले ..पण लगेच एका अनामिक जाणिवेने हात मागे घेतला...

" विभा प्लीज....असं समज की मी कोणत्या तरी विचारांच्या गर्तेत अडकलो आहे आणि....आणि मला तुझ्याशी नीट बोलता नाही येत मला....यापेक्षा जास्त मी तुला काहीच सांगू शकत नाही....मला माफ कर विभा...!!" मी तिच्या समोर हात जोडून म्हणालो...तिने पटकन माझे हात विलग केले...

" बायको पुढे का हात जोडायचे असतात ? तुम्ही...तुम्ही नका काळजी करू ...मी समजून घेईन...पण असं किती दिवस ? हा ? बाहेरच्या जगासाठी आहोत आपण पती पत्नी...पण शारीरिक सोडा...मानसिक तरी आहोत का ? मला किती दिवसांचा वेळ पाहिजे तुम्हाला हे सांगा...मी काहीही बोलणार नाही तुम्हाला...पण एकदा ते दिवस संपले की तुम्हाला माझं व्हावं लागेल....तुम्ही हँडसम दिसता म्हणून नाही ...तर माझा नवरा म्हणून मला ओढ वाटते तुमची......बोला किती दिवस...!!!" विभा बोलली..ती हट्टाला पेटली होती....

" विभा.....!!" मी बोललो..

" प्लीज...आज जे काय सांगायचं ते सांगून टाका..." विभा हाताची घडी घालून म्हणाली...

तितक्यात दाराची बेल वाजली....

" रिषभ.....!!" आईने हाक दिली..आणि मी विभाचा विचार न करता दार उघडायला गेलो..अगदी मोक्याच्या क्षणी आईने आवाज दिला होता...जणू मला एका संकटातून बाहेर काढलं होतं ...

" आई ...!!" मी तिला आत घेत म्हणालो..तिने आत नजर टाकली...कॉफी पाहून तिचा वेगळाच समज झाला...

" अरे सॉरी....मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं .?" आई 

" अरे नाही आई...बोला ना, काही काम होतं का ???" विभा पुढे येत म्हणाली...

" अगं हो....माझं जरा डोकं दुखत होतं ग...तेवढा काढा करून देशील ??" आई म्हणाली..

" अगं. ..टॅबलेट आहे ना...ती घे ..!!" मी आईला बोललो..

" अरे नाही...त्याने नाही राहत डोकं..विभा..येतेस का ग ??" आई परत डोक्याला हात लावत म्हणाली..

" अ...हो.. चला..! " विभा बोलली आणि आई बाहेर गेली..विभा ने माझ्याकडे पाहिलं...

" मी येईपर्यंत ठरवून सांगाल ??." विभा बोलली आणि माझ्या उत्तराची वाट न बघता निघून गेली...

मी मात्र तसाच उभा राहिलो...

तिने घेतलेले कॉफी तशीच होती..आणि मी एका घोटापलिकडे पिली नव्हती...

अशीच राहणार होती का आमची कॉफी ? ..मला प्रश्न पडला...पण आता काही सुचतच नव्हतं. 

क्रमशः 

मित्रहो कथा तुम्हाला आवडते आहे हे मला कळतंय..पण ते तुमच्या समीक्षामधून कळुदे...आणि हो , कमेंट मध्ये काहीतरी लिहीत जावा..फक्त छान आणि nice नको...काय आवडलं , काय अपेक्षित आहे ते तरी लिहीत जा .. 

मित्रहो कथा तुम्हाला आवडते आहे हे मला कळतंय..पण ते तुमच्या समीक्षा आणि स्टिकर्स यांमधून कळुदे...आणि हो , कमेंट मध्ये काहीतरी लिहीत जावा..फक्त छान आणि nice नको...काय आवडलं , काय अपेक्षित आहे ते तरी लिहीत जा ..

🎭 Series Post

View all