लाईक्स चे मृगजळ

तेवढ्यात चपाती जळण्याचा वास पसरला आणि सासुबाईंची एन्ट्री दोन्ही नी एकच वेळ साधली."अगं पोळी जळते , काय असतं मेलं त्या फोन मध्ये येवढं? काही मेसेज आला आहे कां"?

लाईक्स चे मृगजळ ?

सीमा चे हात भराभर चपात्या लाटत होते ,पण लक्ष सगळे बाहेर टेबलावर ठेवलेल्या मोबाईल कडे होते.मधून मधून नोटिफिकेशन चे टिंग टिंग वाजत‌ होते।

नवरा प्रशांत कामा वर निघाला तरी नेहमी प्रमाणे हे,घेतल कां?ते घेतले कां? वगैरेंची विचार पूस न करता, व बाहेर दारापर्यंत न जाता किचन मधून च सीमा ने बाय केले.
अजून आठ-दहा चपात्या करायच्या शिल्लक होत्या. सोनू अजून झोपलेली होती ,सासूबाई पूजा करत होत्या.
आज तिने नथे चा नखरा चॅलेंज साठी म्हणून फोटो अपलोड केला होता. त्यासाठीच कमेंट व लाईक्स ची वाट पाहत होती. चार पाच चपात्या अजून उरल्या होता, पण सीमा ची उत्सुकता आता पीक वर होती, न राहवून तिने गॅस सिम केला व पटकन पाहून येऊ असे म्हणत? मोबाईल ऑन केला. पण हाय अजून तिचा फोटो काही दिसत नव्हता.
नेट चा प्रॉब्लेम आहे असे सकाळी प्रशांत म्हणत होता ते तिला आठवले.
इतर ग्रुप मेम्बर्स च्या पोस्ट आलेल्या होत्या कोणी कविता तर कोणी संकष्टीच्या गणपतीचे फोटो पाठवले होते .इतर वेळी ती मन लावून पाह्यची, पण आज तिला त्या निरस वाटत होत्या. तिला
घाई होती. आणि डेटा संपत आला होता.
तेवढ्यात पोळी जळण्याचा वास पसरला आणि सासुबाईंची एन्ट्री दोन्ही नी एकच वेळ साधली.
"अगं पोळी जळते ,
काय असतं मेलं त्या फोन मध्ये येवढं? काही मेसेज आला आहे कां"?
सीमा ला ऐकू जाईल अशी पण हळू आवाजात सासूबाईंची बडबड सुरू झाली.
सीमाने धावत जाऊन बाकी चपात्या पूर्ण केल्या .आता काम पूर्ण होईपर्यंत फोनला हात लावायचा नाही असे मनाला समजावत हाताला वेग दिला पण --- मन मात्र तिकडेच गुंतलं होतं....
हा फोटो लग्नानंतरच्या पहिल्या वटपौर्णिमेला काढला होता मराठमोळा वेश लुगडं ,गजरा किती सुंदर दिसत होती त्यात सीमा ,सगळ्यांनी खूप कौतुक केलं .---प्रशांतच्या नजरेतले भाव पाहून ती लाजली व त्याच वेळेस प्रशांत ने फोटो घेतला.
ओटा आवरून होतो न होतो तोच सोनूच्या रडण्याचा आवाज आला धावत जाऊन सीमा ने सोनू ला उचलले मग तिचा बराच वेळ सोनू चे करण्यात गेला.
घड्याळात बारा वाजले पोटातले कावळे ही कांव कांव करत होते, सोनूला जेवू घालताच तिने पण जेवण करून घेतले, पण मनाला काही चैन पडत नव्हती. तिने परत एकदा मोबाईल चेक? केला .आताफोटो दिसत होता व एक दोन लाईक सोडून काहीच नव्हते ,तिचे मन उदास झाले.
दुपारी सोनूला, झोपवता झोपवता सीमाचा ही डोळा लागला. स्वप्नातही तिला एक मोठा डिस्प्ले? दिसत होता त्यावर फेसबूक चा एक मोठा लोगो f होता तिने धावतं तो दाबला, फुलपाखरू झाडं,सूर्य ,तारे ,माणसे असे अनेक चित्र दिसत होते. हे काय पोस्ट केलंय कोणी यात काय विशेष?"
". हे तर मी रोजच पोस्ट करतो पण कितीजण लाईक किंवा कमेंट टाकतात याची मी मोजमाप न करता रोज रोज नवे नवे फोटो अपलोड करतो" मोबाईल मधून आवाज आला.
"हो पण मी आज खासफोटो टाकलाय, मी सर्वांच्या पोस्ट ला भरभरून लाईक व कमेंट टाकते मग मलाही तसेच वाटते ना"
"हे बघ लाईक व कमेंट कमी आल्या ,तू निराश होणार, भरभरून आल्या, कि आनंदाच्या डोहात, असे नसावे नित्यकर्म समजून पोस्ट टाक व जो दे उसका भला न दे उसका भी भला, असे मान, व शेवटी थँक्स.
दुसऱ्या दिवशी नवा प्रकार असे करशील तरच या दुःखातून बाहेर पडशील व फेसबुकच्या संसारात टिकशील,"
"पाहते जमते का मला" असे बडबडत असतानाच सीमाची झोप उघडली
.पाच वाजून गेले होते ,सासूबाईं चहा करून तिला उठवायला आल्या होत्या.
पुढचे सर्व पटापट आटपून तिने रात्रीच्या कामाची तयारी सुरू केली.
झोपताना परत फोन चेक केला, बरेच कमेन्ट्स व लाईक्स होत्या.
त्यात एक लाईक स्वत: ची देत, "जो दे उसका भला " असे मनाला. समजावत ,सर्वांना शांत मनाने थँक्स देत, सीमा ने फोन ऑफ केला.....

---------------------------------------------
लेखिका. सौ प्रतिभा परांजपे