"बरी आहे ग, मला काय धाड भरली आहे .?"-निशा
अरे बाप रे,प्रकरण थोडं वेगळंच दिसतंय ...दुसऱ्या मैत्रिणीने पण ते नोटीस केलं होत. ती आमच्या समोरच होती ,तिने पुन्हा विचारलं ,
"अग धाड नाही भरली ना,मग सुतकी चेहरा कशाला केलाय ?काही झालंय का?"- मीना
"हम्म ,"-निशा ने मोठा श्वास घेतला आणि बोलती झाली ," अग मी फेसबुक ला अकाउंट तयार करून २ वर्ष झाली ..पण काय माहित काय कारण आहे कि मला लाईक्स आणि कंमेंट्स खूपच कमी मिळतात ग .."-निशा
हात्तिच्या हे तर फेसबुक प्रकरण आहे (मी मनातच बोलले).
"अग मग त्यात काय एवढं ? मिळतील कि पुढे अजून ...आत्ताच काय तुझी दुनिया संपली की काय ?"- संगीता (आमच्यातली अजून एक ..जी मीना च्या बाजूने बसली होती आणि आतापर्यंत फक्त ऐकत होती )
"तस नाही ग ,पण ती अंजु आहे न ,तिला बघ आताशी ५ महिने झालेत फेसबुक ला जॉईन होऊन पण तिला किती लाईक्स असता म्हणून सांगू ...परवा तर तिने घाईत बांधलेल्या केसांचा अंबाड्याचा फोटो टाकला तरी सुद्धा इतक्या प्रतिक्रिया आल्या कि बस ....आणि एक मी ,किती डीपी बदलले ...छान वेगळे निसर्गाचे फोटो टाकले ,तरी एवढे लाईक्स नाही आले ."-निशा परत उदास ....
बाबो ,हे तर अवघडच आहे ,नेमकं कशाचा त्रास होतोय हिला ,हिला लाईक्स नाहीत ह्याचा कि अंजुला जास्त लाईक्स आणि कंमेंट्स आहे ह्याचा ...(माझं मनातच बोलणं सुरु होत ,आता आपण ह्यावर आजून काय बोलणार न .ह्या सगळ्यात मी जरा "ढ "समजते स्वतःला ..)
"अग ते नवीन नवीन असत ग ,नंतर बहर ओसरतो सगळ्यांचा .."-मीना ..
"नाही ग नाही असं नसत ,माहितेय का त्यासाठी मी काय काय केलाय ते... तुम्हाला नाही माहित ,जाऊद्या ..तुम्हाला सांगून तरी काय उपयोग म्हणा ...."-निशा .पुन्हा इमोशनल नाटक सुरु ....
तोपर्यंत हळू हळू सगळ्याच आजूबाजू ला जमत होत्या ..आता कस आहे न ,,बायकांना खूप साऱ्या गोष्टी जन्मतः येत असतात ..त्यांचं कसब म्हणा किंवा देवाने दिलेलं त्यांच्यासाठी वरदान ..तर हे सगळं सुरु असताना बाकीच्यांच हि थोडंफार लक्ष होतच ह्या चर्चेकडे ....हे आम्हा बायकांचं कसबच कि एकाच वेळेस आमचा एक कान,एक डोळा एकीकडे तर दुसरं कान,दुसरा डोळा दुसरीकडे असूच शकतो ...तर सगळ्या हळू हळू आपल्या आपल्या गोष्टी सांगू लागल्या ,कारण असा प्रश्न तर अजून हि काही बायकांचा होता ,
"अग तिचे फोटो असतील चांगले त्यामुळे येत असतील तिला इतके लाइक्स "- मंजू
"हो न तशी ती छानच दिसते ...मागच्या वेळेस नाही का रेड ड्रेस मध्ये कसले भारी भारी फोटो काढले होते तिने , चांगलीच फिगर मेंटेन केली आहे तिने "- रूपा
(अरे हे काय , ती छान दिसते तर मग आम्ही सुंदर नाही आहोत काय ?आता निशाला काय वाटेल अजून ..मला तर हीच चिंता मी पुन्हा मनात कुजबुजले. )
" .. म्हणजे आम्ही छान नाही दिसत असं म्हणायचं आहे का तुला ? ती किती तरी फिल्टर वापरते फोटोसाठी ....."-मीना
"हो न ,तसही अंजुला कामच काय असत दोघेच घरात ...त्यात हि कामांना बाई असतेच ...मग का नाही होणार फिगर मेंटेन आणि फोटोशूट ..?"-सरोज (हिला तर तसही अंजु खटकतेचं ,त्यात आज चान्स च मिळाला )
"अरे तस नाही रे ,आपण तर सगळे सुंदरच आहोत ...मी फक्त हे म्हणत होते कि तिला मिळाले तर मिळाले न लाईक्स जास्त त्यात काय एवढं ?"- रूपा
"हे बघ निशा ,आपण आपलं काम करावं ,फोटो टाकला न मग त्याला लाईक्स कमी मिळो ,जास्त मिळो इतका विचार करू नये ....आपल्याला आवडलं न ,झालं तर मग .."-मी आपलं सहज सुचवलं
"हो न आणि कस असत न आपली फ्रेइन्ड लिस्ट केवढी मोठ्ठी ,अंजुची केवढी मोठ्ठी त्यावर सुद्धा फरक पडतो न .."- संगीता
"नाही पण थोडं वाईट वाटतच ना ग ,आपण इतके छान फोटो टाकतो तर आपल्याला वाटतच न कि आपलं हि कौतुक व्हाव ,कोणीतरी आपल्याला लाईक करावं असं .."- मेघा
"हे बघ निशा जेव्हा तू एखादा फोटो शेअर करतेस न तेव्हा त्यात फॅमिली आणि मित्र मैत्रिणी ह्यांना टॅग करत जा ,मग त्यानं ते बघावाच लागेल आणि ते मग तुझ्या पोस्ट ला लाईक आणि कंमेंट करतीलच .."-रीना ने उपाय सुचवला ..
"हो न आणि जेव्हा ते लोक कंमेंट करतात न तेव्हा जरूर धन्यवाद दे ,तू नुसतंच धन्यवाद टाईप नको करू तर फुलांचं गुच्छ किंवा हाथ जोडलेले ईमोजी हे पण टाक..."-मंजू.
"अग आपले शब्द खूप अनमोल असतात ,तेव्ह आभार मानताना तू चांगले चांगले शब्द वापर जसे ,मनापासून आभार , तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद , मला तुमची प्रतिक्रिया खूप आवडली ..असं काही तरी .."- रूपा
हे सगळं ऐकून निशा ला थोडं बर वाटत होत ..
"हे बघ निशा जसे आपले मित्र मैत्रिणी असतात न तसेच त्यांचे हि मित्र मैत्रिणी असतात ,तेव्हा आपण त्यांच्या हि वॉल वर जाऊन एखादी पोस्ट आवडली तर प्रतिक्रिया किंवा लाईक करावे ,त्यामुळे सुद्धा फायदा होतो बर का ...आणि फेसबुक च्या "पीपल यू मे नो" च्या लिस्ट मध्ये असणारी लोकं ऍड केली तर आपली फ्रेंड लिस्ट नक्कीच वाढेल आणि त्याचाही आपल्याला फायदाच होईल ."-विद्या
"हो न ,पण आपण कोणाला ऍड करतोय आणि त्याला आपण खरंच ओळखतो का हे पण जरूर बघ बर का बाई नाही ,तर ह्या लाईक्स आणि कंमेंट्स च्या नादात गोत्यात येशील एखाद्या दिवशी "-सरोज .
"आणि हो जर समजा आपल्या एखाद्या मैत्रिणीने आपल्या पोस्ट ला लाईक नाही केलं न तर तू सुद्धा तिच्या पोस्टला लाईक करू नकोस "जश्यास तसे "."=संगीता ..
"आणि हो जेव्हा आपण पोस्ट टाकतो न तेव्हा त्याच सेटिंग बदलून पब्लिक केलं तर सगळ्यांपर्यंत पोस्ट पोहचतो फक्त फ्रेंड्स असं असेल तर मर्यादित लोकांनाच ते दिसत आणि मग लाईक्स आणि कंमेंट्स कमी होतात ..."- मंजू .
हे सगळं ऐकून निशा ला आता जरा बर वाटू लागलं होत ..आणि आमच्या पार्टी ला नवीन विषय पण मिळाला होता गॉसिप साठी ..बऱ्याच गप्पा टप्पा झाल्या आणि मग सगळ्यांनी एक फोटो काढला आणि फेसबुक ला शेअर केला आणि सगळ्या जणींनी एकमेकांना टॅग केलं ... खूप मज्जा मस्ती केली .मी घरी आल्यावर रात्री विचार केला खरंच जशी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो ,व्यायाम करतो तस आपल्या ला मेंटल हेअल्थ ची पण काळजी घ्यायला हवी आणि त्यासाठी अश्या काही ऍक्टिव्हिटीची गरज असते ..म्हणजे बघा न जेव्हा जेव्हा आपल्याला लाईक्स आणि कंमेंट्स मिळतात ,म्हणजेच जेव्हा जेव्हा आपलं कौतुक होत तेव्हा आपल्याला नवी उभारी येते नवी काही करण्यासाठी, आपण नव्या जोमाने नवे लिखाण करतो ,छान फोटो टाकण्यासाठी अजून मेहनत घेतो ,नवीन गोष्ट शिकतो आपला मूड छान होतो ..हो कि नाही ... थोडक्यात काय तर आजच्या ह्या नव्या युगात लाईक्स आणि कंमेंट्स हे आपल्याला मानसिक स्वास्थ्यासाठी जरुरीचं आहे म्हणा कि ...काय पटतंय न ? तुमच्या सोबत अस झालं असेल तर नक्की सांगा..
करा मग पटापट लाईक आणि कंमेंट ,मी सुद्धा तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघते आहे ..
धन्यवाद !
टीप = हा लेख मी निव्वळ मनोरंजासाठी लिहला आहे ..हा लेखातुन मला कोणत्याही वर्गावर वाईट प्रतिक्रिया द्यायची नाही ...मी स्त्रियांचा आदरच करते ...हा लेख फक्त तुम्हाला हसवण्यासाठी आणि रिफ्रेश कारण्यासाठी लिहला आहे,तरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमस्व आहे . हा लेख ह्यात येणारी नावे ह्यांचा वस्तुस्थीशी काहि हि संबंध नाही ..आढळ्याल स तो निव्वळ योगायोग समजावा हि विनंती ..
आणि हो खरंच तुमचे लाईक्स आणि कंमेंट्स मुळे आम्हाला लिहण्यासाठी खूप प्रेरणा मिळते .तीच आमची कमाई आणि तेच आमचं यश असते ,तेव्हा जरूर लाईक आणि कंमेंट करा..