लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४७)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                        प्राऊड मुव्हमेंट

सारा अगदी व्यवस्थित सगळं बोलत होती एवढंच नव्हे तर त्या सोबतच तिला जे काही फोटो, व्हिडिओ हवे होते तेही ती शूट करत होती. एकाचवेळी ती दोन्ही कामं करत असली तरीही तिच्यात कमालीचा आत्मविश्वास होता. जेरेमी सर मगरीबद्दल बोलत असताना अचानक ती मगर उठून पाण्यात जाऊ लागली होती. ही वेळ सांभाळून घेणं आता साराला भाग होतं.

"दो मिनट और रुको | तुम कहाँ जा रहे हो?" सारा म्हणाली.

जेरेमी सरांनी त्यांचे पूर्ण प्रयत्न केले पण ती थांबली नाही.

"यह मगरमच्छ अब पानी में चला गया है | लेकिन जब मैं उसकी पूंछ के पीछे खड़ा होता, तो मैं उसकी पूंछ के प्रहार से पानी में गिर जाता और फिर मुझे कोई नहीं बचा पाता | खैर! मैं उस स्थिति से बच गया |" साराने तिचं काम पूर्ण केलं.

"एक्सलेंट." जेरेमी सर टाळ्या वाजवत साराच्या दिशेने आले.

त्यांनी तिने छान काम केलं म्हणून अभिनंदन करण्यासाठी हस्तांदोलन केले.

"रिअली व्हेरी गूड. लेट्स शूट अ लास्ट शॉर्ट." डायरेक्टर म्हणाले.

साराला माहीत होतं आता तिला काय बोलायचं आहे ते. जेरेमी सरांनी पुन्हा त्यांची पोजिशन घेतली.

"वर्तमान में हम मगरमच्छों की संख्या में गिरावट देख रहे हैं | इसका कारण यह है कि मगरमच्छ की खाल का उपयोग पर्स, जूते और बेल्ट बनाने के लिए किया जाता है | मगरमच्छों को अपने आहार में शामिल करने के अलावा, उनका अपने घर की सुरक्षा करने के लिये भी शिकार किया जाता है | इन्सानो की तरह जानवरों का भी समान अधिकार है जिंदगी जिनेका वह उन्हे मिलना चाहिए |" सारा अगदी पोटतिडकिने बोलली.

अश्यातच त्यांचं ते मगरीबद्दल चालू असणारं शूट संपलं. या सगळ्यात संध्याकाळ झाली होतीच.

"ओके... पॅकअप." डायरेक्टर म्हणाले.

त्यांचं आजच्या दिवसाचं तिथलं काम संपलं होतं. काम संपलं होतं म्हणजे फक्त शूटिंग संपलं होतं पण उद्या काय करायचं आहे? कोणत्या स्पॉटवर जायचं आहे? काय काय तयारी करायची आहे? हे सगळं प्लॅनिंग सगळ्यांनी मिळून रात्रीच करायचं होतं. जेरेमी सर त्यांच्या सोबत होते त्यामुळे त्यांचा रात्रीचा मुक्काम झांबेझी नदी किनारी होणार होता.

'चला आत्ताचं शूटिंग तरी संपलं. आता थोडा ब्रेक मिळाला तर निदान घरी फोन करता येईल. आईला हे सगळं सांगितल्यावर खूप आनंद होईल. आजचा दिवस खूप छान होता, खूप काही शिकायला मिळालं हे मला कधी एकदा घरी सांगतेय असं झालंय.' सारा मनातच विचार करत होती.

"यू डीड अ ग्रेट जॉब." शोचे डायरेक्टर साराला हस्तांदोलन करत म्हणाले.

त्यांच्या बोलण्याने सारा भानावर आली. तिनेही हसून "थँक्यू" म्हणलं आणि कॅरलॉन सरांकडे बघितलं.

सरही तिच्यावर खुश होते. त्यांनीही अंगठे उंचावून तिला शुभेच्छा दिल्या. आज साराला सरांच्या डोळ्यात तिच्या विषयी खरा खुरा अभिमान दिसत होता.

'सर ही आहे आमच्या भारतीयांची ताकद. आज मला तुमच्या डोळ्यात माझ्याविषयी खरा अभिमान दिसतोय. आय प्रॉमिस सर मी आमच्या देशाचं नाव तर जगभरात गाजविन सोबत तुम्हाला पुन्हा जे काही वाईट अनुभव आले आहेत ते येऊ नये म्हणून देखील प्रयत्न करेन.' सारा मनातच म्हणाली.

त्यांना जिथे कॅम्प लावायचा होता त्या ठिकाणी सगळे आता पोहोचले होते. सगळ्यांसोबत सारासुद्धा टेंट लावत होती. सगळी कामं झाल्यावर सगळे कॅम्प फायर करून बसले होते. शोचे डायरेक्टर एक एक मुद्दे मांडत होते. थोडावेळ त्यांचं हे बोलणं झाल्यावर साधारण पंधरा मिनिटांचा ब्रेक त्यांनी दिला होता.

'आत्ता ब्रेक आहे तोवर घरी फोन करून घेते. खरंतर तिथे आत्ता उशीर झाला असेल साधारण रात्रीचे अकरा वैगरे वाजले असतील पण पाच मिनिटं का होईना बोलणं तरी होईल.' साराने मोबाईल हातात घेऊन विचार केला आणि घरी फोन लावला.

भारतात तेव्हा सव्वा अकरा वाजले होते आणि वेळेचं भान ठेवून साराने जास्त बडबड न करता तिची खुशाली कळवली आणि आजच्या तिच्या कामाबद्दल थोडक्यात सांगून फोन ठेवला. तिचं सगळं बोलणं आणि घरच्यांशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर असलेली उत्सुकता, प्रेम सगळं काही जेरेमी सर बघत होते.

"सारा कॅन वी टॉक सम टाईम?" जेरेमी सरांनी तिला विचारलं.

"येस सर. वाय नॉट?" सारा म्हणाली.

"सारा, यू आर ऍन इंडियन गर्ल अँड येट स्टेपिंग इनटू धिस करिअर मिन्स यू रिअली हॅव अ स्पार्क. आय हॅव हिअर्ड मेनी टाइम्स हाऊ इंडियन गर्ल्स लिव्ह धिस जॉब. यू आर ऍन एक्सेप्शन टू दॅट." जेरेमी सर म्हणाले.

त्यांचं बोलणं ऐकून साराच्या मनावरची जखमेची खपली पुन्हा काढली गेली होती. त्यामुळे ती स्वतःच्याच विचारात हरवली.

'हो सर. माझं कुटुंबं मला साथ देतंय म्हणून हे शक्य झालं. तुम्ही जे बाकी बोलत आहात त्यालाही कित्येक कारणं असतात जी सगळ्यांनाच माहीत असतील असं नाही. तुम्ही म्हणा किंवा कॅरलॉन सर म्हणा तुम्हीही एक बाप आहात. तुमच्या मुलांना सुरक्षा मिळावी, कुठेही काहीही कमी पडू नये म्हणून तुम्ही जी काळजी करत असता तीच काळजी भारतीयांनासुद्धा आहेच ना? सर मान्य आता जग खूप पुढे चाललं आहे पण म्हणून आपण त्या रेसमध्ये धावताना आपल्याच माणसांना जर मागे सोडलं तर याला काय अर्थ आहे? भारतात अजूनही समाजाचा विचार केला जातो कारण आम्हाला त्या सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचं असतं. जे चूक असेल ते आम्ही दाखवून देतो; नाही असं नाही, पण म्हणून तिथे कोणीही एक घाव दोन तुकडे नाही करत. आपले वडीलधारे जे असतात त्यांनी आपल्यापेक्षा जास्त जग पाहिलेले असते आणि म्हणूनच त्यांच्या मतांचा आणि विचारांचा आम्ही आदर करतो. माझाही प्रवास सोपा नव्हता पण माझ्या नशिबी मला सगळे समजून घेणारे आले. याचा फायदा नक्कीच मी माझ्या देशासाठी करून देईन.' तिने मनातच विचार केला.

"हे सारा?" जेरेमी सरांनी तिला एवढं विचारात गढलेलं पाहून तिच्या समोर टिचकी वाजवली.

त्यामुळे ती भानावर आली. त्यांनतर हेच तिने जेरेमी सरांना बोलून दाखवलं. त्यांचं बोलणं सुरु असताना तिच्या मागे कॅरलॉन सर येऊन उभे आहेत हेही तिला माहित नव्हतं. त्यांनीही तिचं ते बोलणं ऐकलं. एवढ्यात त्यांचा ब्रेक संपला आणि डायरेक्टर पुन्हा कामाला लागले होते. सगळ्यांनी आता पुन्हा एकदा कामावर फोकस केला.
***************************
इथे घरी उशिरा का होईना सारा सोबत बोलणं झालं म्हणून सगळ्यांचीच काळजी मिटली होती. त्यात साराने थोडक्यात का होईना तिने आज काय काय बघितलं? हे सांगितलं होतं त्यामुळे सगळे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून ती जागा कशी असेल? याची कल्पना करत होते. एरवी दहा, साडे दहा वाजताच झोपणारे साराचे आजी - आजोबा पण आज जागे होते.

"आई, बाबा तुम्ही खरंच आता झोपा. अजून कितीवेळ जागाल?" विशाखा म्हणाली.

"एखाद दिवस चालतं गं. सारा म्हणत होती ना समीरच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवते म्हणून तो एकदा बघितला की छान झोप लागेल." तिची आजी म्हणाली.

"आजी पण लगेचच व्हिडिओ येईल याची काय खात्री? अजून तिचं काम संपलं नसेल तर?" समीर म्हणाला.

"असुदे. तसंही आता वय झालंय त्यामुळे जास्त झोप लागतच नाही. नुसतंच कुस बदलत राहण्यापेक्षा इथे बसलेलं बरं." त्याची आजी म्हणाली.

"हे कारण तर आहेच पण समीर तुला माहितेय का? हिला जास्त घाई ते व्हिडिओ मैत्रिणींना कधी दाखवते याची आहे." त्याचे आजोबा म्हणाले.

यावर सगळेच हसले.

"असुदे! हो आहे मला घाई. माझी नात जर एवढ्या लांब जाऊन काहीतरी छान काम करतेय तर सगळ्यांना ते दाखवायला नको का?" आजी म्हणाली.

"बघा बघा कोण बोलतंय. अगं कांता तूच साराला सगळ्यात जास्त विरोध केला होतास ना? हे तुझं वागणं म्हणजे दोन टोकं आहेत." आजोबा म्हणाले.

"हो माहितेय मला. झालं गेलं जाऊदे. ए समीर तू बघ ना व्हिडिओ आला का ते." आजी समीरच्या मोबाईलमध्ये डोकं घालत म्हणाली.

"आजी आला व्हिडिओ की सांगतो ना. हवंतर तुझ्या मोबाईलमध्ये घालून देतो. तुझ्या त्या मैत्रिणींच्या गृपवर टाकूया. खुश?" समीर म्हणाला.

"ते तर करायचं आहेच पण आधी मला सगळ्यांना प्रत्यक्ष दाखवायचा आहे व्हिडिओ. एकेकीचे चेहरे बघायचे आहेत मला." आजी म्हणाली.

"हो आई बघशील. आत्ता तरी झोप जाऊन. व्हिडिओ आला की समीर लगेच तुझ्या मोबाईलमध्ये टाकून देईल. मग तर झालं?" विराज म्हणाला.

हो नाही करत करत आजी झोपायला जायला तयार झाली. आजी आणि आजोबा त्यांच्या रूममध्ये चालले होते तोवर समीरचा मोबाईल वाजला.

"आजी आला व्हिडिओ. ये पटकन." समीर म्हणाला.

दोघंही पटकन समीरजवळ आले. सगळेच व्हिडिओ बघण्यात गुंग झाले. साराने आफ्रिकन लोकांच्या खेळाचा व्हिडिओ, आजच्या विक्टोरिया वॉटर फॉल्सचा हेलिकॉप्टरमधून काढलेला व्हिडिओ आणि चित्त्याच्या पिल्लांचे फोटो असं सगळंच पाठवलं होतं. एक एक फोटो आणि व्हिडिओ बघताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर असणारं कौतुक स्पष्ट जाणवत होतं.

'आय एम प्राऊड ऑफ यू सारा. तू ज्या स्वप्नासाठी, तुझ्या ज्या हक्कासाठी घरात इतकी ठाम राहिलीस त्याचं हे फळ आहे. तुझा निर्णय योग्यच होता आणि त्यात जर आम्ही अजून जास्त आडकाठी आणली असती तर कदाचित आज आम्ही स्वतःच्याच नजरेत पडलो असतो. आजचा हा क्षण आमच्या सगळ्यांसाठीच प्राऊड मुव्हमेंट आहे.' तिची आई मनातच म्हणाली.

क्रमशः......
********************************
सगळ्यांना आता साराचं काम आवडू लागलं आहे. सारा परदेशात राहून आपल्या देशाचं नाव उंचावते आहे. कसा असेल तिचा प्रवास? आता उद्या ती कुठे जाणार असेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all