लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग - ४६)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams. Victoria Waterfall.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४६)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                  विक्टोरिया वॉटर फॉल्स

साराचं हेलिकॉप्टर विक्टोरिया वॉटर फॉल्सवरून उडत होतं आणि जे काही दृश्य दिसत होतं ते सारा तिच्या कॅमेऱ्यात टिपून घेण्यात व्यस्त होती.

'इतकं भारी दृश्य आहे ना हे की, असं वाटतंय जसं की कुठल्यातरी वेगळ्याच दुनियेत आपण आलो आहोत.' सारा मनातच म्हणाली.

झांबेझी नदीवरून वाहणारा विक्टोरिया वॉटर फॉल हेलिकॉप्टरमधून आगीच्या धुरासारखा दिसत होता. एकदम पांढरा शुभ्र रंग, पाण्याचा जोरात येणारा आवाज आणि वातावरणात असलेला गारवा अगदी स्पष्ट जाणवत होता.

"सारा ये वॉटर पार्टीकल्स अॅपरॉक्स फोर हंड्रेड फिफ्टी मिटर्स हाईट तक उडते है सो दॅट इट फील लाईक स्मोक. ये वॉटर फ्लो इतना है की, एक बडे़ स्टेडियम को हाफ अवर में फिल करेगा |" कॅरलॉन सर म्हणाले.

"ओह! लेकीन सर ये बहुत ब्युटीफूल है |" सारा म्हणाली.

तिने त्या सगळ्या मनमोहक दृश्याचे व्हिडिओ काढून घेतले. तिला तर आपण अगदी एखाद्या आर्ट गॅलरीत आलो आहोत आणि सुंदर धबधब्याचे चित्र बघतोय असंच वाटत होतं. हे सगळं दृश्य मनात साठवत असतानाच त्यांना जिथे उतरायचं होतं ती जागा आली. पायलेटने व्यवस्थित जागा बघून हेलिकॉप्टर खाली उतरवले.

'खूपच सुंदर आहे ही जागा. किती छान गार वाटतंय इथे. समोर दुधाळ फेस असणारा मनमोहक, उंच धबधबा, त्या उंच कड्यावरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज किती सुंदर आहे.' सारा चहूबाजूंनी नजर फिरवत मनातच विचार करत होती.

तिने विचार करता करताच त्या मनमोहक दृश्याचे छान छान फोटो काढले.

"सारा नाऊ लेट्स गो." कॅरलॉन सर म्हणाले.

जेरेमी सर, कॅरलॉन सर, सारा आणि जेरेमी सरांची चार ते पाच जणांची टीम असे सगळेच थोडं अंतर पुढे चालत गेले. वाटेत जाताना जेरेमी सर तिथल्या भागाची माहिती सांगत होते. थोडं अंतर चालून झाल्यावर ते सगळे त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले.

'बापरे! इथे तर किती मोठ्या मोठ्या मगरी आहेत.' सारा समोरचं दृश्य बघून मनातच म्हणाली.

"सारा ये स्पॉट क्रोकोडायल के लिये फेमस है | यू विल लर्न हिअर अ लॉट ऑफ थिंग्ज. कीप युअर कॅमेरा रेडी." कॅरलॉन सर म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

तिचं आता संपूर्ण लक्ष कामावर होतं. आजूबाजूचा परिसर मनमोहक होताच शिवाय पहिल्यांदा एवढ्या जवळून मगरीला पाहता येणार म्हणून तिच्यात खूप उत्साह होता.

"फर्स्ट हिअर वी विल डू सेटअप." जेरेमी सर म्हणाले.

त्यांना त्यांचा शो वाईल्ड फील्डसाठी शूट करायचं असल्याने आधी कॅमेरे आणि बाकी तांत्रिक बाजू सेट करणं भाग होतं. त्यांची टीम लगेचच कामाला लागली होती आणि ते तिथलं वातावरण न्याहाळत होते.

'याला म्हणतात खरं शूटिंग. इथे यांना कोणीही लिहिलेली स्क्रिप्ट देत नाहीये उलट स्वतःच स्वतःचा अभ्यास करून यांना शो करायचा आहे. त्यासाठी मेहनतही खूप आहे. जेरेमी सर खरंच खूप हुशार आहेत. कितीही हिंस्र किंवा मोठा प्राणी असला तरीही ते त्याला अगदी सहज हात लावतात. त्यांच्या याच ट्रेनिंगचा फायदा आम्हाला करून घेता येणार आहे. अगदी हवे तसे क्लोजअप फोटो आज मिळतील.' सारा मनातच म्हणाली.

तोवर बाकी टीमने त्यांची तयारी करून ठेवली. कॅरलॉन सर आणि साराला सुरक्षित अंतरावर उभं केलं होतं.

"ऑल सेट?" शोच्या डायरेक्टरनी विचारलं.

"येस." जेरेमी सर म्हणाले.

शूट सुरू होण्याआधी त्यांनी काही विशेष सूचना सगळ्यांनाच दिल्या. कॅरलॉन सरांना हे नवीन नव्हतं पण सारासाठी म्हणूनच त्यांनी हे सांगितलं होतं.

"सारा शूट स्टार्ट होने के बाद वी कान्ट एबल टू टॉक. तुम्हे अब अपना स्किल सेंट पर्सेंट युज करके शूट करना है | हम अलग अलग अँगल से शूट करेंगे सो दॅट एक ही सीन में हमे ज्यादा फोटोज् मिल सके |" कॅरलॉन सर म्हणाले.

"ओके सर. आय विल डू माय बेस्ट." सारा म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत होताच. थोड्याचवेळात लगेचच कामाला सुरुवात झाली. जेरेमी सर विक्टोरिया वॉटर फॉल्सबद्दल बोलत होते. हेलिकॉप्टरमध्ये असताना केलेलं शूटिंग नंतर त्यांच्या या बोलण्याला जोडण्यात येणार होतं.

'कसलं भारी आहे हे. आता सरांचं विक्टोरिया वॉटर फॉल्सबद्दल बोलून झालंय म्हणजे आता इथे मगरी आहेत त्याबद्दल सर माहिती देतील.' सारा मनातच म्हणाली.

तिने जसा विचार केला होता अगदी तसंच आता घडत होतं. ती तिचा कॅमेरा घेऊन सज्ज होती. त्या नदी किनारी मगरीचे सरपटल्याचे व्रण होते तेही साराने अगदी व्यवस्थित कॅमेऱ्यात कैद करून घेतले. त्या खुणांचा मागोवा घेतल्यावर एक मोठी मगर ऊन शेकत बसलेली सगळ्यांनाच दिसली.

'केवढी मोठी मगर आहे ही. बघून तरी वाटतंय की या मगरीचे वजन शंभर किलो तरी असणारच.' सारा मनातच मगरीचे फोटो काढताना म्हणाली.

शूटिंगमध्ये जेरेमी सर मगरीचे सगळे डिटेल्स देतच होते. ते त्या ऊन शेकत बसलेल्या मगरीच्या खूप जवळ देखील गेले होते. समोर दिसत असलेल्या मगरीची शेपूटच जवळ जवळ साठ ते सत्तर किलोची असेल हे ऐकून साराचे तर कानच टवकारले गेले होते. त्या मगरीबद्दल अगदी डिटेल माहिती प्रेक्षकांना मिळावी म्हणून जेरेमी सर त्या मगरीच्या खूप जवळ गेले होते.

'सर तुम्ही त्या मगरीच्या खूप जवळ गेला आहात. हे शूट जर घरी आई आणि आजीने बघितलं ना तर आधी माझ्यावर प्रश्नांचा पाऊस पडेल. तू कुठे होतीस? किती अंतरावर उभी होतीस? वैगरे... वैगरे...' सारा मनातच म्हणाली.

एवढ्यात जेरेमी सर प्रेक्षकांना मगरीचे दात आणि तिचा जबडा दाखवता यावा म्हणून तिच्या तोंडाजवळ गेले होते. एका काठीच्या मदतीने त्यांनी तिला जबडा उघडायला भाग पाडलं होतं. अणकुचीदार दात आणि भला मोठा जबडा पाहून तर साराचे डोळे उघडेच राहिले होते. जेरेमी सर आणि त्यांचे डायरेक्टर यांच्यात काहीतरी खाणाखुणा झाल्या आणि अचानक डायरेक्टर "कट..." म्हणाले.

लगेचच त्यांचं शूट थोडावेळ थांबलं. आता सगळं काही नीट सुरू असताना अचानक शूट का थांबलं? म्हणून सारा विचार करत होती.

"हे गर्ल! कॅन यू एक्सप्लेन अबाऊट धिस?" जेरेमी सरांनी साराला विचारलं.

त्यांच्या बोलण्याने सारा पुरती गोंधळून गेली.

'इथे मीच तर सगळं शिकायला आले आहे. मी काय सांगणार?' ती मनातच म्हणाली.

तिच्या चेहऱ्यावर याबद्दलची काळजी स्पष्ट दिसत होती. जेरेमी सरांनी कॅरलॉन सरांना डोळ्याने काहीतरी खूण केली.

"सारा इट्स अ बिग ऑपऑरच्युनीटी. सर तुम्हे पेहले सब एक्स्प्लेन करेंगे | डोन्ट वरी. तुम्हे जस्ट अपना व्हॉईस देना है | क्रोकोडायल के पास सर जायेंगे |" कॅरलॉन सर म्हणाले.

"येस. वी विल लॉन्च धिस शो इन इंडिया. सो, वी वॉन्ट इट टू शूट इट इन हिंदी. आफ्टर शूट वी विल कन्व्हर्ट युअर व्हॉईस." डायरेक्टर म्हणाले.

"ओके सर. आय एम रेडी." सारा उत्साहात म्हणाली.

जेरेमी सरांनी ते काय करतील तेव्हा काय बोलायचं? हे अगदी व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यांच्या हातात जास्त वेळ नसल्याने अगदी थोडक्यात पटकन त्यांनी तिला सगळी माहिती दिली. तिला तिचं काम करता करताच हे बोलायचं होतं. आता पुढचं सगळं बोलणं सारा जेरेमी सरांच्या वतीने बोलणार होती.

"ऑल रेडी? लाईट... कॅमेरा... ऍक्शन..." डायरेक्टर म्हणाले.

जेरेमी सरांनी त्यांची पोजिशन घेतली होती. ते मगरीचा जबडा दाखवत होते.

"हम देख सकते हैं कि यह मगरमच्छ धूप सेक रहा है | इसका वजन लगभग सौ किलो होगा | इसकी पूंछ में अधिकतम वजन होता है | अगर आप इस मगरमच्छ के जबड़े को देखते हैं, तो आप इसके तेज दांत देख सकते हैं | मगरमच्छ की जीभ लगातार निचले तालू तक चिपकी रेहती है | इस तरह, जब मगरमच्छ अपने शिकार को पकड़ लेता है, तो शिकार के बचने का कोई रास्ता नहीं होता है |" सारा म्हणाली.

तिचं बोलणं सुरु असतानाच शोच्या डायरेक्टरने तिला अंगठे उंचावून दाद दिली होती. त्यामुळे तिचा उत्साह अजूनच वाढला होता. आता जेरेमी सर त्या मगरीच्या शेपटीजवळ उभे होते.

"अगर आपको लगता है कि आप मगरमच्छ के पीछे खड़े हैं, तो आप सुरक्षित हैं तो यह गलत है | आप सुरक्षित नहीं हैं; क्योंकी यह अपनी पूंछ की मदद से आप पर हमला कर सकता है | इसका वजन लगभग ६० से ७० पौंड [६० से ७० किलो] होता है | आउच! आपने देखा होगा की कैसे वो मुझ पर हमला करने की कोशिश कर रही थी |" साराने तिचं बोलणं संपवलं.

जेरेमी सर मगरीची शेपूट जेव्हा हातात घेऊन दाखवत होते तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला असता आणि तेच बघून साराने प्रसंगावधान दाखवून तिची काही वाक्य बदलली होती. आता जेरेमी सर मगर पाण्यात कशी पोहत असते? याबद्दल सांगणार होते. ते त्या मगरीच्या काही अंतरावर ती मगर जशी झोपली होती तसेच जाऊन झोपले.

"हमें लगता है कि मगरमच्छ अपने पैरों से तैरता है, लेकिन ऐसा नहीं है | उसकी पूंछ उसे पानी में तैरने में मदद करती है | आप जानते हैं कि मगरमच्छ एक उभयचर है | वह पानी में लगभग चालीस मिनट तक अपनी सांस रोक सकता है | सांस लेने के लिए उसे जमीन पर आना पडता है | वह अपने शरीर के तापमान को बनाए रखने के लिए धूप में बैठी है |" सारा म्हणाली.

आता सरांचं शूट सुरू होतं. ते पोटावर झोपून पाय थोडे वर घेऊन मगर पाण्यात कशी पोहते? आणि कशी दिशा बदलते? हे दाखवत होते. त्यांनतर त्यांनी मगरीचे मागेच पाय दाखवले. त्या मगरीच्या जवळ जाऊन स्वतःचं रक्षण करत हे सगळं करणं कठीण काम होतं. मध्येच अचानक ती हल्ला करायलासुद्धा बघत होती पण सर सावध असल्याने ते तो हल्ला चुकवत होते.

"ये मगरमच्छ के पिछले पैर हैं | ये पैर बतख की तरह होते हैं |" सारा म्हणाली.

जेरेमी सरांनी बरेच प्रयत्न करून त्या मगरीचे पाय व्यवस्थित दाखवले.

क्रमशः...
*****************************
साराला तिचं काम करता करता एक नवीन अनुभवसुद्धा मिळाला. अजून तिला तिथे काय काय करायला मिळेल? अजून ती या करिअरमध्ये काय काय शिकेल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all