लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४१)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -४१)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                               फरक

सर साराला चित्त्यांविषयी माहिती देत होते. त्यांना तिला चित्त्याबद्दल काय काय माहित आहे? हे जाणून घ्यायचं होतं.

"येस सर आय नो." सारा म्हणाली आणि तिने तिला माहित असलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या.

चित्त्यांची पिल्लं मोठी होण्याचा दर साधारण पाच टक्के एवढाच असतो. अगदीच सुरक्षित वातावरण असेल तर फक्त तीस टक्के पिल्लं मोठी होतात. आणि अशी बरीच माहिती साराने सरांना सांगितली.

"राईट." सर म्हणाले.

दोघंही पुन्हा त्यांच्या कामाला लागले.

'मोठे चित्ते पण तर आपल्या माणसांच्या स्वार्थापायी स्वतःचा जीव गमवतात. त्यांच्या कातडीसाठी त्यांची शिकार होते. अश्या घटना वाचल्या किंवा ऐकल्या तरीही असं वाटतं जे लोक अशी कामं करत असतील त्यांचीच कातडी सोलून हातात द्यावी. मुक्या प्राण्यांना बोलता येत नाही म्हणून काय काहीही करणार?' सारा मनातच विचार करून अश्या तस्कर आणि ज्यांच्यासाठी ही कातडी पाठवली जाते त्यांच्यावर खूप चिडली होती.

तिचं सुद्धा बरोबरच होतं. सगळ्याच गोष्टी पैसा फेकून मिळत नाहीत आणि ज्यांना यात काहीही गैर वाटत नाही त्यांना एकदा त्यांचीच कातडी सोलून दाखवली पाहिजे हेच विचार तिच्या मनात येत होते. तिच्या मनात असलेला हा राग तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

"सारा व्हॉट हॅपंड?" सरांनी तिला असं रागात बघून विचारलं.

तिने तिला जे वाटत होतं ते त्यांना सांगितलं. सरांनाही तिचं बोलणं पटलं होतं. त्यांनाही आजवर याच गोष्टीची चीड होती. जसे माणसाला त्याचे आयुष्य, आवडी निवडी, हौस सगळं प्रिय असतं तसंच प्राण्यांनाही असतंच. जसे माणसाचे कुटुंबं असते तसेच प्राण्यांचे सुद्धा असतेच. माणसाला जसं आपल्या मुलांना काहीही झालेलं चालत नाही तसंच प्राण्यांना सुद्धा त्यांच्या पिल्लांची काळजी असते; त्यांनाही पिल्लांना सुरक्षित ठेवायचं असतं. एवढं सगळं असूनही दोन पायांवरचा प्राणी त्यांचा विचार करतच नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः तर पापात सहभागी होतोच शिवाय ज्या लोकांकडून हे काम करून घेतो त्यांनाही यात ओढतो. सारा आणि कॅरलॉन सर प्राण्यांचे आयुष्य अगदी जवळून बघत होते आणि म्हणूनच त्यांना या गोष्टीबद्दल खूप वाईट वाटायचं. साराची आत्ता कुठे या सगळ्यासाठी सुरुवात असली तरीही तिला प्राणी आपल्याच कुटुंबातला एक भाग वाटायला लागले होते. कॅरलॉन सर आणि सारा बोलत होते एवढ्यात चित्त्याच्या पिल्लाचा ओरडल्याचा आवाज ऐकू आला आणि त्या दोघांचं लक्ष तिथे वेधलं गेलं. त्या मादा चित्त्याने लपवून ठेवलेली शिकार खाण्यासाठी बाहेर काढली होती. पिल्लं खाण्यात व्यस्त झाली होती आणि त्यांची आई सर्वत्र लक्ष ठेवून होती.

'चित्त्यांचं आयुष्य म्हणजे भीतभित जगण्यासारखं आहे. कुठून आणि काय संकट येईल सांगता येत नाही.' सारा मनातच म्हणाली.

दोघेही फोटो काढण्यात व्यस्त झाले होते. थोडावेळ असाच गेला.

"सारा तुम्हारे लिये एक टास्क है |" सर काहीतरी विचार करून म्हणाले.

आफ्रिकेत आल्यापासून हा तिचा पहिलाच टास्क असणार होता. सारा आता उत्साहात दिसत होती आणि त्याच उत्साहात तिने सरांना टास्क काय आहे? याबद्दल विचारलं.

"वेट आय विल टेल यू. बट जैसे हजारीबाग में नेचर में तुमने इंटरफियर किया था एेसा इधर नहीं होना चाहिए |" सर म्हणाले.

"येस सर. अब ऐसी गलती नहीं होगी |" सारा म्हणाली.

"आज का फुल डे हमें यही इन चिता के पुरे रूटीन को कॅपचर करना है | अभी आफ्टरनून हो गयी है | ये बच्चे किधर छिपते है? क्या खाते है? क्या खेलते है? इन सबका फोटोशूट करना है |" सर म्हणाले.

"ओके सर. आय एम रेडी." सारा उत्साहात म्हणाली.

लगेचच दोघं कामाला लागले. साराला आजचा दिवस खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे असंच भासत होतं. त्या पिल्लांचे खेळ, मजा - मस्ती आणि छोटी छोटी भांडणं बघून साराला खूप छान वाटत होतं.

'निसर्ग किती सुंदर आहे. हे प्राणी आलेला प्रत्येक क्षण मनमुराद आस्वाद घेत जगतायत. पिल्लं आपल्या आईबरोबर खूप खुश आहेत. कसलीच तक्रार नाही की कसलीच विवंचना नाही. पिल्लं जिथे जातायत तिथे आई जातेय. पिल्लांना सुद्धा हे कळतंय म्हणून तीही आईच्या आसपास राहतायत. छान कुटुंबं आहे हे.' सारा मनातच स्वतःशी बोलत होती.

याच विचारात तिला तिचेही लहानपणाचे दिवस आठवत होते. त्यांचं कुटुंबं कसं आणि काय काय मजा करायचं? हे तिला आठवत होतं. याच विचारात ती फोटो काढत होती. त्यातली दोन पिल्लं एवढी लबाड होती की आईची नजर चुकवून थोडी लांबवर खेळायला जात होती. खरंतर चित्त्याला झाडावर चढता येत नाही पण त्यातलं एक पिल्लू मात्र हळूहळू झाडावर चढायला बघत होतं. सारखं खाली पडत होतं पण हार काही मानत नव्हतं.

'हे पिल्लू फार जिद्दी आहे. या बाकीच्या पिल्लांच्या मानाने जरा जास्त चपळ आणि चुणचुणीत पण वाटतंय.' सारा मनातच म्हणाली.

"सारा! चिता के शिकार करने का तरीका बताओ |" सर म्हणाले.

अचानक आता समोर असं काही घडत नसताना सरांनी असा प्रश्न विचारला त्यामुळे ती थोडी गोंधळली होती पण लगेचच तिने स्वतःला सावरलं.

'चित्ता दबकत दबकत गवताचा किंवा झुडूपांचा आडोसा घेऊन भक्ष्याच्या जवळ जातो. भक्ष्याच्या मागे जाताना त्याचा वेग ताशी ऐंशी ते एकशे दहा किमी असतो पण जास्त वेळ त्याला एवढ्या स्पीडने धावता येत नाही. साधारण साडे तीनशे मीटर अंतर तो या वेगाने कापू शकतो. त्याच्या ठराविक टप्प्याच्या पुढे भक्ष्य गेले तर हा त्याचा नाद सोडून देतो.' सारा मनातच म्हणाली.

तिने आधी आपण विचार केला आहे हे बरोबर आहे ना? हे बघितलं आणि सरांना याबद्दल सांगितलं. सरांना सुद्धा तिचं हे उत्तर आवडलं. ती दरवेळी विचार करून आणि मुद्देसूद उत्तर द्यायची हा तिचा गुण सरांना आवडला होता.

"गूड. तुम्हे लगा होगा मैने अचानक ये क्यों पूछा?" सरांनी विचारलं.

"येस सर." सारा म्हणाली.

"लूक देअर. अब कुछ तो होने वाला है |" सरांनी तिला पिल्लं होती त्याच्या विरुध्द दिशेने काहीतरी दाखवलं.

साराने लगेच दुर्बिणीतून बघितलं. तिथे चार ते पाच नर चित्ते होते आणि त्यांच्या थोड्या अंतरावर एक हरीण गवत खात होतं.

"सर लेकीन एक साथ इतने चिता?" साराने गोंधळून विचारलं.

तिला माहित होतं एकाच वेळी असे समूहाने चार ते पाच नर चित्ते कधीही फिरत नाहीत. म्हणूनच ती ते दृश्य बघून जरा गोंधळली होती.

"येस. मेरे भी पिछले चालीस साल के एक्सपिरीएन्स में ऐसा कुछ होते देखा नहीं है |" सर म्हणाले.

सरांनी त्यांची गाडी थोडी पुढे दुसऱ्या बाजूला घेतली. दोघं आता पुढे काय होणार आहे? हे बघत होते. जवळ आल्यावर त्यांना तिथे पाच चित्ते आहेत हे समजलं होतं. ते पाचही चित्ते गवतात अश्या पद्धतीने लपले होते की ते दिसत नव्हते. खूप काळजीपूर्वक कॅमेऱ्याच्या सहाय्याने पाहिल्यावर ते कुठे आहेत? हे दिसत होतं. दबकत दबकत त्या हरणाच्या जवळ आल्यावर त्यांच्यात धावाधाव सुरू झाली. हरीण सुद्धा खूप चपळ होतं. दोघांच्यात वाऱ्याशी स्पर्धा लागली होती. थोडं अंतर पुढे गेल्यावर अचानक पुढून दुसऱ्या चित्त्याला बघून हरणाने त्याच वाऱ्याच्या वेगाने आपली दिशा बदलली तोवर इतकावेळ गवतात दबा धरून बसलेले दोन चित्ते बाहेर आले आणि अजूनही दबा धरून बसलेला एक चित्ता त्याच्यावर हल्ला करायला सज्ज झाला. शेवटी त्या हरणाने आपला शेवटचा श्वास घेतला.

'याला म्हणतात टीम वर्क. पाचही चित्त्यांनी त्यांचं त्यांचं काम एकदम चोख पार पाडलं त्यामुळे आज त्यांना अन्न मिळालं. निसर्गाने किती नियोजनबध्द सगळं आखलेलं असतं ना? फक्त माणसालाच टीम वर्क येतं असं नाहीये.' सारा मनातच म्हणाली.

"सारा आय रिमेंबर ये पाचो ब्रदर्स है | दाे साल के आसपास इनकी उम्र होगी |" सर म्हणाले.

चित्त्याची पिल्लं साधारण दीड वर्षाची झाल्यावर स्वतःच स्वतः शिकार करून स्वावलंबी जीवन जगतात. त्यांची आई तिच्या तिच्या वाटेने निघून गेलेली असते आणि पुढचं आयुष्य पिल्लांना स्वतःच्या बळावर काढायचं असतं हे साराला माहीत होतं.

'आपल्या माणसांमध्ये तर मुलं पार चाळीशीची होऊन गेली तरीही आई बाबांना लहान वाटत असतात. प्रत्येक गोष्टीत हे चूक आहे असं नाही पण एवढ्या मोठ्या माणसांना त्यांचा त्यांचा अनुभव आलेला असतो तरीही दरवेळी पालकांनी आपलं मत मुलांवर लादलं तर जो काही अनर्थ व्हायचा असतो तो होतोच. प्राण्यांकडून नक्कीच ही गोष्ट शिकण्यासारखी आहे. असो!' सारा मनातच म्हणाली आणि नंतर तिने सरांकडे बघितलं.

"ओके. सर नेचर कितना ब्युटिफुल है ना? इन अॅनिमल्स को भी कब क्या करना है?, कैसे टीम वर्क करना है? सब पता चल रहा है |" सारा म्हणाली.

"जस्ट वेट अँड वॉच." सर स्मित करत म्हणाले.

सारा आत्ता नवीन आहे आणि तिला अजून बऱ्याच गोष्टी बघायच्या आहेत म्हणून सर असं म्हणाले होते. साराने याकडे जास्त लक्ष दिलं आणि ती तिचं काम करू लागली.

"सारा डोन्ट यू थिंक इन अॅनिमल्स के तरह इंसानोने भी बच्चो को इंडिपेंडंट बनाना चाहीए?" सर म्हणाले.

साराला त्यांचा बोलण्याचा रोख समजला होता. तिने तिचा कॅमेरा बाजूला केला आणि ती बोलू लागली; "येस सर. बट जब सवाल अपने बच्चे के सुरक्षा का होता है तब ये बात मायने नहीं रखती की बच्चा कितने साल का है | वरना इन अॅनिमल्स में और इंसानो में क्या फरक रहा?" ती स्मित करून त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली.

क्रमशः.....
**********************************
सारा आता आफ्रिकेत तिच्या मनाप्रमाणे काम करतेय. तिला तिथे अजून काय काय पाहायला मिळेल? तिला आत्ता सुंदर वाटणारा निसर्ग जेव्हा रौद्र रूप धारण करेल तेव्हा तिच्या मनात कोणते विचार येतील? कसा असेल तिचा पुढचा प्रवास? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all