© प्रतिक्षा माजगावकर
(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
खरी सुरुवात
***************************
खरी सुरुवात
दुसऱ्या दिवशी सगळं आवरून सारा आणि तिचे सर त्यांना हव्या असलेल्या स्पॉटवर पोहोचले होते. निघायच्या आधी साराचा एकदा घरी फोन करून झाला होता. तेव्हाच तिने तिच्या आईला आणि आजीला सारखं सारखं बजावून सांगितलं होतं, आता वेळ मिळेल तेव्हाच फोन करेन. कालचा दिवस तर सारासाठी जरा हेवी गेला होता, कारण भारताचा आणि आफ्रिकेचा असलेला वेळेचा फरक यामुळे तिचं गणित जरा गडबडत होतं. पण आज तिला खूप उत्साही आणि प्रसन्न वाटत होतं. आजपासून तिचं खऱ्या अर्थाने काम सुरू होणार होतं. आपल्याला आता कोणत्या प्राण्यांचे फोटो काढायला मिळणार आहेत? आणि त्यांच्याबद्दल काय नवीन शिकता येणार आहे? याची तिला खूप उत्सुकता होती. ही स्वप्न डोळ्यात घेऊनच ती आजूबाजूचा परिसर बघत होती.
"सारा धिस इज प्रोटेक्टेड एरिया. यहाँ हमें लायन्स, चिताज्, लेपर्ड अँड ऐसे बहुत अॅनिमल्स देखने को मिलेंगे |" सर म्हणाले.
सारा हे ऐकून खूप खुश झाली होती. तिला विशेषतः चित्ता आणि आफ्रिकन हत्ती, पांढरे वाघ आणि सिंह बघायचे होते. ते दोघं एका ओपन जीपमधून तिथे आलेले. सर तिथल्या प्राण्यांचे फोटो काढून अभ्यासकांना देत होते म्हणूनच कित्येक वर्षांपासून त्यांचा तिथे वावर होता म्हणून दुसरं कोणीही त्यांच्या सोबत नव्हतं.
"सारा नाऊ वी आर गॉईंग टू सी अ लायन. यहाँ एक मदर लायन है जीसने अभी अभी कब्ज को जन्म दिया है |" कॅरलॉन सर जीप चालवता चालवता साराशी बोलत होते.
"वाव!" सारा म्हणाली.
"यही दुसरे पार्ट में वी कॅन सी चिताज्." सर म्हणाले.
साराने फक्त स्मित करून मान डोलावली.
'एकाच जंगलात कितीतरी प्रकारचे प्राणी राहतात. खरंच खूप काही शिकायला मिळणार आहे इथे. रडून, भांडून आणि थोडी मनमानी करून का होईना पण इथे यायला मिळालं, या क्षेत्रात पाऊल टाकता आलं हे खरंच खूप छान आहे. आत्ता कुठे खरी सुरुवात झाली आहे असं वाटतंय. बाबांना चित्ते बघायला आवडतात पण भारतात चित्ते नाहीयेत. मी जे काही फोटो, व्हिडिओ काढून घरी घेऊन जाईन ते बघून बाबांना खूप आवडेल. आजोबांना हत्ती खूप आवडतात त्यांनाही हत्तींच्या कळपाचे, त्यांच्या पिल्लांचे छान छान फोटो, व्हिडिओ दाखवेन.' सारा मनातच विचार करत होती.
तिने मनोमन कोणाला काय आवडतं? याची आखणी करून ठेवली होती. ती विचारात असतानाच ते त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचले. समोर सिंहीण तिच्या पिल्लांसोबत बसली होती. सहा ते सात पिल्लं त्यात होती. एक पूर्ण सिंहांचा ग्रुप तिथे होता.
"सारा ये ग्रुप में दो नर लायन्स है और चार मादाये है | इनके बच्चे अब बडे़ हो रहे है, लेकीन अभी हम जिस मदर लायन को देख रहे है उसने हाली में अपने बच्चो को जन्म दिया है |" सर म्हणाले.
"ओके." सारा म्हणाली.
ती अगदी व्यवस्थित त्या सिंहांचं निरीक्षण करत होती. त्यात एक पिल्लू पांढऱ्या रंगाचं होतं. साधारण एक महिन्याची असावीत ती पिल्लं. फक्त त्यातली दोन पिल्लं चार ते सहा आठवड्याची वाटत होती.
"सारा हजारीबाग में तुमने इन सबको नाम कैसे दिये जाते है वो देखा | बट लायन्स में एक स्पेशल बात होती है जिसकी हेल्प से हमें नाम याद रखने होते है |" सर म्हणाले.
सारा अगदी काळजीपूर्वक ते काय सांगतायत हे ऐकत होती. सरांनी तिच्या हातात एक दुर्बीण दिली.
"लायन्स में हमेशा चेंजेस होते रेहते है | दॅट्स वाय उनके नेम्स याद रखने के लिये विस्कस स्पॉट लाईन का यूज होता है |" सर म्हणाले.
सारा अगदी काळजीपूर्वक त्या सिंहाकडे बघत होती. सरांचं बोलणं ऐकून तिने दुर्बीण खाली केली.
"सर, विस्कस स्पॉट लाईन मतलब उसके नोज के पास अँड मुस्टाज के इधर जो स्पॉट्स होते है वही ना?" साराने विचारलं.
"येस. राईट." सर म्हणाले.
"सर लेकीन जैसे लेपर्ड का शरीर के किसी हिस्से में चोट या दाग देख के नाम रखा जाता है सेम उस प्रकार लायन को क्यू पॉसिबल नहीं होता?" साराने तिचा पुढचा प्रश्न विचारला.
"गूड क्वेशन. पेहले ऐसेही लायन्स को नेम दिये जाते थे | मगर बच्चे बडे़ होने पर उनके जख्म का पोजिशन चेंज होता जाता है या किसी दुसरे लायन को भी वैसी जख्म हो जाती है जिससे अॅक्युरेट रिझल्ट नहीं मिल पाता | विस्कस स्पॉट लाईन लायन के मामले में हमारे फिंगर प्रिंट जैसे काम करता है | वह हर किसी लायन में युनिक होता है और लायन कितने भी इअर्स के होने के बाद भी वह बदलता नहीं |" सर म्हणाले.
"ओके." सारा म्हणाली.
आता तिने तिचं फोटोशूट सुरू केलं होतं. तिला सिंहांना का त्यांच्या विस्कस स्पॉट लाईनवरून नावं दिली जातात? याचं शास्त्रीय कारण तिला समजलं होतं.
"सारा नाऊ लूक! हाऊ मदर लायन प्ले विथ हर कब्स." सर तिला म्हणाले.
सारा अगदी नीट बघत होती. तिला ती पिल्लं खूप आवडली होती. विशेषतः जी पिल्लं सगळ्यात लहान होती ती दिसायला अगदी मनमोहक होती.
'घरी जे सिंहाच्या पिल्लाचं सॉफ्ट टाॅय आहे सेम तसंच वाटतंय हे. असं वाटतंय लगेच जाऊन त्याला हातात उचलून घ्यावं.' सारा मनातच विचार करत होती.
ती विचारात असतानाच ती लहान पिल्लं आईचं दूध पिऊ लागली. त्या सिंहिणीची मात्र नजर आजूबाजूला काही धोका नाही ना? याकडेच होती. त्यांच्या समूहातील बाकी पिल्लं खेळण्यात व्यस्त होती. सिंह त्यांच्या त्यांच्या क्षेत्राचे रक्षण करत फिरत होते.
"सारा, लायन्स का एरिया अॅप्रॉक्स टू हंड्रेड मीटर्स तक फैला होता है | अब देखो ये मदर लायन क्या करेगी." सर म्हणाले.
'किती भारी वाटतंय इथे. ज्याचं मी स्वप्न बघितलं होतं ते आत्ता मी जगतेय. याच तर क्षणाची मी वाट बघत होते. आफ्रिकेत येऊन हे सगळं अनुभवायला खूप मज्जा येतेय.' सारा मनातच स्वतःशी बोलत होती.
एवढ्यात समोरच्या दृश्याने तिचं लक्ष वेधलं गेलं. सरांनी तिला आधीच सांगितलं होतं ही सिंहीण आता काय करेल ते बघ त्यामुळे ती सावधच होती. ती सिंहीण तिच्या पिल्लांचं दूध पिऊन झाल्यावर त्यांना चाटत होती.
"सारा अकसर मदर लायन अपने कब्स को एैसे ही साफ करती है | इट्स हेल्प कब्स टू आयडेंटीफाय मदर्स स्मेल अँड हर व्हॉईस." सर म्हणाले.
"येस सर अँड इट मेक्स देअर बॉण्ड स्ट्राॅंग. इससे बाकी शिकारी जानवर भी गंध न मिलने पर दूर रेहते है |" सारा म्हणाली.
सर आणि सारा ते मनमोहक क्षण कॅमेऱ्यात टिपून घेण्यात व्यस्त झाले. साराने एका शोमध्ये बघितलं होतं; सिंहीण तिच्या पिल्लांना अशीच चाटून साफ करते. यामुळे पिलांचा गंधही लांडग्याना मिळत नाही आणि पिलांना शी व्हायला सुद्धा मदत होते.
'आपण बाळ असताना आपल्याला जशी आई मॉलिश करून, छान अंघोळ घालायची तसंच आहे ना हे? आपण त्या मॉलिशमुळे गुटगुटीत आणि सुदृढ व्हायचो. आपलं पोट साफ व्हायला मदत व्हायची. घरातले सगळेच बाळाशी बोलत राहतात त्यामुळे बाळांना जसा घरच्यांचा आवाज समजतो, हळूहळू बोलता यायला लागतं तसंच प्राण्यांच्या बाबतीत आहे. इथे सिंहीणही तेच करतेय. निसर्गाने यांना हात, बुध्दी दिली नसली तरीही आपल्या पिल्लांची काळजी कशी घ्यायची? त्यांच्यासाठी काय योग्य आहे? काय अयोग्य आहे? हे कसं समजत असेल ना? कदाचित यालाच म्हणतात आईपण. आई सारखी म्हणत असते ना काही काही गोष्टी आई झाल्यावर कळतात हेच असावं ते.' सारा मनातच म्हणाली.
त्यांचा थोडावेळ तिथेच गेला आणि आता ते दोघं चित्त्याचं निरीक्षण करायला पुढच्या भागात जाणार होते. तिथेही एका चित्त्याने गोंडस पिल्लांना जन्म दिला होता. या सिंहांच्या भागापासून तो चित्ते राहत असलेला भाग थोडाफार जवळच होता. दोघंही तिथे पोहोचले.
"सारा चिताज् हमेशा हाईटेड बट फ्लॅट ग्रास एरिया में रेहते है | बिकॉज ऑफ दॅट उन्हे अपना शिकार और प्रोटेक्शन करने में आसानी होती है |" सर म्हणाले.
सारा अगदी व्यवस्थित सगळं ऐकत होती. तिला माहित होतं चित्त्यांच्या पिल्लांवर सतत संकट असल्याने त्यांचे जास्त जगण्याचे चांसेस कमी असतात. दिवसा शिकार करणारा आणि अगदीच गरज पडली तर चांदण्या रात्री शिकार करणारा हा प्राणी!
"सारा नाऊ वी रिच हिअर. यहाँ एक मदर चिता ने बच्चो को जन्म दिया है | वन अँड हाफ मंथ के है वो सब. टोटल फोर बच्चे है | यही आसपास होने चाहिए | सारा लेट्स फाईंड देम." सर म्हणाले.
दोघंही पिल्लं आणि मादा चित्ता कुठे दिसतायत? हे बघू लागले. थोडावेळ त्यांचा असाच शोधण्यात गेला आणि साराला एका झाडाच्या आडोशाला गवतात काहीतरी हालचाल जाणवली.
"सर वो ट्री के पास |" सारा म्हणाली.
सरांनी तिथे बघितलं. तिथे चारही पिल्लांसोबत त्यांची आई सुद्धा होती. थोडावेळ असाच गेला आणि पिल्लं खेळता खेळता त्या झाडाच्या आडून बाहेर आली आणि त्यांची आई सुद्धा बाहेर आली. पिवळे शरीर, त्यावर भरीव काळे ठिपके, लांब शेपूट, पुढचे पाय आखूड तर मागचे पाय लांब, लहान वेटोळे डोके, तसेच छोटे कान, डोळ्याच्या कोपऱ्यापासून ते ओठांपर्यंत गेलेली एक काळी रेघ ज्याला अश्रुरेखा म्हणतात, अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस किलो वजन आणि साधारण दोन मीटर लांबी अशी ती मादा चित्ता होती.
'चित्त्याची पिल्लं काही एवढी खास दिसत नाहीत ना? ती मगाशी सिंहाची पिल्लं किती क्यूट होती.' सारा मनातच म्हणाली.
"सारा डीड यू नो? चिता के बच्चोपर हमेशा कोई ना कोई खतरा होता ही है |" सर म्हणाले.
क्रमशः...
*******************************
सारा आफ्रिकेत हळूहळू रुळू लागली आहे. तिला तिथे अजून काय काय अनुभवायला मिळणार आहे? चित्त्याबद्दल तिला कोणत्या नवीन गोष्टी समजतील? काय काय नवीन गोष्टी ती तिथे शिकेल? तिला ज्या मोठ्या शोसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे त्यात ती काय अनुभव घेईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
*******************************
सारा आफ्रिकेत हळूहळू रुळू लागली आहे. तिला तिथे अजून काय काय अनुभवायला मिळणार आहे? चित्त्याबद्दल तिला कोणत्या नवीन गोष्टी समजतील? काय काय नवीन गोष्टी ती तिथे शिकेल? तिला ज्या मोठ्या शोसाठी काम करण्याची संधी मिळणार आहे त्यात ती काय अनुभव घेईल? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा