लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२०)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -२०)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                                 जुगाड

साराने जरी फोन स्विच ऑन करून घरी काहीही कळवणार नाही हे मान्य केलं असलं तरीही तिला आईची जास्त काळजी वाटत होती. आधीच आईला बी.पी.चा त्रास म्हणजे जास्त टेंशनने तिच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो हे ती जाणून होती. 'आपला फोन चालू न करता हा मेसेज मी घरच्यांपर्यंत कसा पोहचवू?' असे विचार करता करताच ती तिचं आवरत होती. विचारा विचारातच तिने तोंडावर थंड पाण्याचा हबका मारला आणि अचानक तिच्या डोळ्यात एक चमक आली.

'सर तुमची अट मान्य. आता बघाच भारतीय लोक कसे जुगाड करतात ते.' सारा मनातच म्हणाली आणि अगदी निश्चिंत मनाने सगळं आवरून आईने दिलेला डबा एका पिशवीत घेऊन बाहेर आली. तेवढ्यात कॅरलॉन सर सुद्धा बाहेर आले.

"लेट्स गो." सर म्हणाले आणि दोघं जीपमध्ये बसले.

सकाळची प्रसन्न वेळ आणि कोवळी सूर्य किरणे मनाला अजूनच प्रसन्न करत होती. चारही बाजूंनी असलेली हिरवळ, गार वारा आणि सोनेरी प्रकाश निसर्गाचं सौंदर्य अजूनच खुलवत होता. त्यात प्रातःकाली ऐकू येणाऱ्या पक्ष्यांचा मधुर स्वर मनाला मंत्रमुग्ध करत होता.

"सारा, हाऊ वॉज युअर येस्टरडेज् शूट? फर्स्ट एक्सपिरिएन्स कैसा लगा?" सरांनी तिला विचारलं.

"नाइस. इट वॉज द मोस्ट मेमोरेबल डे फॉर मी." सारा म्हणाली.

आजही सर तिला काही प्रश्न विचारून तिची परीक्षा घेत होते. तिचं या क्षेत्रातलं ज्ञान, याबद्दलची माहिती आणि ती या कामासाठी कितपत स्वतःला झोकून देऊ शकते याबद्दल माहिती काढून घेण्यासाठी सर तिला अनेक प्रश्न विचारत होते. साराही अगदी सहज सगळ्यांची उत्तरं देत होती. तिच्या कालच्या आणि आजच्या वागण्यात बराच फरक होता. काल नाही म्हणलं तरीही तिच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट तणाव रेषा दिसत होती ती आज कुठेतरी गायब होती. सरांनी ते बरोबर हेरलं होतं.

"सारा टुडे यू लूक टेंशन फ्री. कॅन यू ट्राय टू कॉन्टॅक्ट युअर फॅमिली?" सरांनी तिला विचारलं.

"नो सर. अॅबस्युलिटली नॉट." सारा म्हणाली.

तोवर ते कॅन्टीन जवळ पोहोचले होते. वन अधिकारी त्यांना आत घेऊन गेले आणि चहा, कॉफीची ऑर्डर दिली.

"सर जस्ट फ्यु मिनिट्स." सारा म्हणाली आणि तिथून उठून बाहेर आली.

तिने मुद्दाम तिचा मोबाईल टेबलावरच ठेवला होता, जेणेकरून सरांना कळावं की ती त्यांची अट मोडत नाहीये. कॅन्टीनच्या बाजूलाच मेन ऑफिस होतं. सारा झपाझप पावलं टाकत तिथे गेली. रिसेप्शनवर पोहोचल्यावर तिने आधी स्वतःची ओळख करून दिली आणि आय.डी. प्रूफ पण दाखवलं.

"बोलिये मॅडम क्या काम है?" त्यांनी विचारलं.

"सर, किसी कारणसे मुझे कल भी यही रुकना पड़ रहा है | मुझे पता है की अगर मै कल टाईम से घर नहीं पहुची तो मेरा बडा़ भाई इंटरनेट से यहाँ का नंबर निकाल के इधर कॉल करेगा | तो बस आप मै यहाँ ठीक हूॅं और काम एक्सटेंड हो गया है यह बात बता देना प्लीज | मेरे आवाज का रेकॉर्डिंग मै यहाँ छोड़ कर जाती हूॅं |" साराने तिला जे काही सांगायचं होतं ते सांगितलं.

तिचं आयडी प्रूफ बघून आणि आधी केलेल्या एन्ट्रीमधून ती कॅरलॉन सरांसोबतच आली आहे हे स्पष्ट होत होतं, पण तिच्यावर या बाबतीत कितपत विश्वास टाकावा? हे त्यांना कळत नव्हतं. त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून सारा पुन्हा बोलू लागली; "सर, मै सच बोल रही हूॅं | अचानक काम एक्सटेंड हो गया है और कुछ कारण वश मुझे घरपें कॉल करनेकी अनुमती नहीं है | प्लीज सर सब लोग टेंशन लेंगे इसलीये रेकॉर्डिंग रखो ना |" साराने पुन्हा त्यांना समजावणीच्या सुरात सांगितलं.

"ठीक है |" ते म्हणाले आणि त्यांनी टेलिफोन जवळ एक रेकॉर्डिंग मशीन होतं ते चालू करून साराला दिलं.

"आई, बाबा, दादा, आजी, आजोबा मी ठीक आहे. तुम्ही काळजी करत असाल म्हणूनच हे रेकॉर्डिंग मी इथे दिलं आहे. काही कारणाने मला तुम्हाला फोन करता येणार नाहीये. कोणीही काळजी करू नका. अचानक काम वाढलं आहे आणि मला यायला काही दिवस उशीर होणार आहे. मी घरी आल्यावर सविस्तर बोलूच. जेव्हाही मला तुम्हाला फोन करण्याची संधी मिळेल मी लगेचच फोन करेन. आई तू आधी गोळी घे आणि काळजी करू नकोस." साराने रेकॉर्ड करून त्यांना मशीन परत केलं.

"थँक्यू सर. अगर मेरे घर सें कॉल आया तो प्लीज उन्हे ये रेकॉर्डिंग सूना देना |" सारा म्हणाली आणि त्यांचे आभार मानून तिथून निघाली.

ती कॅन्टीनमध्ये आली तोवर चहा, कॉफी सगळं आलेलं होतं.

"सारा यू ट्राय टू कॉन्टॅक्ट युअर फॅमिली राईट?" सरांनी विचारलं.

"नो सर. मैने जस्ट रिसेप्शन पे व्हॉईस मेसेज छोडा़ है |" ती म्हणाली आणि बोलता बोलता तिने आईने दिलेला चिवड्याचा डब्बा उघडला. कॅरलॉन सरांना आणि वन अधिकाऱ्यांना पण तिने थोडा थोडा चिवडा दिला आणि स्वतःही खाऊ लागली.

सर काहीतरी बोलायला जाणार एवढ्यात तिच बोलू लागली; "सर, आपने मुझे कहाॅं था की, फॅमिली को कॉन्टॅक्ट करके कुछ बताना नहीं है | मैने आपकी ये शर्त पुरी की | आपने ऐसा कुछ नहीं बोला था की, मेसेज भी नहीं रख सकती | दुसरी बात ये की, अगर कल हम किसी मुसिबत में भी फस गये और फॅमिली से कॉन्टॅक्ट नहीं भी कर पाये तो भी उन्हें खबर मिलनेही वाली है, क्योंकी वी हॅव टू रिपोर्ट मेन बेस कॅम्प | यही सोच कर मैने वहाॅं मेसेज छोडा़ |" साराने तिची बाजू कशी बरोबर आहे हे मांडलं.

यावर सर काहीही बोलले नाहीत आणि सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. साराला मात्र आपण जे काम केलं आहे ते बरोबरच केलं आहे आणि सरही काहीही बोलले नाहीत म्हणजे त्यांना ते पटलं आहे हे तिच्या लक्षात आलं आणि तीही बऱ्याच अंशी काळजी मुक्त झाली.

'दादा आता सगळं तुझ्यावर आहे. उद्या मी घरी पोहोचले नाही म्हणून प्लीज नेट वरून इथला नंबर शोधून कॉल कर.' सारा मनातच विचार करत होती.

"लेट्स गो. सारा नाऊ टेक रेस्ट फॉर सम टाईम अँड देन वी विल कन्टिन्यू अवर सेशन." ते म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

ते पुन्हा त्यांच्या खोलीजवळ आले. सारा आत गेली डब्बा बॅगेत ठेवला आणि जरा पाठ टेकली.

'हा जुगाड एक सुचला ते बरं झालं. आता फक्त दादाने मी विचार केला आहे तसं वागू दे म्हणजे झालं. असं म्हणतात की, आपल्याला जे व्हावं असं वाटत असतं ते निसर्ग शक्तीच जुळवून आणतात म्हणजे मी जे केलं आहे ते सार्थकी लागेल. निसर्ग आपल्याला हे दाखवून पण देतोच की! प्राण्यांकडे कुठे असतात फोन? तरीही ते त्यांच्या पिल्लांना शोधतात ना? कळप करून राहणारे प्राणीसुद्धा आपल्या कळपात कोण कोण आहे?, किती प्राणी आहेत? हे ओळखून असतातच. कोणी वाट चुकलं तर तेही यांना बरोबर समजतं आणि नशीब चांगलं असेल तर पुन्हा त्यांचे त्यांचे सगळे सदस्य एकत्र येतातच.' सारा मनातच प्राणी आणि माणूस यांचं जीवन बघत होती.

तिला आजीने सांगितलेली एक गोष्ट आज प्रकर्षाने जाणवत होती. आजी म्हणायची; "आमच्यावेळी हे फोन बिन काही नव्हते. चिठ्ठी यायला काही दिवस लागायचे. तरीही आपली माणसं जर दूरवरून आपल्याला काही सांगू पाहत असतील तर ते कळायचं. मनाला हुरहूर लागायची आणि कसंही करून त्या माणसाशी बोलणं व्हायचं."

'आजी असं सांगायची तेव्हा आपल्याला ही काहीही बोलते असं वाटायचं, पण आता याच गोष्टीचा सहारा आहे. या गोष्टी खरंच असतील असं आता वाटायला लागलं आहे. जेव्हापासून निसर्गाच्या सान्निध्यात मी आले आहे तेव्हा पासून या अद्भुत नैसर्गिक शक्तींवर विश्वास बसायला लागला आहे. प्राण्यांच्या जगण्याचा हाच तर एक सहारा आहे. हा! एक मात्र आहे, काल रात्री खरंतर खूप छान वाटलं फोटो काढताना. किती छान पिल्लं आहेत ती. दिसताना अगदी सॉफ्ट टॉईज् सारखी दिसतायत. आज अगदी क्यूट दिसणारी पिल्लं उद्या मोठी झाल्यावर एक रुबाबदार बिबट्या होणार आहेत. किती मस्त खेळत होती ना ती आई बरोबर?' सारा मनातच सगळं आठवून बोलत होती.

तो विचार करता करताच तिला कधी झोप लागली समजलंच नाही. कालचा प्रवास आणि त्यात रात्रभर केलेलं काम यामुळे तिचं शरीर खूप दमलं होतं, पण मन मात्र त्याच प्राण्यांच्या विश्वात हरवलं होतं. एवढा वेळ सलग काम तिने पहिल्यांदा केलं होतं आणि बिबट्याचं निरीक्षण तेही त्याच्या पिल्लांसोबत हे तिला खूप आवडलं होतं. अगदी मनाला भुरळ पडेल अशी ती पिल्लं होती.

क्रमशः....
****************************
साराने शक्कल लढवून व्हॉईस मेसेज तरी रिसेप्शनवर ठेवला आहे पण तिचा दादा नक्की तिथे फोन करेल? साराच्या काळजीने घरची काय अवस्था असेल? सरांच्या परीक्षेत सारा पास होईल? तिला सरांसोबत आफ्रिकेला जाण्याची संधी मिळेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all