लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१९)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१९)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                          भाग्यवान कोण?

एव्हाना आता रात्र कलून पहाट होण्याच्या मार्गावर होती. अजूनही सारा त्या बिबट्यावर आणि तिला दिसलेल्या पिल्लांवर लक्ष ठेवून होती. एकदम छोटी छोटी ती पिल्लं अगदी सॉफ्ट टॉईज सारखी दिसत होती. एका झाडाच्या पडलेल्या ओंडक्यातून दोन पिल्लं तरी दिसत होती आणि बाहेरच त्यांची आई बसली होती.

'या प्राण्यांचं कसं असतं ना? लहान असेपर्यंत आई सांभाळते. त्यांचे बाबा तर निघून गेलेले असतात. शिवाय पिल्लं मोठी झाली की आईसुद्धा जाते. याबाबतीत आपण माणसं भाग्यवान आहोत म्हणायचं. आपल्याला कायम आपलं कुटुंबं साथ देतं, आपण कितीही मोठं झालो तरीही आई - बाबा सोबत असतात.' सारा मनातच विचार करता करता फोटो काढत होती.

"सारा, शो मी फोटोज्." कॅरलॉन सर म्हणाले.

सरांच्या बोलण्याने ती भानावर आली आणि तिने तिचा कॅमेरा सरांच्या हातात दिला. सर सगळे फोटो बघत होते.

'सर तुम्ही ट्विस्ट टाकला आहे तो मागे घेतला तर बरं होईल. माझ्यामुळे घरच्यांचा जीव चांगलाच टांगळीला लागणार आहे. कधीकधी मला प्राणी भाग्यवान वाटतात. त्यांना जेव्हा मनात येईल तेव्हा कुठेही जातात, काहीही करतात शिवाय त्यांना कसलीच चिंता नसते. आपली काळजी घरचे करत असतील; आपण त्यांना कसं समजावणार? त्यांना काय सांगणार? अरे.. मी हे काय विचार करतेय? नाही. नाही. सारा हे असे विचार करू नकोस. प्राण्यांना सुद्धा त्यांच्या पिल्लांची काळजी वाटत असते, उलट त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी जास्त मार्ग उपलब्ध नसतात. आपण माणसं हवं तेव्हा हवं ते करतोच की! उद्याचीही तजवीज आपल्याकडे करून ठेवलेली असते, पण हे बिचारे मुके प्राणी त्यांना उद्याचं उद्याच बघावं लागतं. आपणच जास्त भाग्यवान म्हणायचं.' सारा मनातच स्वतःला समजावत होती.

तिला सरांनी अचानक एक दिवस जास्त थांबावं लागेल सांगितल्यामुळे खरंतर टेंशन आलं होतं आणि त्यातच तिच्या मनात हे विचार येत होते. तिला हेही माहीत होतं की, या कामात आपल्याला वेळ, काळ निश्चितपणे सांगता येणार नाही, पण यावेळी ती परीक्षेला गेली होती आणि तेही पहिल्यांदा एवढ्या लांब घरच्यांना कसंबसं समजावून त्यामुळे तिला जास्तच काळजी वाटत होती. काम करताना थोडावेळ त्यात गेला की पुन्हा राहून राहून तिच्या मनात 'घरी काय सांगायचं? आणि कसं समजावायचं?' हेच विचार मनात येत होते.

"साराऽ साराऽ" कॅरलॉन सर म्हणाले.

त्यांनी जवळ जवळ तिला तीन ते चार वेळा हाक दिली होती तरीही तिचं लक्ष नव्हतं म्हणून त्यांनी अजून थोड्या मोठ्याने तिला हाक मारली.

"येस सर?" सारा म्हणाली.

"टेक युअर कॅमेरा. तुम्हारा ध्यान किधर था?" त्यांनी विचारलं.

साराने कॅमेरा हातात घेतला आणि "नथिंग सर." असं म्हणाली.

"बट आय नो. आय वॉज टेल यू टू स्टे वन मोअर डे दॅट्स वाय यू कान्ट एबल टू फोकस. बट नाऊ लिसन केअरफुली इफ यू कान्ट एबल टू फोकस ऑन वर्क देन गो होम. यू इंडियन्स अल्वेज थिंक मोअर देन वर्क. दॅट्स वाय आय रिफ्युज टू टीच यू." सर जरा नाराजीने म्हणाले.

"नो सर. आय एम सॉरी, बट आप जैसा सोच रहें हो वैसा नहीं है | सॉरी सर छोटा मुहॅं बडी़ बात; लेकीन इन इंडिया वी ऑल लिव्ह विथ फॅमिली. हर एक को इधर अपने फॅमिली मेंबर के बारें में पता होता है | इफॅक्ट मेरे डॅड भी काम से बाहर जाते है तब अगर उनका कुछ कॉन्टॅक्ट नहीं हुॅंवा तबभी घर में टेंशन होता है |" सारा म्हणाली.

"डोन्ट यू थिंक इट्स ओव्हर केअरिंग?" सर पुन्हा जरा नाराजीने म्हणाले.

"नो सर. हमारे इंडिया में आपको यहीं प्यार देखने को मिलेगा | यहाँ हमारी सारी फॅमिली एक दुसरें को सपोर्ट करकें रेहती है | एक दुसरे के सक्सेस या फेल्युअर में साथ देती है | यह केअर करना हमें ओव्हर केअरींग नहीं लगता |" सारा म्हणाली.

"शी इज राईट." इतका वेळ त्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेणारे वन अधिकारी म्हणाले.

"बट इन धिस फील्ड वर्क कॅन बी एनी टाईम गेट एक्स्टेंडेड. सम टाईम कुछ रिझन के वजह से कॉन्टॅक्ट नहीं हो पाता, तुम्हारी फॅमिली को इसकी आदत होनी चाहिए |" सर म्हणाले.

"येस सर आय नो दॅट. इसलिये तो मैने आपकी ये बात मान ली | बस घरपे सब लोग फिकर करते बैठेंगे उसकाही टेंशन है |" सारा म्हणाली.

"सारा, कॅन आय आस्क यू? डोन्ट यू थिंक, यू आर नाऊ मॅच्युअर फिर भी ये ऐसे रेस्ट्रिक्शन्स?" सर म्हणाले.

"नो सर. सर, लूक ऍट दॅट मदर लेपर्ड." सारा त्या बिबट्या आणि तिच्या पिल्लांकडे बोट करून म्हणाली.

एक पिल्लू खेळता खेळता तिथे असलेल्या पाणवठ्यावर जात होतं आणि अजून ते पोहण्यासाठी सक्षम नव्हतं. त्याच्या आईने ते बघितल्यावर अलगद त्याला तोंडात उचलून पुन्हा झाडाच्या ओंडक्या जवळ आणलं, पण ते पिल्लू पुन्हा तिथे जात होतं आणि त्याची आई त्याला घेऊन येत होती. पुन्हा पुन्हा तेच सुरू होतं. यावेळी मात्र त्याच्या आईने त्याला पुन्हा जागेवर आणलं आणि गुर्गुरली. जणू ती त्याला ओरडत होती; "पुन्हा जर तिथे गेलास तर खैर नाही. अजून तू लहान आहेस आणि तुला त्या पाण्याच्या खोलीचा अंदाज नाही. त्या पाण्याच्या प्रवाहात तू मोठा होशील तेव्हाच जायचं." ते पिल्लू देखील निमूटपणे खाली मान घालून उभं होतं. काही क्षणातच त्या आईने त्याच्या डोक्याला चाटलं. जणू ती आपली आई आपल्याला जशी ओरडल्यावर कुरवाळते तशी ती त्याला कुरवाळत होती. थोडावेळ असं करून झाल्यावर ते पिल्लू पुन्हा आई सोबत खेळू लागलं. त्या ओंडक्यातून अजून एक पिल्लू बाहेर आलं होतं. तिनही पिल्लं आई सोबत खेळण्यात मग्न होतं. एव्हाना आता पहाट झाली होती आणि हलका उजेड सर्वत्र पसरू लागला होता.

"देखा सर? अॅनिमल्स को भी अपने बच्चो की कितनी फिकर होती है? वी इंडियन्स ऑलवेज स्टे विथ अवर पॅरेंट्स अँड दॅट्स व्हाय वी ऑलवेज नो वी आर नॉट अलोन." सारा म्हणाली.

"अँड दॅट्स ओन्ली मेक यू विक. यू कान्ट एबल टू फ्लाय हाय." सर म्हणाले.

"नो सर. उलटा इसके वजह से हमें जादा स्ट्रेंथ मिलती है | हमारा कल्चर ही ऐसा है जिसमे सिखाया जाता है सबको साथ लेके आगे बढो़, वरना इन अॅनिमल्स में और हममें क्या फरक रहाॅं?" सारा म्हणाली.

तिचं बोलणं पूर्ण होतंय न होतंय तोवर समोर पिल्लं आईच्या कुशीत विसावली होती आणि ते दृश्य फारच मनमोहक होतं. साराने सरांनाही ते दाखवलं आणि ते क्षण कॅमेऱ्यात टिपून घेतले. लपून बसलेलं पिल्लू तर आईच्या कुशीत स्वतःला खूप सुरक्षित समजत होतं. कॅरलाॅन सर सुद्धा ते दृश्य पाहण्यात हरवून गेले होते.

'किती छान आहे हे दृश्य. मला जेव्हा पहिल्यांदा सरांना भेटायला यायचं होतं आणि मनात खूप प्रश्न होते तेव्हाही मी आई - बाबांच्या कुशीत अशीच विसावले होते. सर म्हणतात यामुळेच तुम्ही भारतीय उंच झेप घेत नाहीत. आता त्यांना कसं समजावू? छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा भारतीयच होते आणि स्वराज्यासाठी त्यांच्याच आईने त्यांना प्रेरणा दिली होती. त्यांनी स्वतःच्या हिताआधी जनतेचा विचार केला आणि आजही ते सगळ्यांच्या मनात आहेत. सरांना कसं समजावू? हा तोच भारत आहे जिथे रामाने राज्य केलं. वडिलांच्या वचनपूर्तीसाठी ज्याने चौदा वर्षांचा वनवास भोगला पण त्यातून खूप काही शिकवले. आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे आणि किती शास्त्रीय आहे हे मी तुम्हाला नक्कीच पटवून देईन.' सारा मनातच म्हणाली.

"ओके. नाऊ वी विल गो बॅक. सम टाईम टेक रेस्ट, हॅव ब्रेकफास्ट अँड देन आफ्टर सम टाईम वी विल बॅक फॉर नेक्स्ट सेशन. तबतक यहाँ कॅमेरा सेट करो | व्हेन वी कम बॅक इसमे कुछ कॅप्चर हो गया होगा |" सर म्हणाले.

"ओके सर." सारा म्हणाली आणि तिथली एक नीट जागा बघून तिने तिचा मोशन डिटेक्टर कॅमेरा लावून ठेवला.

या कॅमेऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या सेन्सर्सना काही हालचाल जाणवली तर तो कॅमेरा आपोआप ऑन होऊन त्यात व्हिडिओ शूटिंग सुरू करतो. यामुळे कॅमेऱ्याची बॅटरी वाचते आणि काम सुद्धा होतं. साराने सगळं पुन्हा एकदा चेक करून घेतलं आणि ती जीपमध्ये आली. तसंही रात्रभर काम करून ती खूप दमली होती. कधी एकदा काहीतरी खाऊन जरा पाठ टेकते असं तिला झालं होतं. लगेचच सगळे पुन्हा त्यांच्या बेस कॅम्प जवळ आले.

"आप फ्रेश होके आईये फिर कॅन्टीन में जाते है |" वन अधिकारी म्हणाले.

कॅरलॉन सर मानेनेच हो म्हणाले. सारा आणि सर त्यांच्या त्यांच्या खोलीत जाणार एवढ्यात सरांनी तिला थांबवलं.

"सारा! डोन्ट स्विच ऑन युअर मोबाईल." सर म्हणाले.

"येस सर. आय नो." ती म्हणाली.

क्रमशः....
****************************
साराच्या अश्या न कळवण्याने घरात कोणतं नवीन वादळ येईल? तिच्या घरच्यांना हे समजणार नाहीये तर त्यांच्या काळजीचे काही परिमाण नंतर साराच्या पुढच्या करिअरवर तर होणार नाहीत ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक, शेअर करायला विसरू नका.

🎭 Series Post

View all