लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१७)

Story Of A Girl Who Wants To Achieve Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१७)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                              मॅनेजमेंट

सारा आणि तिचे सर एअरपोर्टमधून बाहेर पडले. रांची एअरपोर्टवरून त्यांना हजारीबागला जायचं होतं. रांचीमधून हजारीबाग साधारण ८९ किलोमीटर अंतरावर असल्याने त्यांचा पुढचा प्रवास गाडीने होणार होता. कॅरलॉन सर तिथे येणार आहेत हे तिथल्या लोकांना माहीत असल्याने त्यांनी त्यांच्यासाठी गाडी पाठवली होती. दोघंही गाडीत बसले.

"सारा! आय हॅव वन क्वेशन." सर अचानकच म्हणाले.

"येस सर." सारा म्हणाली.

"लेट मी टेल हाऊ यू मॅनेज टाईम व्हाईल शूटिंग ऑफ रेकॉर्डस्? इन सच लेस टाईम, तूमने इतने फोटोज् कैसे क्लिक किये? " सरांनी तिला विचारलं.

"सर, आय ऑलरेडी डिसाइडेड द लिस्ट ऑफ सम मुव्हमेंट्स. बिफोर द शूट डे, मैने आपके कुछ आर्टिकल का स्टडी किया था | आपके स्टाईल को सामने रखते हुवे मैने प्लॅन डिझाईन किया था |" सारा बोलत होती.

तिच्या या बोलण्याने सरांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आणि 'नक्की कोणती स्टाईल?' हे आश्चर्याचे भाव उमटले होते. साराने ते सगळे भाव बरोबर हेरले होते. अजून वेळ न दवडता ती बोलू लागली; "मैने आपका एक आर्टिकल पढा़ था; जिसमे आपने बताया है की, अगर एक जगह बहुत देर लगी तो, सामने जो भी अच्छे मुव्हमेंट्स दिखेंगे सबको कॅमेरे में कैद कर लो | बस! यही किया मैने | इस वजह से मुझे एकही जगह पर बहुत फोटो मिल रहे थे बस मुझे कोई भी फोटो सेम ना हो इसका ख्याल रखना था | उसके अलावा मैने मेरी रिस्ट वॉच बिस मिनिट आगे रखी थी, लेकीन टेंशन के मारे में यह बात भुल गई |"

"नाईस. आय लाईक युअर वे ऑफ स्टडी." सर म्हणाले.

"थँक्यू सर. आय जस्ट लर्न इट फ्रॉम यू अँड सम ग्रेट रिसर्चअर्स अल्सो फ्रॉम माय मॉम." सारा म्हणाली.

"मॉम? हाऊ?" सरांनी आश्चर्याने विचारलं.

"सर! मॉम, जो रोज घर संभालती है, एक ही वक्त पर खाना पकाना, मुझे और मेरे भाई को उठाना, दादा - दादी को जो चाहिए वो देना, पापा का टिफीन रेडी रखना और साथ में ही सुबह कोई मेहमान आ गए तो उनको भी क्या चाहिए वो सब देखना, वो भी एक मिनिट इधर उधर न होते हुॅंवे | सो आय लर्न टाईम मॅनेजमेंट फ्रॉम माय मॉम." सारा म्हणाली.

एवढ्यात त्यांची गाडी हजारीबागच्या गेट मधून आत गेली.

"ओके. फ्रॉम टूमारो ऑनवर्डस् वी स्टार्ट वर्क. इफ यू कॅन पास देन ओन्ली यू गेट अ चान्स ऑफ वर्क विथ मी." सर म्हणाले.

"येस सर. आय विल डू माय बेस्ट." सारा आत्मविश्वासाने म्हणाली.

"गूड. कमसे कम टू फील इंडिया प्राऊड तुम तो काम पुरा करना |" सर म्हणाले.

त्यांचा आजवरचा अनुभव त्यांना हे बोलायला भाग पाडत होता. मनातून त्यांनाही कुठेतरी सारा तिच्या करिअरसाठी सिरियस आहे हे जाणवत होतं, पण शेवटी ती भारतीय आहे आणि नक्कीच समाजाच्या किंवा घरच्यांच्या दबावाखाली ती काम मध्येच सोडेल याची त्यांना भीती होती. त्यांचा आजवरचा अनुभव त्यांना असा विचार करायला भाग पाडत होता.

"सर आय एम सिरियस. आय विल प्रुव्ह माय सेल्फ." सारा म्हणाली.

'सर, आजवर असं झालं असेल आणि त्यालाही काहीतरी ठोस कारणं असतील म्हणून झालं असेल, पण मी तुमच्या मनातून ही चुकीची गोष्ट काढून टाकणार. आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला गर्व आहे आणि तुम्हालाही माझं ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर यावर विश्वास ठेवावाच लागेल. एक भारतीय मुलगी काय काय करू शकते हे आता तुम्हाला कळेल.' ती मनातच निश्चय करून म्हणाली.

दोघंही गाडीतून उतरले. सर त्यांच्या काही प्रोसिजर करायला गेले होते तोवर साराने घरी फोन लावला. ती हजारीबागला पोहोचली आहे आणि साधारण दोन ते तीन दिवस तरी तिला तिथे राहावं लागेल हे सांगायला तिने फोन केला होता. ती फोनवर बोलत असतानाच सर तिथे आले तसा तिने बोलणं संपवून फोन ठेवला. सर तिच्याकडे जरा नाराजीने बघत आहेत हे तिला समजलं.

"सर, घरपें जस्ट इन्फॉर्म किया |" सारा म्हणाली.

"ओके. बट आगेसे एैसे नहीं चलेगा | यू केम फर्स्ट टाईम सो आय कॅन अंडरस्टँड ओन्ली धिस टाईम. अबसे वर्क प्लेस से फॅमिली को फोन करना नॉट अलाऊड. नाऊ कम विथ मी." सर म्हणाले आणि पुढे चालू लागले.

साराकडेही आता काही पर्याय नव्हता. तिनेही फक्त "ओके सर" म्हणून विषय संपवला आणि सरांच्या मागे गेली.

एव्हाना संध्याकाळचे साडे पाच वाजून गेले होते. त्या दोघांची राहण्याची सोय तिथल्या वन अधिकाऱ्यांनी जंगलातच केली होती. कच्च्या बांधकामाच्या चार ते पाच खोल्या तिथे होत्या आणि तिथेच कॅरलॉन सर, सारा आणि काही वन अधिकारी राहणार होते. साराला या गोष्टीचं अजिबात नवल वाटलं नाही, तिला माहित होतं जरी आपली परीक्षा असली तरीही जंगलात काम करायचं म्हणजे राहायची सोयसुद्धा जंगलातच होणार.

"सारा! नाऊ यू कॅन गो अँड टेक रेस्ट. फॅमिली को अभिही कॉल करके इन्फॉर्म कर दो; टूमारो यू हॅव टू गिव्ह एक्झाम सो, कोई कॉल ना करे | डे आफ्टर टूमारो यू कॅन गो होम विथ युअर रिझल्ट. एक घंटे के बाद बाहर मिलो." सरांनी तिला सांगितलं.

"ओके सर." सारा म्हणाली आणि तिथेच ओळीने असलेल्या एका खोलीत ती गेली. आधीच प्रवासामुळे तिला खूप थकवा आला होता. त्या छोट्याश्या खोलीतच एक पाण्याचा ड्रम भरून ठेवलेला होता त्यातून पाणी तोंडावर मारून ती जरावेळ बसली आणि मग मोबाईल हातात घेतला तर बॅटरी लो होती. कच्च्या खोल्या असल्या तरीही तिथे एक छोटा बल्ब, टेबल फॅन आणि एका चार्जिंग पॉइंटची व्यवस्था होती. लगेचच तिने फोन चार्जिंगला लावला आणि प्रवासातले कपडे बदलून घेतले. एक दहा मिनिटांची डुलकी काढून तिने घरी फोन लावला.

"हॅलो बाबा आले का घरी?" तिने फोन केल्या केल्याच विचारलं.

"हो मी आलोय. मला माहित होतं संध्याकाळी तुझा फोन येणार तेव्हा तू आधी हेच विचारणार." विराज म्हणाला.

"बाबा मी इथे पोहोचले आणि सरांनी आज मला वर्ल्ड रेकॉर्ड करताना टाईम मॅनेजमेंट कसं केलं? हे विचारलं. तर मी आईचं उदाहरण त्यांना दिलं." सारा म्हणाली.

"अरे वा! छान." विराज म्हणाला.

फोन अर्थातच स्पीकरवर होता. विशाखा आणि साराचे आजी, आजोबा पण सगळं ऐकत होते. इथे विशाखाची मात्र पुन्हा द्विधा मनःस्थिती झाली होती. साराच्या आवाजावरून ती आनंदी आहे आणि तिला या कामासाठी खूप उत्सुकता आहे हे लक्षात येत होतं, पण सकाळी तिच्या आजीने जे काही सांगितलं तेही नजरेआड करून चालणार नव्हतं. ती गप्पच होती.

"आई नाहीये का तिथे? आईऽ बोल ना काहीतरी. उद्या माझी परीक्षा आहे आणि परवा मी पुन्हा घरी येणार आहे." सारा म्हणाली.

"बरं. तू आल्यावर बोलू." विशाखा म्हणाली.

"अगं आई असं का बोलतेय? काही झालंय का?" साराने तिच्या आईचा डाऊन झालेला आवाज ओळखला आणि विचारलं.

"अगं काही नाही झालं आईला. आई कामात आहे ना म्हणून. तू तुझ्या उद्याच्या परीक्षेवर लक्ष दे. तुला काहीही करून पास व्हायचंय." समीर त्याच्या आई आणि आजीकडे बघत "पास व्हायचंय" वर जोर देत म्हणाला.

"हो दादा. चल मग उद्या परीक्षा झाली की मग कॉल करेन. कितपत उद्या वेळ मिळेल सांगता येणार नाही तर माझा फोन आला नाही म्हणून काळजी करू नका. सरांनी आधीच सांगितलं आहे उद्या फोन करायला वेळ नाही मिळणार." सारा म्हणाली.

"बरं. ऑल द बेस्ट सारा." समीर म्हणाला.

सगळ्यांनीच तिला ऑल द बेस्ट दिलं आणि तिने फोन ठेवला.

'आता राघवला पण फोन करून घेते.' तिने विचार केला आणि त्याला फोन लावला.

"हॅलोऽ सारा मॅडम. कसा झाला प्रवास?" त्याने फोन उचलल्या उचलल्या विचारलं.

"मस्त. अर्धा पाऊण तास झाला असेल इथे पोहोचून. उद्या दिवसभर माझी परीक्षा आहे आणि परवा मी पुन्हा महाराष्ट्रात येतेय." साराने सांगितलं.

"गूड. उद्यासाठी ऑल द बेस्ट. तू छानच फोटो काढतेस आणि सरांना देखील ते आवडतील बघ." राघव म्हणाला.

"होप सो. आता उद्याचं उद्या बघू. आत्ताही सरांनी तासाभराने बोलावलं आहे कदाचित स्पॉट बघायला किंवा काहीतरी काम असेल." सारा म्हणाली.

"ओके. मग तू तुझं आवर आपण तू आलीस की भेटून बोलू." राघव म्हणाला.

"हम्म चालेल. चल मग बाय." सारा म्हणाली आणि तिने फोन ठेवला.

अजूनही दहा मिनिटं बाकी होती तोवर तिने आईने दिलेल्या डब्ब्यातून थोडं खाऊन घेतलं आणि बाहेर गेली.

क्रमशः....
*****************************
साराची आजी या सगळ्याला कशी तयार होईल? सारा कॅरलॉन सरांच्या परीक्षेत पास होईल का? तिला आयुष्यभर आजीची नाराजी घेऊनच पुढे जावं लागेल का? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all