लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१२)

Story Of A Girl Who Wants To Achive Her Dreams.


लाईट, कॅमेरा, ऍक्शन (भाग -१२)

© प्रतिक्षा माजगावकर

(सदर कथा पूर्णतः काल्पनिक असून कथेतील सर्व नावे, घटना स्थळे आणि प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.)
***************************
                            कॅन आय?

आज सकाळी सारा लवकर उठली आणि तिचं सगळं आवरून बसली होती. आज तिला पुण्याला जायला निघायचं होतं आणि कॅरलॉन सरांना भेटल्यावरच तिला समजणार होतं तिचं पुढचं ध्येय काय आहे ते. वर्ल्ड रेकॉर्ड करायला जाताना तिला जेवढं दडपण आलेलं नव्हतं तेवढं आज तिला आलं होतं. एकदम शांत बसून ती समीरची वाट बघत होती.

"काय गं सारा? बरी आहेस ना?" तिच्या आजीने तिला शांत बघून विचारलं.

"हो." सारा म्हणाली.

तिचा असा उतरलेला चेहरा कोणालाही बघवत नव्हता पण तिला जास्त समजावून पण तिच्यावर अजून प्रेशर येईल म्हणून कोणीही काहीही बोलत नव्हतं. थोड्यावेळात साराच्याच लक्षात आलं सगळ्यांना आपली काळजी वाटतेय.

"कोणीही काळजी करू नका. मी ठीक आहे. फक्त शांत राहून मी काय ठरवलं आहे? तिथे जाऊन काय बोलायचं आहे? याची उजळणी करत होते." सारा हसत मुखाने म्हणाली तेव्हा कुठे सगळ्यांचा जीव भांड्यात पडला.

"म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर, वाघ शिकारीच्या आधी दोन पावलं मागे जातो तसंच ना?" आजी हसत म्हणाली.

तिचं बोलणं ऐकून सगळेच हसले. आता आजी सुद्धा आपल्या या करिअरसाठी मनाची तयारी करतेय म्हणून साराला बरं वाटत होतं. तिला कधीही घरच्यांच्या मनाविरुद्ध तिचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतंच. तिला सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांच्या साथीने या वाटेने प्रवास करायचा होता, जे आज शक्य झालं होतं.

"चल सारा निघू आता, पुन्हा ट्रॅफिक लागेल." समीर गाडीची चावी घेत म्हणाला.

"हो. एक मिनिट फक्त." सारा म्हणाली आणि रूममध्ये गेली.

"अगं एवढा वेळ इथे बसून होतीस तेव्हा तुला आठवलं नाही का काय राहिलं आहे ते? चल पटकन." समीर ओरडला.

"नको ओरडू रे तिला. थांब पाच मिनिटं." तिचे बाबा तिची बाजू घेत म्हणाले.

यात काही नवीन नव्हतं. समीरने फक्त मान डोलावली आणि तिथेच सोफ्यावर बसला. दोनच मिनिटात सारा आली. तिच्या हातात त्यांचा फॅमिली फोटो होता.

"हा फोटो मला तिथे बळ देईल. काहीही करून मी सरांच्या परीक्षेत पास होणारच." सारा म्हणाली. यावेळी तिच्या डोळ्यात असलेली आग सगळ्यांना दिसत होती.

दोघं जायला निघणार तोवर आजीने साराला थांबवलं आणि तिच्या हातावर दही साखर ठेवलं. एवढ्यात साराचा मोबाईल वाजला.

"दादा, ऑफिशिल मेलला रिप्लाय आलाय. आज दुपारची अपॉइंटमेंट मिळाली आहे." सारा खुशीत म्हणाली.

"बघ, तुझं एक टेंशन हलकं झालं ना? सर भेटणार आहेत तुला. जा बिनधास्त आणि आपण परीक्षा देतोय हे विसरून काम कर." तिचे बाबा म्हणाले.

त्या फक्त एका मेलने तिची कळी खुलली होती. लगेचच दोघं जायला निघाले. गाडीत छान गाणी सुरू होती आणि सारा शांतपणे त्याचा आनंद घेत होती. थोड्याच वेळात दोघं पुण्यात पोहोचले. अजूनही सरांना भेटायला अवकाश होता.

"दादा, अजून वेळ आहे पण सर नक्कीच आत गेले असतील. आपण पण अभयारण्य फिरण्याच्या बहाण्याने सरांच्या मागे जाऊया ना." सारा म्हणाली.

"ठीक आहे. सध्या बॅग ठेव गाडीतच फक्त तुला जे काही कॅमेरा, लेन्स लागणार असेल ते घे." समीर म्हणाला.

दोघंही गाडीतून उतरले. समीरने घरी ते दोघं पोहोचल्याचे कळवले आणि ते आत जाऊ लागले तर एक गाडी तिथे आलेली साराने बघितली. त्या गाडीतून कॅरलॉन सर उतरताना साराने बघितलं.

"दादाऽ ते बघ सर." सारा उत्साहात म्हणाली.

दोघं त्यांच्या गाडीजवळ गेले. आयुष्यात एवढं यश मिळवलं असलं तरीही कॅरलॉन सरांचे पाय जमिनीवरच होते. एकदम साधी राहणी, सतत शिकत राहण्याची जिद्द आणि प्रत्येक गोष्ट आपण नव्याने बघतोय असा त्यांचा दृष्टीकोन त्यांना खास बनवत असे.

"हॅलो सर. आय एम सारा. कॅन आय टेक युअर फ्यू मिनिट्स?" सारा त्यांना म्हणाली.

"हॅलो! येस यू कॅन टॉक, बट मुझे कुछ स्टुडंट्स के इंटरव्ह्यू लेने है |" कॅरलॉन सर चक्क हिंदीत बोलले आणि सारा एकदम चकित झाली.

"सर आपको हिंदी...?" साराने आश्चर्याने विचारलं.

"हा. जैसा देश वैसा भेष |" कॅरलॉन सर एकदम सहज पद्धतीने म्हणाले.

"सर, मै आपकी बहुत बडी़ फॅन हूँ | मेरेपास आपका आज दोपहर का अपॉइंटमेंट है |" साराने उत्साहात सांगितलं.

"ओके. दोपहर कों मिलते है फिर, ऑल द बेस्ट." कॅरलॉन सर म्हणाले आणि ते पुढे गेले.

"दादा, मला खूप भारी वाटतंय. चल आपण पण आत जाऊया." सारा उत्साहात म्हणाली आणि सरांच्या मागूनच काही अंतर ठेवून दोघं जाऊ लागले.

"सारा, सर तसे चांगले वाटले. फक्त जरा कामाच्या बाबतीत जास्तच प्रोफेशनल आहेत. तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे हा." समीरने साराला समजावलं.

"हो दादा. मी माझे पूर्ण प्रयत्न करणार. आत्ता फक्त सरांच्या कामाचं मला जवळून निरीक्षण करायला मिळतंय हेच खूप मोठं आहे. त्याचाच वापर मी त्यांनी घेतलेल्या परीक्षेत करणार." सारा म्हणाली.

त्या दोघांना वाटत असलं की, कॅरलॉन सरांना ते दोघं मागे आहेत हे माहीत नाहीये तरीही त्यांनी दोघांना बघितलं होतं. त्यांना चांगलंच माहित होतं सारा त्यांच्या मागावर आहे पण तसं काहीही न दाखवता ते त्यांचं काम करत होते. अश्यातच दुपार झाली आणि सारा ठरलेल्या वेळे आधीच त्यांनी जिथे भेटायला बोलावलं होतं तिथे गेली. बाहेर असलेल्या कॅफेमध्ये भेटायचं ठरलं होतं. ती बाहेरच उभी होती. थोड्याच वेळात सर आले. ते आत जाऊन बसले.

"सर, कॅन आय कम इन?" साराने परवानगी घेतली आणि आत गेली.

दोघांमध्ये बरंच टेक्निकल बोलणं झालं. ते जवळ जवळ साराचा इंटरव्ह्यूच घेत होते. सारासुद्धा अगदी सहज सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होती. तिच्या हुशारीची चमक तर सरांनी ती अभयारण्यात फिरत असताना ज्या पद्धतीने फोटो काढत होती त्यातच बघितली होती. सगळा इंटरव्ह्यू झाला आणि सर एकदम शांत बसलेले बघून साराला जरा टेंशन येत होतं.

"सर क्या हुवा?" साराने जरा बिचकत विचारलं.

"सारा! आय थिंक यू आर..." कॅरलॉन सर बोलता बोलता थांबले.

"व्हॉट सर? आय एम सिलेक्टेड ऑर?" साराने पुन्हा बिचकत विचारलं.

"सारा लिसन, यू आर व्हेरी स्मार्ट. बट द फॅक्ट इज, ये मैने हर बार देखा है की, इंडिया की लड़कियाॅं वो भी ज्यादा नही कुछ सालो में गिनीचुनी हमेशा मेरे पास आती है मगर सब आधे में छोडकर चली जाती है | सो माय एनर्जी अँड टाईम गेट्स वेस्ट. सो... आय एम सॉरी. आय कान्ट गिव यू द चान्स ऑफ वर्क." कॅरलॉन सर म्हणाले.

"सर प्लीज. आजतक हूवाॅं होगा ऐसा, मगर अब नही होगा | माय फॅमिली इज फुल्ली सपोर्टिंग मी. माना पेहले लड़कीयाॅं बीचमे काम छोडकर वापस गई होगी, लेकीन यहाँ अभी तक लडकियों को ऐसे फिल्ड्स में काम करने नहीं दिया जाता | लेकीन सर ट्रस्ट मी! मै जबतक आपसे सब कुछ ना सिख लू तबतक आपकी असिस्टंट बनके रहुंगी |" साराने तिची बाजू मांडली.

कॅरलॉन सरांनी काहीतरी विचार केला आणि ते म्हणाले; "ओके. आय विल ट्रस्ट यू."

"थँक्यू सर." सारा म्हणाली.

"वेट! फर्स्ट लिसन टू मी, मैं तुम्हारी और टेस्ट लेनेकी सोच रहाॅं हूॅं | अगर तुम्हे मंजूर होगा तो अगले हफ्ते मैं आफ्रिका के जंगलमें जा रहाॅं हूॅं | वही फैसला होगा तुम मेरे साथ काम करोगी या नहीं |" कॅरलॉनने तिला सगळं समजावलं.

'सर ज्या अर्थी माझी अजून एक टेस्ट घ्यायचं म्हणतायत म्हणजे कदाचित माझं सिलेक्शन होऊ शकतं. पासपोर्ट आहे त्यामुळे त्याचा काही प्रश्न येणार नाही. व्हिसा सुद्धा दादा करून देईल. लगेचच उत्तर देऊ का?' सारा मनातच विचार करत होती.

बराचवेळ तिला विचार करताना पाहून कॅरलॉन सर बोलू लागले; "देखा? इंडियाके गर्ल्स की यही प्रॉब्लेम है, ज्यादा सोचना."

"नो सर, एेसा कुछ नही है | मैं तैयार हूॅं | बस व्हिसा का क्या होगा? वह सोच रही थी |" साराने काहीतरी थाप मारायची म्हणून मारली.

"ओके. नाऊ रिलॅक्स! मै अगले हफ्ते इंडिया में ही रेहूॅंगा | जस्ट तुम्हारा सिरियसनेस देखने के लिये मैने एैसे बोला | नेक्स्ट टेस्ट यही इंडिया में ही होगी देन आय कॅन डिसाईड तुम मेरे साथ इंटर्नशिप कर सकती हो या नही |" कॅरलॉन सर म्हणाले.

"ओके सर. आय विल डू माय बेस्ट." सारा हसत मुखाने म्हणाली.

"गूड! बाय द वे तुम वही सारा देशमुख हो ना, हु इज सीलेक्टेड फॉर लिमका बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड?" कॅरलॉन सरांनी विचारलं.

"येस सर." सारा म्हणाली.

तिला माहित होतं सरांना या फिल्ड मधली सगळी अप टू डेट माहिती असते आणि म्हणूनच तिने स्वतःहून तिच्या रेकॉर्डबद्दल सांगितलं नव्हतं.

"आय लाईक धिस. तुम इंटर्नशिप पाने के लिये ये पेहेलेही बता सकती थी, बट तुमने एैसा नहीं किया | आय लाईक धिस काईंड ऑफ अॅटिट्युड." कॅरलॉन सर म्हणाले.

साराने स्मित करून "थँक्यू" म्हणलं.

"ओके देन, ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टेस्ट." कॅरलॉन सर म्हणाले आणि ते तिथून निघाले.

'येस... येस..' सारा तिथेच खुर्चीवर बसून बोलत होती. समीर बाहेरच होता आणि त्याने तिला असं एकटीलाच बोलताना बघितलं.

"सिलेक्शन झालं वाटतं?" समीर तिच्या समोर बसत म्हणाला.

"अरे दादा, झाल्यात जमा आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा एक टेस्ट होणार आहे." सारा आनंदात म्हणाली.

"मस्तच. जाऊया का मग आता घरी? संध्याकाळ झाली आहे. रात्रीपर्यंत पोहोचू." समीर म्हणाला.

"ठीक आहे." सारा म्हणाली आणि दोघं बाहेर आले.

क्रमशः.....
******************************
साराला कॅरलॉन सरांसोबत काम करण्याची संधी मिळेल? ते आता पुन्हा कसली परीक्षा घेणार असतील? सारा त्यात पास होईल ना? पाहूया पुढच्या भागात. तोवर तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? हे नक्की कमेंट करून सांगा.

🎭 Series Post

View all