जीवन..।

जीवन
बगीच्यात फिरत असताना झाडाखाली सुकलेली पान दिसली , ती पान पाहून सुचलेल्या सुंदर ओळी .

                         जीवन

मातीत बी पडल
अंकुर फुटला

हिरव पान
जग पाहू लागल

छोट्या फांदीला
आधार पानांचा

फांदी फांदी
रोप बहरे

फांदीचा आधार
झाडाला

पानाचा रंग
बदलत जाई

हिरव्यातुन
भुरा होत जाई

सुकलेल पान
खाली पडे

मातीतून यायच
मातीतच जायच


Veena