हाॅस्टेल ची लाईफ (भाग 10)

A Life Of Hostel

गीताच्या मैत्रिणी होस्टेलमध्ये गीताला आणायला गेल्या.

गीताच्या मैत्रिणी जेव्हा गीताला होस्टेलमध्ये आणण्यासाठी गेल्या होत्या तेव्हा ती हॉस्टेलमध्ये नव्हती. त्यांना आता खूपच भीती वाटत होती.

त्यांना वाटलं की , \" जर आता गीता सापडली नाही तर त्यांचं काय खरं नाही. त्यांच्या मॅडम त्यांना सोडणारच नाहीत \" हे त्यांना ही नको होतं.

\" आत्ताच त्यांना मॅडम एवढे बोलल्या आणि आता जर गीता सापडली नाही, हे सांगितल्यावर ते तर आमचा जीवच घेतील \" , असं त्या मैत्रिणींना वाटले. 

गीताच्या मैत्रिणी मधून एक मैत्रीण तिचं नाव सरिता होतं ती म्हणाली , “ ऐका ‌, आता कोणी ही मॅडमला यातलं काहीही सांगू नका ! आपण हे आपल्यातच गुपित ठेवूयात. कारण आता जर आपण मॅडमला सांगितलं तर आपलं काय खरं नाही " .

हे सगळं ऐकून त्यांच्यातलीच दुसरी मैत्रीण मोनिका म्हणाली , “ अगं , पण हे चुकीचं आहे ! आता हीच योग्य वेळ आहे , मॅडमला सगळं सांगण्याची. आता आपण मॅडमला सांगितलं नाही आणि जर पुढे जाऊन गीता सोबत काही वाईट घडलं तर सगळं आपल्यावर येईल. हे सगळे आपल्यालाच दोषी ठरवतील. म्हणून आपण मॅडमला आताच जाऊन सगळं सांगूयात " .

सरिता म्हणाली, “ अगं मोनिका , तू डोक्यावर पडलेली आहेस का ? तुला कसं कळत नाही. आता जर आपण सांगितलं तर आपल्याला शाळेतून काढून टाकतील " .

मोनिका म्हणाली, “ अगं , हे कधी ना कधी कळणारच आहे ना मॅडमला मग आताच कळलं तर काय वाईट आहे? मला वाटतं आपण सांगूयात मॅडमला " .

इतर मैत्रिणी या दोघींचं बोलणं ऐकतच राहिल्या . 

मॅडमला वाटलं , \" या मुली , अजून कश्या आल्या  नाहीत \" ?

इतर ज्या मोठ्या मुली होत्या , त्यांच्याबरोबर त्यातीलच  दीपा जी बारावीत होती .

तिला सांगितलं की , " हॉस्टेलमध्ये जाऊन काय झाले आहे , ते बघ " .

दीपा होस्टेलमध्ये गेली, तेव्हा तिने या मुलींना बोलताना बघितलं.

ती त्यांना म्हणाली, “तुम्ही वेडे आहात का ? तुम्हांला मॅडमनी गीताला घेऊन यायला सांगितलं होतं आणि तुम्ही इथे काय गप्पा मारत बसल्या आहात. कुठे आहे गीता ? बोलवा तिला लवकर आणि चला तुम्ही पण " , असं बोलून दीपा तेथून निघून गेली.

गीताच्या मैत्रिणी मधील रेणुका म्हणाली , “ आपण आता जास्त वेळ घालवायला नको . काय ते लवकर ठरवा आणि चला लवकर " .

सरिता म्हणाली , “ मी जे सांगते तेच बरोबर आहे बाकी तुम्हाला जे करायचे ते करा " .

हे ऐकून मोनिका म्हणाली, “ जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर तुम्ही नक्कीच संकटात याल " .

आता इतर मैत्रिणींना कळत नव्हतं  की कोणाचं ऐकावं .

मग त्यानी ठरवलं की , \" आपण मॅडम कडे जाऊयात . ह्यांना  काय भांडायचं ते भांडू द्या. आताची परिस्थिती कळतच नाहीये , यांचं भांडण महत्त्वाचं आहे \" , असं म्हणून इतर मैत्रिणी निघून  गेल्या. 

सरिता व मोनिका हॉस्लटेलमध्येच थांबल्या .

त्यांना कळत नव्हतं की , \" आता काय करायचं \" .

मग त्यांना वाटलं की , \" आता जर हॉस्टेलमध्ये राहिलो तर मॅडमचा शंभर टक्के ओरडा खावा लागेल. त्यापेक्षा इथून गेलेलेच बरे आहे \" .

असं म्हणत सरिता व मोनिका होस्टेलमधून निघून गेल्या......

मोनिकाला वाटलं की , \" जर मी आता मॅडमला सांगितलं तर सरिता माझ्याशी बोलणार नाही \" .

सरिताला वाटलं की , \" आता जर मोनिकाने सांगितलं तर मी तिचं तोंड पण बघणार नाही \" . 

मोनिका मॅडमला काहीच म्हणाली नाही व इतर मैत्रिणी पण गप्प बसल्या. 

क्रमशः



🎭 Series Post

View all