हॉस्टेल ची लाईफ ( भाग 4 )

Story Of A Girl Which Stays In A Hostel

गीता व तिची आई घरी पोहोचले. गीताने तिच्या आईला प्रश्नपत्रिका दाखवली व ती म्हणाली “ आई तु मला सांग की माझे किती प्रश्न बरोबर आहेत. " आई म्हणाली “ मला विश्वास आहे बाळा की तुला चांगले मार्क पडतील." गीता चे किती प्रश्न बरोबर आहेत हे तपासायला आई ने सुरुवात केली. तर तिला या परीक्षेत पास होण्यासाठी 90 ते 100 पर्यंत मार्क हवे होते. पण गीताला 84 मार्क मिळत होते. आईला काळजी वाटू लागली. आई गीताला म्हणाली “ काय गं ? तू किती सोपे सोपे प्रश्न चुकवले आहेत आणि अवघड बरोबर सोडवले आहेत. आणि माझ्या नुसार तुला 84 मार्क पडतील. तू वाईट वाटून घेऊ नकोस, हे अजून नक्की नाहीये. तुझा रिझल्ट आल्यावर कळेल. " 

गीताला चिंता वाटू लागली. पण तिला आनंद ही  होत होता  की तिला चांगले मार्क तर पडले आहेत . आणि  तिला  कसा आहे जायचं नव्हतं. पण तिला चांगले मार्क तर हवे होते. तिने तो विषय सोडून दिला पण तिच्या आईने नाही. ती सतत रिझल्ट आला की नाही ते बघायची. पण गीताने रिजल्टच नाव पण नाही काढला. तिच्या मनासारखं झालं. अन तिच्या आईच्या मनासारखं नाही झालं. असेच काही दिवस लोटले. दिवाळी आली आणि ते गावाला जायला निघाले. दिवाळी खूप छान केली. त्यांनी खूप मज्जा केली. पण गीता ची आई त्या रिझल्टच्या काळजीत होती. दिवाळी झाली आणि गीताचं कुटुंब परत घरी जायला निघाले. ते गाडीत बसले तेव्हा गीताच्या बाबाला फोन आला की तुमची मुलगी जवाहर नवोदय विद्यालय या परीक्षेत पास झाली आहे. तर तुम्ही तिचे काही कागदपत्रे घेऊन या शाळेत. गीताच्या आईने ऐकलं आणि ती आनंदाच्या भरात सगळीकडे सांगत सुटली. गीता च्या आईला काय करू कळत नव्हतं. तिला खूप आनंद झाला होता. पण गीताच्या चेहऱ्यावर हसू काही दिसत नव्हतं.





🎭 Series Post

View all