हॉस्टेल ची लाईफ ( भाग 3 )

Hostel Chi Life Bagha

‌‌ गीताच्या परीक्षेचा दिवस आला होता. ती घाबरली होती. ती परीक्षेच्या ठिकाणी पोहचली. तिच्या आईला खूप काळजी वाटत होती. गीता ची परीक्षा संपेपर्यंत तिची आई बाहेरच थांबली होती. गीताला पेपर सोपा जाईल ना ? तिला सगळ्या प्रश्नांचे उत्तरे येतील ना ? या परीक्षेत ती  पास होईल ना? ती वेळेत पेपर सोडवेल ना? असे अनेक प्रश्न तिच्या आईच्या मनात येत होते. 

परीक्षेची वेळ सुरू झाली , गीता पेपर ची वाट पाहत होती. तिला कधी पेपर हातात येतोय असं झालं होतं. कारण तिला बघायचं होतं की तिने जो अभ्यास केला आहे तेच प्रश्न येतील का. पेपर वाटायला सुरुवात झाली. गीताला जास्तच भीती वाटत होती. शेवटी तिच्या हातात पेपर आला. तिने तो पाहिला आणि सगळ्या प्रश्नांना वाचायला सुरुवात केली. सगळे प्रश्न वाचल्यानंतर तिला आत्मविश्वास आला की हा पेपर खूप सोपा आहे ! तिला खूप आनंद झाला. तिने वेळ न घालवता पेपर सोडवायला सुरुवात केली. पण तिच्या आईला गीताचा पेपर कसा चाललाय हे माहिती नव्हतं म्हणून ती काळजीतच होती.

शेवटचे दहा मिनिटं राहिले होते. गीता चा पेपर झाला होता. ती इकडे तिकडे बघत बसली. तिला असं झालं होतं की कधी ती तिच्या आईला जाऊन सांगते की पेपर खूपच सोपा गेला होता. पेपरची वेळ संपली. ती बाहेर आली तेव्हा तिच्या आईने तिला लगेच विचारलं की “ काय बाळा , कसा गेला पेपर? वेळ पुरला का ? " आनंदाने भरलेली गीता म्हणाली “ हो आई , पेपर कसा गेला विचारूच नको ! खूप सोपा गेला. चल घरी मी तुला दाखवते माझी प्रश्नपत्रिका त्यात तू बघ कसे प्रश्न होते आणि त्याचे उत्तरही सांग मला म्हणजे मला ही कळेल की माझे किती बरोबर आहे. त्यावरून हे कळेल की मला किती मार्क पडतात." 

तुम्हाला काय वाटते तिला चांगले मार्क पडतील का ? ती पास होईल ना? 

तुम्हाला जर अशेच अजून भाग हवे असतील तर मला नक्की FOLLOW करा आणि या भागाला लाईक , कमेंट आणि शेअर करा !! 

मनःपूर्वक धन्यवाद !!

🎭 Series Post

View all