हॉस्टेल ची लाईफ ( भाग 1 )

ही कथा एका मुलीची आहे जिला उत्तम शिक्षणासाठी होस्टेलला राहावं लागतं. तर ती कशी सुरुवात करते याची कथा आहे.

'गीता' एक हुशार, प्रेमळ , धाडसी व निरागस मुलगी होती. तिला अभ्यासाची खूप आवडत होती. ती पाचवी शिकत होती तेव्हा तिच्या आईने ठरवलं की तिला जवाहर नवोदय विद्यालय ची परीक्षा द्यायला लावायची . ती परीक्षा म्हणजे फक्त हुशार मुलांसाठी होती. जे मुलं हुशार आहेत तेच मुलं त्या परीक्षेत पास होतात. तर त्या परीक्षेत जे मुलं पास होतात त्या मुलांना जवाहर नवोदय विद्यालय या सरकारी शाळेत फुकट शिकायची संधी मिळते. तर फक्त फुकट नाही तर चांगल शिक्षणही मिळतं . तर तिच्या आईलाही वाटत होतं की गीताला चांगलं शिक्षण मिळावं व ती मोठ होऊन तिने काहीतरी मोठं करावं . गीता चे बाबा गीता कडे जास्त लक्ष देत नव्हते कारण ते त्यांच्या कामात व्यस्त असायचे. तर तिच्या आईने गीताला खूप समजवलं पण ती ऐकत नव्हती कारण तिला माहिती होतं कि ती हुशार आहे व ती  परीक्षा पण पास होईल पण तिला पास झाल्यानंतर होस्टेलच्या शाळेत राहायचं नव्हतं. पण गीताचं तरी कुठे चुकतय? तीच ही बरोबर आहे की एका अनोळखी ठिकाणी ती तिच्या आई वडिलांना सोडून ती कशी राहील तेही एवढ्या लहान  वयात. पण जर चांगलं शिक्षण हवं असेल तर तिला हे कराव लागेल. तिच्या आजूबाजूला तिच्या हुशारीवर जळणारे खूप लोकं होते म्हणून त्यांच्यापासून जर दूर जायचं असेल तर तिला त्या शाळेत राहावं लागेल असं तिची आई तिला म्हणाली. तर तिची आई गीताचा अभ्यास घ्यायला लागली. गीता खूप हुशार होती पण तिला त्या शाळेत नव्हता जायचं मग ती अभ्यास करत नव्हती. तिची आई तिला मारून ओरडून अभ्यासाला बसायची. किती जरी झाला तर ती तिची आई होती तिला तर गीताच्या शिक्षणाची काळजी वाटणारच. तुम्हाला काय वाटते गीता मनापासून अभ्यास करेन का ? व ती परीक्षा द्यायला तयार होईल का? 


🎭 Series Post

View all