Dec 06, 2021
मनोरंजन

ह्याला जीवन ऐसे नाव. भाग 3

Read Later
ह्याला जीवन ऐसे नाव. भाग 3

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

                                           भाग 3

 

भाग 2 वरून पुढे  वाचा ............

 

मॅडम नी कुक म्हणून काम करशील का  हा प्रश्न विचारला  आणि पंडित गोंधळून गेला. आता काय करावं, हो म्हणावं की नाही या विचारात पडला. शेवटी जो होगा देखा जायएगा असा विचार करून तो म्हणाला –

तुम्हाला मी केलेलं आवडलं असेल तर माझी काहीच हरकत नाही.

पण सगळं सामान सुमान, काय संपलं, काय हवंय, आणि भाजी वगैरे तुलाच आणाव लागणार. जमेल ? मला वेळ नाही होणार.

मॅडम माझ्या जवळ वाहन नाही तेंव्हा रिक्शा चा खर्च होईल.

अरे ठीक आहे. मी तुझ्याजवळ १००० रुपये देवून ठेवते संपले की हिशोब देत जा म्हणजे झालं.

ठीक आहे.

 

An executive officer turned into Full-fledged cook and watchman.

 

पंडितला कळेना की आपलं आयुष्य कुठलं वळण घेतय ते. असं किती दिवस करायचं, ज्याच्या करता नोकरी सोडली, ती भटकंती तर राहिलीच बाजूला. त्याला विचार पडला. रात्रीचं जेवण खाण आटोपल्यावर आपल्या खोलीत म्हणजे आउट हाऊस मध्ये गेल्यावर त्यांनी पुरोहितला फोन लावला. सर्व परिस्थिति अगदी अथ पासून इति पर्यन्त सांगून झाल्यावर त्यानी विचारलं की तो गोंधळला आहे आणि इथे राहायचं की निघून जायचं ते कळत नाही म्हणून तुमचा सल्ला हवाय.

 

हे बघ पंडित, जरा विचार कर, ईश्वरी प्रेरणेनेच नोकरी सोडून तू जगाचा अनुभव घ्यायला निघाला होतास, तसंच नर्मदा परिक्रमा पण त्याच प्रेरणेनेच झाली. आता तुला अनुभव मिळतो आहे तेंव्हा तू तो घे. जे विधिलिखित असेल तेच होतेय. नाही तर तू कानपूरला कशाला उतरला असतास ? आज तू दिल्लीला असायला हवा होतास. तेंव्हा त्रयस्थ नजरेने जे जे घडतंय ते पहा आणि होऊ दे. जर बदल घडायचाच असेल तर तुला आपोआपच प्रेरणा होईल. तूर्तास तरी लाइफ एंजॉय कर. चिंता करू नको सर्व ठीक होईल.

 

पुरोहितशी बोलल्यावर त्याला जरा बर वाटलं. आणि मग त्याला शांत झोप लागली. असेच काही दिवस गेलेत. पंडित आता रुळला होता. वेळेचं गणित पण छान जमलं होतं. मॅडम नी सांगितलं की रात्री जागायची आवश्यकता नाही. त्याचं इथे असणच पुरेसं आहे. त्यामुळे रात्रीची जागरणं पण टळली होती. मॅडम जेवणामद्धे रोज नवी नवी फर्माईश करायच्या आणि पंडित त्या पूर्ण करायचा कसोशीने प्रयत्न करायचा. आणि मॅडमला त्या डीशेस आवडायच्या पण. एक दिवस मॅडम नी सांगितलं की उद्या शनिवारी, संध्याकाळी माझ्या दोन सहकारी मैत्रिणी आणि त्यांचे पती असे चार जण जेवायला येणार आहेत. काय करशील ? त्यांना पूर्ण महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण जेवायचं आहे. तुला पुरणपोळी येते का ?

 

हो. पुरणपोळी, कटाची आमटी, मसाले भात आणि बटाट्याची सुकी भाजी आणि चटणी कोशिंबीर, टोमॅटोच सार. सूप नाही. चालेल ? भजी पण करू.

अरे वा मस्त बेत आहे. कर.

पाहुण्यांनी जेवणाची भरभरून तारीफ केली. मॅडमच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. पंडितला पण बर वाटलं.

 

असेच काही दिवस गेले पण आता या रुटीन चा पंडितला कंटाळा यायला लागला होता. आता य चक्रातून बाहेर पडायला पाहिजे अस त्यांच्या मनाला वाटायला लागलं. बघूया अजून थोडी वाट बघू आणि मग ठरवू, असा विचार करून तो झोपायला गेला. दिवस असेच सरत होते पण आता पंडितला वाटायला लागलं की हेच करायचं होतं तर मुंबईची नोकरी काय वाईट होती. भटकंती करण्यासाठी नोकरी सोडली आणि स्वयंपाक आणि चौकीदारी करतो आहोत, ह्या कोणच्या जाळ्यात येऊन फसलो. अश्या आयुष्यासाठी नक्कीच मुंबई सोडली नाही. त्यांनी पुन्हा पुरोहितला फोन लावला, आणि आपली व्यथा सांगितली.

 

अरे पंडित यात सुद्धा काही ईश्वरी संकेत दडला असेल. जरा धीर धर. भटकंती करायला तुला कोणी रोकलाय ? अजून तुझ्या जवळ भरपूर वेळ आहे. पैशांचाही काही प्रॉब्लेम नाहीये, जेमतेम वर्ष झालं आहे तुला मुंबई सोडून त्यात सात महीने परिक्रमेत गेलेत. पंधरा वीस दिवस वाराणसी मध्ये, थोडी वाट पहा. बघ काय होतेय ते. शांत पणे घे सगळं. पुरोहितशी बोलल्यावर पंडितला नेहमीच बरं वाटायचं. आणि त्याचं बोलणं पण पटायचं. पुरोहित म्हणाला तसं वाट बघायच त्यानी ठरवलं. त्यानंतर त्याला शांत झोप लागली.

 

सकाळी सकाळी मॅडम कोणाशी तरी बोलत होत्या. बोलणं झाल्यावर त्या पंडितला म्हणाल्या की

येत्या रविवारी सत्यनारायणाची कथा करायची आहे. दहा बारा लोक जेवायला असतील. जमेल ना ?

सकाळी की संध्याकाळी ?

संध्याकाळी पांच वाजता पूजा आणि मग जेवण साधारण साडे नऊ होतील.

चालेल. मेनू तेवढा सांगा.

आणि पूजेला जे जे साहित्य लागतं त्यांची लिस्ट त्यांनी पाठवली आहे ती तुला देते. ते सगळं सामान घेऊन ये. अजून पांच दिवस आहेत, तुझ्या जवळ भरपूर वेळ आहे.

ठीक आहे मॅडम.

आणि हो तुला प्रसाद करता येतो का ? की कोणाला तरी सांगू ?

मॅडम इथल्यासारखी पंजीरी येत नाही पण महाराष्ट्रात जसा शिरा करतात तो येतो.

चालेल.

रविवार उजाडला. पूजेचं सर्व साहित्य आणून झालं होतं. मेनू ठरला होता. पंडित ने सगळी पूर्वतयारी पण करून ठेवली होती. पांच वाजे पर्यन्त बोलावलेले सर्व लोक येऊन पोचले होते. पण गुरुजींचा पत्ता नव्हता. येतील थोड्या वेळात असा विचार करून मंडळी गप्पात गुंतली. पंडितने प्रसाद करायला घेतला. साडे पांच पावणे सहा झाले, प्रसाद पण तयार झाला. पण गुरुजी आले नव्हते. शेवटी मॅडम ने फोन लावला. बोलणं झाल्यावर मॅडम च्या चेहऱ्यावर चीड स्पष्ट दिसत होती.

 

क्या हुवा ? पंडत लेट आ रहे है कया?

नही, वो नही आ रहे है.  डायरीमे नोट करना भूल गये थे.  अभि वो किसी दुसरे कार्यक्रम मे है. सो नही आ सकते. अगले रविवार की बात कर रहे है.

अब ? अब कया करना है ?

अब क्या, गपशप लडाएंगे, खाना खायेंगे और फिर घर लौटेंगे. That’s all.

पाहुण्यांपैकी कोणी तरी मुक्ताफळे उधळली

अरे शीलाजी ये पंडत लोग ऐसेही होते है. जो काम करना है वो छोड़के बाकी सब करेंगे. तुम्हारा पंडित भी सिर्फ नाम का पंडत है. कुछ काम का नही.

 

हे ऐकल्यावर पंडितला रागच आला. त्याला खुन्नस चढली. तो मॅडम ना

म्हणाला की मॅडम तुम्हाला चालत असेल तर तुम्ही पूजेला बसा मी पूजा सांगतो.

काय सांगतो आहेस पंडित ? तुला पूजा येते ? नीट येते ?

पंडित ने आपलं जानव काढून दाखवलं आणि म्हणाला हो. चिंता की कोई बात नहीं.

लोकांना मराठी जरी कळत नव्हतं तरी अर्थ कळला.

मॅडम तर नाही पण एक जोडपं मराठी होतं. ते येऊन बसले. मॅडम शेजारी बसल्या.

 

पंडितने या कुंदेन्दू तुषार हार धवला म्हणत सरस्वती वंदन केलं आणि पूजेला सुरवात केली. प्रथम गणेश पूजा, मग श्री सूक्त, मग अष्टद्विक पाल पूजन मग नवग्रह पूजन वगैरे झाल्यावर महीम्न झाल्यावर, विष्णुपूजन आणि विष्णुसहस्त्रनाम झाल्यावर. प्रसादाचा नैवेद्य दाखवल्यावर आशीर्वचन म्हणायला सुरवात केली. मॅडम ना पदर पसरून बसायला सांगितलं आणि सर्व लोकांना अक्षता वाटल्या आणि सांगितलं की तो जेंव्हा तिघांच्या डोक्यावर अक्षता टाकेल, त्या वेळेस सर्वांनी टाकायच्या. आशीर्वचन झालं. फळांची ओटी भरून झाली. आणि पंडितने कर्पूर गौरम आणि मंत्र पुष्पांजली म्हंटली. ती झाल्यावर पूजा संपन्न झाली असं जाहीर केलं. पंडितला आरती आणि कथा येतच नव्हती म्हणून त्यानी ती वगळून टाकली. नंतर काहीतरी सर्वांना पटेल अशी सारवा सारव करणं भाग होतं. फक्त येत नाही अस सांगून भागणार नव्हतं. पण साहजिकच सत्यनारायणाची पूजा करायची आणि आरती आणि कथा नाही हे लोकांच्या पचनी पडलं नाही. त्यांनी लगेच त्या बद्दल विचारलं.  

 

पंडित ज्या प्रसंगाला भीत होता तो प्रसंग समोर येऊन ठाकला होता. त्यानी धैर्य गोळा केलं आणि म्हणाला

हम लोंग पूजा करते है अर्थात हम परमेश्वर की स्तुति करते है. स्तवन  करते है. जैसे मैने अथर्व शीर्ष पढा जो श्री गणेश की स्तुति है. श्रीसूक्त पढा जो मा दुर्गा देवी की स्तुति है, विष्णुसहस्त्रनाम श्री विष्णुकी मतलब सत्यनारायण की ही स्तुति है. और आरती कया है ? वो भी स्तुति है. लेकिन सब लोंग मंत्र जानते नही है इसलीये ऊनकी सुविधा के लीये प्राकृत भाषा मे आरती करनेकी प्रथा चल पडी. अब मै मराठी हूँ. मुझे  हिन्दी आरती आती नहीं है. अगर आपमेसे किसिको आती होगी तो करते है.

 

आरती कोणालाच येत नव्हती, कोणीच बोललं नाही.

अरे पंडित कथा ? वो भी नही हुई, उसके बारेमे आपका क्या कहना है ?

 

ऐसा है, भगवान का नाम एक संकट कालीन दरवाजा है. इंसान जब संकट मे फसता है तभी उसको भगवानकी याद आती है. अब देखिए किसीभी दरवाजे को कबजे याने hinges रहते है. अगर उसको तेल पानी ठिकसे नहीं दिया गया तो दरवाजा जाम हो सकता है. ऐसी हालत मे दरवाजा खुलता नहीं, और बाहर निकलनेका रास्ता मिलता नहीं. इस दरवाजे का तेल पानी है पुण्य की कमाई. और ये कमाई करनेका एक तरीका है की आप आपके अच्छे समय मे भी भगवान को याद करे. न की सिर्फ संकट काल मे. सत्यनारायण की पूजा एक बहुतही सरल और सुलभ भक्ति का मार्ग है. आपने कथा पहले बहुत बार सुनी होगी. पुरातन काल मे इस पूजा के बारेमे बहुत कम लोग जानते थे. सामान्य जनता तक पहुचने के लिए साधारण तौर पर यह सार्वजनिक रूपसे की जाती थी. लोगोंके मनमे ये पूजा करनेकी इच्छा जागृत हो और बहुत असानीसे पुण्य संचय कर सके इसलिए कथा सुनानेकी प्रथा चली. तो ये कथा वास्तवमे लोगोंको जागृत करने के लिए है, अब यहाँ तो पूजा हो गई है और इसका महत्व सबको पता है. इसलिए कथा नहीं सुनाई. और चूँ की मैं रेगुलर पंडित नहीं हूँ, मुझे कथा पूर्ण रूपसे आती नहीं है.

 

पंडित एक और बात समजमे नहीं आई. आपने अगरबत्ती तो जलायी ही नहीं. क्या इसके पीछे भी कोई कारण हैं ?

जी हाँ अगरबत्तीका मसाला बाम्बू के काड़ी पर लगाया जाता हैं.  और बाम्बू एक वर्जित वनस्पति हैं। आपने देखा होगा की शमशान मे भी जिस सीढ़ी पर मृत शरीर को रखा जाता हैं, उसको चीता मे नहीं डालते हैं। उसको तोड़ मरोड़के फेका जाता हैं. अब आपही सोचिए की जो चीज चीतामे भी चलती नहीं हैं वो पूजा मे कैसे चलेगी ? कारण का तो मुझे भी पता नहीं हैं लेकिन कुछ जहरीले वायु निकलते होंगे जो हानिकारक हो सकते हैं. हम धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी बोलते हैं. कहीं पर भी अगरबत्ती समर्पयामी बोलते नाही. सोचिए.

 

कोणीच काही बोललं नाही. सर्वांना बहुधा त्यांनी दिलेलं कारण पटलं असावं. मग त्यानी मॅडमना सांगितलं की सर्वांना आपल्या हाताने प्रसाद वाटप करा. त्यानंतर मॅडमनी एक लिफाफा आणला आणि म्हंटलं की पंडित दक्षिणा. पंडित ने विड्याचं पान, सुपारी पैसा आपल्या हातावर ठेवला आणि म्हणाला की मॅडम फक्त एक रुपया दक्षिणा द्या.

अरे पंडित इतकी छान पूजा सांगितलीस तू, मी हजार रुपये देते आहे.

नको मॅडम मला फक्त एकच रुपया द्या. बाकी तुमच्या नेहमीच्या पंडित ला द्या, किंवा एखाद्या देवळाच्या पूजाऱ्याला द्या. किंवा दान पेटीत टाका.

अस का?

मॅडम हा माझा व्यवसाय नाहीये. मी फक्त तुमची अडचण सोडवली. दक्षिणा घेतली नाही तर तुम्हाला याचं पुण्य मिळणार नाही म्हणून एक रुपया घेतो आहे.

 

लोकांना मराठी जरी कळलं नाही तरी आशय कळला. हॉल मध्ये pin drop silence. पंडित पूजा सांगायला बसला होता म्हणून पाहुण्यांपैकी दोन बायकांनी स्वयंपाकाचा जिम्मा उचलला. जेवण झाल्यावर एकाने  म्हंटले की

पंडित हमारी समजमे ये तो आ गया की आपको आरती और कथा आती नहीं है इसलिए आपने नहीं किया. लेकिन इसके बावजूद आपने जो प्रवचन दिया वो भी अपने जगह पर सही था. लेकिन एक दो बाते और पुछनी थी, पुछू ?

 

सरजी, मैं  बहुत छोटा आदमी हूँ. अगर आप मजाक नहीं कर रहे हैं, तो मेरी समज के अनुसार मैं जवाब दे सकता हूँ.

अरे नहीं नहीं, जिस तरहसे आपने पूजा की हैं, हम आपका मजाक उड़ानेकी सोच भी नहीं सकते. आप हमारे लिए आदरणीय हैं. क्यूँ भाई ?

हाँ हाँ बराबर हैं. सभिने हाँ भरी.

ठीक हैं पूछिए.

आपने शूरवात मे शायद सरस्वती वंदना की.  किसलिए ? सबसे प्रथम गणेश वंदना करते है ना?

आपकी बात सही हैं लेकिन देवी सरस्वती वाणी की देवता हैं. पूजा के लिए मंत्रोच्चार करते समय मेरी वाणी कहीं अटक ना जाए और उच्चार शुद्ध रहे इसके लिए मैंने सरस्वती देविसे प्रार्थना की. अगर आपको कहीं मेरे उच्चारण मे कोई कमी नजर आई होगी तो बता दीजिए, मैं सुधार लूँगा.

अरे, नहीं भाई, हम क्या गलतिया निकालेंगे आपकी, हम तो ये पूछ रहे हैं की, क्या सिर्फ पूजा करनेसे पुण्य बढ़ जाएगा ? और कैसे पता चलेगा ?

नहीं सिर्फ पूजा करनेसे पुण्य मे वृद्धि नहीं होती.

पंडित ये आपने क्या कह दिया, ये तो contradictory statement हो गया.

 

नहीं, ऐसा नहीं हैं. मैं थोड़ा विस्तारसे बताना चाहूँगा. देखिए, आपको पताही होगा की एक लोहेकी पट्टीपर चुंबक घुमानेसे, पट्टी भी चुंबक बन जाती हैं. ये परिवर्तन कैसे आता हैं ? कोई भी पदार्थ अणु ,परमाणु से बना होता हैं. ये अणु किसीभी दिशामे घूमते रहते हैं. इसको random motion बोलते हैं. चुंबक घुमानेसे उसकी गति streamline होती हैं. और इसकी वजहसे वो भी चुंबक बन जाता हैं। ठीक उसी तरह मंत्र जागरण से, आपके दिमाग या मन मे जो विचार हैं, जो भटक रहे हैं, जिस पर आपका कोई कंट्रोल नहीं हैं, वो थोड़े स्थिर हो जाते हैं और आपका मन शांत हो जाता हैं. शांत मनमे अच्छे विचारही आते हैं और अच्छे विचारोसे आप अच्छा काम भी कर जाते हैं. अब आपही  सोचिए अच्छे  काम का फल पुण्य ही होगा. आपने पढ़ा होगा या कहानी मे सुना होगा की पुरातन काल मे राजा महाराजा लोग काफी यज्ञ और अनुष्ठान करते थे, इसकी यही वजह हैं, उनकी सतसद्विवेकबूद्धि कायम जागृत रहती थी और उन्हे प्रजा के प्रति सदाही सजग रहनेके लिए प्रेरित करती थी.

थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. कदाचित पंडित जे काही बोलला त्यावर विचार करत होते बहुधा. पंडित ने एक नी:श्वास टाकला. त्याला वाटलं की त्याची सुटका झाली. हे सर्व तत्वज्ञान त्याच्या साठी पण भारी होतं. तो हे सगळं कसं काय बोलला याचच त्याला आश्चर्य वाटलं. मॅडम त्याच्याकडे आश्चर्यचकित नजरेने बघत होत्या. आधी धोबी, मग फायटर मग चौकीदार मग स्वयंपाकी आणि आता पंडित, संस्कृत मंत्रोच्चार सुद्धा सुस्पष्ट आणि खणखणीत आवाजात, त्यांना कळेना की हा माणूस आहे तरी कोण ? नक्कीच दिसतो तसा नाहीये. सर्व महिलावर्गावर तर मोहिनीच पडल्यासारखी झाली होती. सगळे त्याच्याकडेच बघत होते. पंडितला त्या नजरा झेलणं कठीण झालं. तो बसल्या जागीच चुळबुळत राहिला. त्याला कधी एकदा हे सगळं संपतं अस झालं होतं. तो उठला. मुझे बहुत सारा काम निपटाना हैं, अब मुझे इजाजत दीजिए. अस म्हणून किचन मध्ये जायला निघाला. पण त्याला लोकांनी थांबवलं. लोक अजून काही ऐकायला उत्सुक होते. आता आणखी किती परीक्षा होणार आपली या विचारांनी पंडितच्या पोटात गोळा उठला. पण इलाज नव्हता त्याला ह्या नवीन भूमिकेला न्याय द्यावाच लागणार होता. काही पर्याय उपलबद्धच नव्हता. जमलेल्या लोकांमध्ये कानपूरलाच स्थायिक झालेली दोन मराठी कुटुंब होती. त्यांच्यापैकी एक म्हणाली

पंडित आम्ही मागच्या वर्षी सांगलीला लग्नाला गेलो होतो. तिथे गणेश याग झाला होता. तेंव्हा जसं प्रसन्न वाटलं तसंच आज वाटलं. आमच्याकडे तुम्ही याल का ? यांची पण फर इच्छा आहे गणेश याग करायची. तिचा नवरा लगेच म्हणाला. हो हो खरंच गुरुजी याल का तुम्ही आमच्याकडे ? आम्हाला फार आनंद होईल तुम्ही आलात तर. आता ते संबोधन पंडित न करता गुरुजी करत होते. आता लोक त्याच्याकडे आदराने पहात होते. पंडितला कळेना काय बोलावं ते. मॅडम कडच काम सोडून तो केंव्हाही जाऊ शकत होता पण गुरुजी असा शिक्का बसल्यावर सोडून जाणं अवघड झालं असतं. त्याला typecast व्हायचं नव्हतं. म्हणून तो सुटका करून घेण्याच्या इराद्याने म्हणाला.

खरं सांगायचं तर मी पुरोहित नाहीये. मॅडमची अडचण होती, ती मी सोडवली इतकंच. पुरोहित व्हायचं तर तशी संथा घ्यावी लागते. मला इच्छा होती म्हणून मी हे सगळं शिकलो. पण त्याचा व्यावसायिक उपयोग नाही करता येणार. तसं केलं तर ते चुकीच होईल. आणि म्हणूनच मी तुमच्या विनंतीचा स्वीकार नाही करू शकत. मला माफ करा. पंडितचं उत्तर ऐकून ती मंडळी नाराज झाली, पण त्याला इलाज नव्हता. समारंभ संपला आणि सगळी मंडळी आपापल्या घरी निघाली. पंडित पण सगळी आवरा सावर करून झोपायला गेला.

क्रमश:.........

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

[email protected]

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.

 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

DILIP BHIDE

Retired

Electrical Engineer. And Factory Owner Now Retired