ह्याला जीवन ऐसे नाव भाग 5 ( अंतिम )

व्हॉट नेक्स्ट ? भटकंती ? भारत भ्रमण ? god only knows

भाग 5

भाग 4 वरुन पुढे  वाचा ..............

मॅडम नी request  केली होती की अजून आठ दिवस तरी पूर्वीच्याच भूमिकेत रहा. तो पर्यन्त त्या कुक ची आणि चौकीदारांची व्यवस्था करतील.

मॅडम नी please म्हंटल्या मुळे  पंडितला होकार द्यावाच लागला.

पण दूसरा दिवस रविवार होता आणि बऱ्याच घटनांचा साक्षीदार बनणार होता. सकाळीच मॅडमच्या प्रकृतीची चौकशी करायला, मॅडम ची खास मैत्रीण विशाखा आणि तिचा नवरा आला. थोडा वेळ बोलणं झाल्यावर मैत्रिणीने विचारलं-

अग तुझा पाय मोडला आणि तुझा भाऊ साधी चौकशी करायला पण आला नाही ? लखनौ ला असला म्हणून काय झालं, यायच त्याचं कर्तव्य होतं.

अग कंपनीत खूप काम आहे सुट्टी मिळत नाही अस म्हणाला.

अग मग तुला तरी घेऊन जायचं. ते ही नाही. काय भाऊ आहे.

Actualy तो जिथे paying guest म्हणून रहात होता, त्यांच्याच मुलीशी त्यानी लग्न केलं, हे तर तुला माहितीच आहे, आता त्या घरात त्याचे सासू, सासरे, हे दोघं आणि त्यांचा मुलगा इतके सारे जण राहतात. माझ्याकरता तिथे जागाच नाहीये. म्हणून तो मला नेऊ शकत नाही, अस म्हणाला.

याच भावाचा आई वडील गेल्यावर तू सांभाळ केलास आणि त्याच्याच उज्ज्वल भविष्यासाठी तू लग्न करायचं टाळलस, काय मिळालं तुला ? काय साधलस ?

जाऊ दे ग, उगाच या गोष्टी उगाळून काय फायदा ? Forget it.

पंडितला ही माहिती नवीन होती. पण तो काही बोलला नाही. तो चहा आणि नाश्ता करायला किचन मध्ये गेला. अजून आठ दिवस तरी त्याला याच भूमिकेत राहायचं होतं. तेवढ्यात कॉल बेल वाजली. तो दार उघडायला जाणार होता पण मॅडमनीच दार उघडलं. दारात एक अनोळखी माणूस उभा होता.

अरे ! सुधीर असा अचानक ? फोन तरी करायचास.

बस पाणी देते. अस म्हणून त्या किचन मध्ये आल्या पंडितला म्हणाल्या की त्यांचा भाऊ लखनौहुन आला आहे तेंव्हा नाश्ता वाढव. आणि त्या पाणी घेऊन हॉल मध्ये गेल्या.

हं बोल कसं काय ? सगळं ठीक आहे ना ?

हो सगळं ठीक आहे. मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. अस म्हणून त्यांनी मॅडमच्या मैत्रिणीकडे पाहिलं.

अरे हे लोक घरचेच आहेत त्यांना माहीत नाही असं काहीच नाहीये. तू बोल.

असं पहा ताई, माझं घर आम्हाला आता अपूर् पडतय, तेंव्हा हे तुझं घर विकून तुझ्यासाठी one BHK फ्लॅट घेऊ आणि बाकी रक्कम लाऊन मी three BHK फ्लॅट घ्यायचं म्हणतोय. तुला एकटीला एवढ्या मोठ्या घराची गरज नाहीये म्हणून म्हणतोय .

विषाखालाच राग आला. ती म्हणाली-

शीलाची गरज काय आहे हे तिलाच  ठरवू दे. तू कशाला ठरवतो आहेस ? हे घर तिनेच बांधलं आहे. वडलोपार्जित नाहीये.

पंडितला आतापर्यन्त भावा बहिणीच्या संबंधांची तशी माहिती झाली होती. त्याला पण ही गोष्ट जरा विचित्रच वाटली. बहीण दवाखान्यात होती तेंव्हा आला नाही आणि आता येऊन पैश्यांसाठी घर विका म्हणतोय. आता तो कोण आहे हे मॅडम ला माहीत झालं होतं आणि तो जर काही बोलला तर मॅडम ला वावग वाटलं नसतं म्हणून तो पण म्हणाला-

एकदम बरोबर विशाखा मॅडम. ही गोष्ट शीला मॅडमनीच ठरवायला पाहिजे.

हे ऐकल्यावर सुधीर भयंकर संतापला. विशाखा कडे हात दाखवून म्हणाला-

ये बात हम भाई बहन के बीच की हैं. आप लोगोंको इसमे बोलनेकी जरूरत नहीं हैं और हक भी नहीं हैं. आपके लिए अच्छा हैं की आप चुप रहिए. और, तू कौन हैं रे ? एक अदनासा नौकर. औकात क्या हैं तेरी ? ताईचा नवरा असता आणि तो बोलला असतां तर गोष्ट वेगळी होती तुला काय हक्क आहे मध्ये बोलण्याचा ? जाओ अपना काम करो. फालतू आदमी !

पंडित च्या डोक्यात काय चक्र फिरली देव जाणे. पूजेच्या वेळी त्याला जशी खुन्नस आली होती तशीच ती आत्ता आली. तो एकदम समोर आला. फूलदाणीतलं गुलाबांचं फूल काढून म्हणाला-

सुधीर भय्या, सुनिये तो, it is a good suggestion. आणि मग एका गुडघ्यावर टेकून फूल हातात घेऊन शीला मॅडम च्या समोर उभा राहिला. I love you sheelaa. Will you marry me ?

प्रसंगाला एकदम अनपेक्षित वळण मिळालं होतं. विशाखा, तिचा नवरा दोघंही पंडित कडे पहातच राहिले. सुधीरची अवस्थाही काही वेगळी नव्हती. त्यानी येतांना काय काय घडू शकतं याची मनातल्या मनात अनेकदा उजळणी केली होती पण त्यात हे कुठेच बसत नव्हतं. या अशा अनपेक्षित प्रसंगाला  सामोरं जाण्याची त्याची तयारीच नव्हती. आणि नंतर तर कहरच झाला.

मॅडम पण गोंधळून गेल्या होत्या. पण लवकरच सावरल्या. म्हणाल्या –

Are you serious?

Yes. I am.

Then I say yes.

सगळ्या लोकांना कळेच ना की हे काय चाललंय ? सगळेच मूढ अवस्थेत तसेच  स्तब्द बसले होते. पण पंडित लगेच किचन मध्ये गेला आणि साखरेचा डबा घेऊन आला, आणि मॅडमच्या हातात दिला. चमचा आपल्याच हातात ठेवला. त्याने विषाखाच्या हातावर साखर ठेवली. विशाखा अजूनही भानावर आली नव्हती.

हे काय ? ती म्हणाली.

साखरपुडा. We are engaged. मॅडमनीच उत्तर दिलं.

सुधीरला कळतच नव्हतं की काय करायला आलो होतो आणि काय होऊन बसलं. त्याचं डोकच चालेना. त्यांनी शांतपणे exit घेण्याचाच  पर्याय निवडला.

सुधीर गेल्यावर सुद्धा विशाखा आणि तिच्या नवऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम होतं. मग शीलाने पंडितची सर्व कथा सांगून खुलासा केला. त्यानंतर मात्र त्या दोघांनाही फारच आनंद झाला. तसंही पूजे नंतर पंडितची चौकीदार आणि कुक अशी प्रतिमा त्यांच्या मनातून पुसल्याच गेली होती. आणि आता खुलासा ऐकल्यानंतर तर प्रश्नच उरला नाही.

ही सगळी माहिती मिळाल्यावर पंडितच्या ऑफिस मधून ती पसरली, आणि पंडितच्या कामाची कीर्ती सगळीकडे पासरलेलीच होती, लगेच दुसऱ्या एका कंपनीने त्याला ऑफर दिली आणि कानपूरला पोस्टिंग पण दिलं. लग्न धूमधडाक्यात पार पडलं. लग्न अर्थात पुरोहितनेच लावलं. एका नवीन जीवनाची प्रेममय सुरवात झाली.

आणि भटकंती ? भारत भ्रमण ? god only knows.

🎭 Series Post

View all