Nov 23, 2020
सामाजिक

जीवन-सार

Read Later
जीवन-सार

१.फक्त जन्म देऊन किंवा दूध पाजून कोणी आई होत नसते अस म्हणून त्याने १० वर्षांनी त्याच्यावर हक्क सांगायला आलेल्या देवकीला नाकारून त्याला सांभाळणाऱ्या यशोदेचा हात घट्ट पकडला,आणि यशोदेला त्याच्यासाठी स्वतःचं मातृत्व नाकारल्याचा पुन्हा एकदा अभिमान वाटला.
  २.एकदा प्रेमभंग झालेल्या त्याला त्या नैराश्या तुन बाहेर काढणाऱ्या तिच्या तो नव्यानं प्रेमात पडला. पण तिनसुद्धा धोका दिल्यावर मात्र तो कायमचा कोसळला.
  ३. कटकट वाटणाऱ्या म्हाताऱ्या आईला त्याने बायकोच्या सांगण्यावरून वृद्धाश्रमात सोडले.पण त्याच्या ४ वर्षाच्या मुलाने, बाबा तुम्ही आणि आई म्हातारी झाले की तुम्ही पण इथं राहायला येणार का असं म्हंटल्यावर मात्र त्याचे डोळे उघडले.
  ४.वयाच्या १८ वर्षे आईवडिलांच्या संस्कारात वाढलेल्या त्याने क्षणिक सुखामुळे पुढच्या एका वर्षांत काही अंमली पदार्थसेवन करणाऱ्या व दारुड्या मित्रांच्या संगतीमुळे त्या १८ वर्षांना मातीमोल ठरवले.
   ५.आयुष्याच्या १२ वर्ष त्या वासनासंध नराधमाला मन मारून झेलणाऱ्याला लक्ष्मीची पहिल्यांदा दुर्गा झाली जेव्हा त्याने तिच्या ८ वर्षाच्या कोवळ्या पोरीकडे नजर टाकली.
   ६.स्वतःच्या सासू-सासऱ्यांना वृद्धा श्रमात पाठवणाऱ्या तिने तिच्या आईवडीलांना सोडून वेगळं राहायचा निर्णय घेतलेल्या भाऊ-वहिनीला दूषण लावले.