स्पर्धा - जलद कथा लेखन
शीर्षक - आजकाल लग्न.... भाग 2
शीर्षक - आजकाल लग्न.... भाग 2
कथा मालिका, पात्र काल्पनिक आहे.
दिलीप -"आजकाल लग्न विघ्न का वाटतात तर मधल्या काळात मुली नको म्हणून स्त्रीभ्रूण हत्या केल्या. मुलीचा जन्मच नाकारला. मुलीचं प्रमाण कमी झालं."
सुरेखा - " अहो कसलं मुली खूप आहे लग्नाच्या. "
दिलीप - "आजकाल मुली खूप शिकलेल्या. त्यांना भरपूर मोठे पॅकेज असते. आता त्यांची अपेक्षा त्यांच्या पेक्षा होणाऱ्या नवऱ्याला पगार जास्तच पाहिजे. त्यांच्या नोकरी च्या गावातलाच पाहिजे म्हणजे लग्नानंतर नोकरी चालू राहील. तसे मिळत नाही."
सुरेखा -" तसही आजकाल लग्नाचं वय वाढलं आधी शिक्षण, मग नोकरी, मग सेटल मग लग्नासाठी स्थळ शोधणे करता करता तिशी, पस्तीशी. त्यानंतर लग्न कधी जमणार. मुलं कधी होणार, मुलं मोठी होऊन हाताशी कधी येणार? वय वाढलं की मुलं होण्यासाठी प्रॉब्लेम बायकांचे पी सि ओ डी. आजकाल खूप वाढले. करिअर महत्वाचं वाटत पोर नको म्हणतात."
दिलीप - "लग्नाचे सोहळे झाले. हळद, संगीत, मेहंदी, सिमतीनी, लग्न.... प्री वेडींग फोटो शूट.. लाखो रूपये उडवले जातात. वाचलो रे बाबा या आधी च लग्न झाले. जोरात टाळी स्वतःला देऊन हसतात."
सुरेखा - "आपल्या वेळी योग्य वयात लग्न, मुलं सगळे व्यवस्थित. महिना महिना नातेवाईक घरी राहायला यायचे, तयाऱ्या चालायच्या लग्नाच्या लाडू वळणे, इतर तयाऱ्या छान.. लग्न विधी, देव, ब्राम्हण, अग्निच्या साक्षीने छान लग्न. लग्न सोळा संस्कार पैकी एक आहे."
दिलीप - "आता काहीच राहील नाही.कित्येक पोर लग्नाचं वय उलटून गेलेली लग्न झाले नाही तशीच राहिली."
सुरेखा -"कसा वंश वाढणार. म्हतारपणी या लग्न न झालेल्या मुलं आणि मुलींना कोण पाहिलं? आई, वडील जन्माला कोणाच्या पुरले आहे. भाऊ, बहिणी कोण कुणाचं असतं."
दिलीप -"खरंच अवघड आहे. मुली तडजोड करायला तयार नाही. जास्त पॅकेज पाहिजे. तो जास्त पॅकेज वाला मुलगा नोकरी मध्ये अडकून पडेल त्या मुलीला वेळ कधी देईल?"
सुरेखा -"काही मुली जाती बाहेर प्रेम विवाह पळून जाऊन लग्न करतात. आई वडिलांच्या मनाविरुद्ध. आई वडिलांचे नावं खराब करतात.. नंतर ते लग्न टिकतं ही नाही. आयुष्य खराब करून घेतात हाताने."
दिलीप - "आजकाल लिव्ह इन रिलेशन शिप आले. लग्न न करता सोबत राहणे. लग्नाची जवाबदारी नको. काही अर्थ नाही त्याला. भारतीय संस्कारात बसत नाही. योग्य नाहीच."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी -सांबरे
©®
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा