पत्रास पत्र

पत्रास पत्र की

प्रिय, पत्र

पत्रास कारण की... तुला परत बोलवायचं आहे.

बघ ना, तुलाच पत्र लिहायची वेळ आली माझ्यावर. पोस्टऑफिसच काम आता फक्त ऑफिशियल पत्रव्यवहारासाठी आणि रक्षाबंधनला राखी पाठवण्यासाठीच राहील अस वाटत.

तुला आठवत का 1995मधे तू माझ्यासाठी माझ्याघरी आलास. तेंव्हा शेंडे पोस्टमन काका होते आणि मी 5व्या वर्गात. कुहीवरून सुमतीचे पहिले पत्र आले तेही पोस्टकार्ड. चौथी पर्यंत आम्ही एकाच वर्गात शिकलो. नंतर बाबांची बदली झाली आणि मी मोवडला आले. त्या अजाणते वयात स्लॅमबूक काय हे माहिती नव्हतं पण एकमेकींचे ऍड्रेस मात्र घेतले होते. सुमती कडे लँडलाईन टेलिफोन होता मात्र माझ्याकडे नाही त्यामुळे बोलण व्हायचं नाही. मग काय आम्ही एकमेकींसोबत तुझ्या मुळेच बोलत होतो ना. आणि डोळ्यात तेल घालून तुझी वाट बघायचो. तुझ्यामुळे आम्ही आमचा निकाल, वाढदिवस, दिवाळीच्या शुभेच्छा, दसऱ्याच्या शुभेच्छा सर्व काही तूझ्या पोस्टकार्ड वर लिहून एकमेकींना द्यायचो. हळू -हळू मोबाईलच प्रस्थ वाढत गेलं, आणि तुझा व्यवहार हळू हळू कमी होत गेला. आता तर पोस्टमन दादा येतात ते फक्त राखी घेऊन बँकेचे, LIC चेकागदपत्र घेऊन पोस्टकार्ड आणि अंतरदेशी पत्र तर डोळ्यांनी दिसत नाही. सुमती आणि मी व्हाट्स ऍप वर आहोत मात्र तुझ्याद्वारे जे बोलण व्हायचं ते व्हाट्स ऍप चॅटिंगवर होत नाही.

मी अजूनही तुला जपून ठेवलं आहे, अश्विनी, सारिका, स्नेहा, ज्योती, नीता, अश्विनी चन्नावार, यांनी 2008पर्यंत पाठवलेली सर्व पत्र मी जपून ठेवलीय.

तूझ्या द्वारे व्यक्त होणाऱ्या भावना आताच्या व्हिडीओ कॉल मधेही नाही रे.

कधी कधी वाटत, अस काहीतरी घडाव आणि मोबाईल नाहीशे व्हावे आणि पुन्हा एकदा तुझ्याद्वारे आम्ही एकमेकांशी संपर्क साधावा. त्यासाठी तुलाच पत्र लिहीत आहे तू पुन्हा एकदा माझ्या नवीन पत्त्यावर यावास आणि पोस्टमन दादा "जयश्री तुमच पत्र आलय " अस म्हणून तुला माझ्या हाती द्यावं.

    सरकारी कागदपत्र तर खूप येतात रे माझ्या नावाने पन पोस्टकार्ड आणि अंतरदेशीय पत्र येण्याची आणि ते वाचण्याची वेगळीच गोडी आहे. ❤ तू परत यावास याच आशेत हे खास लिखाण. तुझी खूप आठवण येते. Miss you ❤

                                  तुझीच

                            पत्रवेडी जयश्री

©जयश्री कन्हेरे -सातपुते 

आशा करते वाचकांना हे पत्र नक्कीच आवडेल, तर मग कस वाटलं पत्राला लिहिलेलं पत्र हे कमेंट मधे नक्की सांगा आणि तुमच्या पत्र वाटव्हाराच्या आठवणी कमेंट मधे सांगा. शेअर करायचं असेल तर नावासहित करा ??धन्यवाद ??©जयश्री कन्हेरे -सातपुते