आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांस,
सर्वात आधी मला तुम्हाला हे सांगायचे आहे की,तुमचे आपल्या भारत देशासाठी खूप मोठे योगदान तर आहेच पण तुमचे कार्य हे अतुलनीय असून सर्व भारतीयांना तुमचा त्यासाठी अभिमान वाटतो.
खर तर तुमचा जीवन प्रवास वाचतांना नेहमी प्रश्न पडतो की , एवढया पदव्या तसेच विविध प्रबंध, माहिती तुम्ही कशी आणि तेही कमी वेळात केव्हा लिहीली असेल?
शिक्षणाला पर्याय नाही या मताचे तुम्ही आणि शिक्षणासाठी घेतलेली मेहनत आणि तुमचा खडतर प्रवास पाहून डोळे पाणावतात.
"माणुसकी हाच खरा धर्म", हे तुम्ही तुमच्या कृतीतून सिद्ध केले. समानतेचा अधिकार तसेच प्रज्ञा,शील करुणा ह्यांची शिकवण तुम्ही देताना त्याचे मूल्येही समजावून सांगितलीत.
' विद्वान ' म्हणून तुम्हाला गौरवण्यात आले, तेव्हा तुमच्या आई - बाबांना तुमच्या कष्टाचे चीज झाले असे वाटले असेल.
एक विद्यार्थी हा कसा असावा आणि शिक्षण घेण्यासाठी फक्त इच्छा असावी लागते, ह्याचे तुम्ही एक आदर्शच उदाहरण, तुमच्या शिक्षणाच्या प्रवासातून मांडलेले दिसून येते.
भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर आर्थिक परिस्थिती चांगली होण्यासाठी, तुम्ही पदभार सांभाळताना केलेले काम त्याबाबत सविस्तर माहिती वाचतांना,ते त्यावेळेस किती कठीण होते हे समजते. तरी सुद्धा तुम्ही ते अवघड काम तुमच्या बुध्दीचातुर्याने व्यवस्थित पार पडले.
आज तुमच्या जयंतीनिमित्त तुम्हाला वंदन करून तुमचे विचार लोकांनी सकारात्मक मार्गाने घ्यावेत,असे मला वाटते.
पत्राद्वारे माझे विचार ऐकून घेण्यासाठी तुमचे खूप धन्यवाद.
व्यक्तीस्वतंत्र मिळालेली,
एक भारतीय नारी,
©विद्या कुंभार
एक भारतीय नारी,
©विद्या कुंभार
सदर पत्राचे हक्क लेखिकेकडे आहेत.
फोटो सौजन्य: साभार गुगल
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा