Nov 30, 2021
सामाजिक

मनातील पत्रें. प्रिय बापू... डॉ. अनिल कुलकर्णी

Read Later
मनातील पत्रें. प्रिय बापू... डॉ. अनिल कुलकर्णी

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
प्रिय बापु,
तुम्ही रिटायर होतांय कां?
सार्वजनिक जिवनातून, लोकांच्या मनातून, कृतीतून. आदर्श जेव्हा जयंती, पुण्यतिथी पुरते उरतात तेंव्हा ते फोटो, पुतळे यात बंदिस्त होतात.अब्राहम लिंकनचे मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र व्यवहारात कुठे आहे? ते केव्हांच शाळेच्या भिंतीवर बंदिस्त झालय, खुंटीला टांगलय.जे रूचतं आणि रुजतं ते ज्ञान. जे रुचतं पण रूजत नाही ती माहिती. विचार जेव्हा रूचतात, तेंव्हाच ते आचरणात रूजतात.
तुमची माहिती अनेकांना आहे, तुमचं तत्वज्ञान त्याप्रमाणात रूजलं नाही. अहिंसे पेक्षा हिंसेने सर्व प्रश्न सोडवले जात आहेत.क्रिकेटच्या मैदानात आजही वांशिक टिप्पणी होते.
पिड पराई कोणीच जाणंत नाहीं. चिमुरडीवर अत्याचार करून त्यांना संपवलं जातं, जिवंत बाळं जळतात, माणसं दगड झाली आहेत केवळ मूक साक्षीदार.
तुमच्या फोटोला व समाधीला हार घातले की लोक इतरांचे हार करायला मोकळे.
शिकण्याचे, जगण्याचे संदर्भ बदललें की तुम्ही तीव्रतेने आठवता. तुम्ही जीवनशैली बदलली त्यावेळेस कुणीच मानले नाही,आता विषाणूने बदललेली जीवनशैली प्रत्येकजण आंगिकारत आहे, त्याशिवाय पर्यायच नाही. तुमचें विचार व लोकांचे आचार एकत्र नांदत नाहीत. अस्तित्व धोक्यात येत नाही तोपर्यंत माणसे बदलतच नाहीत. आज माणसे अस्वस्थ आहेत उद्ध्वस्त आहेत. तुमची जीवनशैली अंगीकारायला अजून वेळ आहे,अनेकांना ते कळतं पण वळत नाही. तुम्ही चलनात आहात पण चालण्यात नाही.लोकांना गांधी प्रोजेक्ट करायला आवडतो, पण प्रोटेक्ट करायला आवडत नाही.तुमची प्रतिमा ज्या प्रमाणात वापरली जाते त्या प्रमाणात तुमची प्रतिभा झिरपत नाही किंवा झिरपूं दिली जात नाही.
फक्त स्वतःच्या अस्तित्वाला गांधी नावाची झालर लावण्यात लोक धन्यता मान त आहेत.
तुम्ही सत्याचे प्रयोग केले पण आज असत्याचे प्रयोग यशस्वी होत आहेत.सत्य समोर येऊ द्यायचं नाही हे नवीन तंत्र लोकांनी शोधून काढले आहे. घटना एकच असली तरी अनेक जण अनेक संहितेचा बाजार मांडण्यास उत्सुक आहेत.चरख्यावर सूत काढण्या ऐवजी लोकं ऑनलाईन सुत जमवण्यात व्यस्त आहेत. ज्ञान, कौशल्य, माहिती आता ऑनलाइन विक्रीला तयार आहेत.
पाहून शिकणारे एकलव्य आता नाहीत. ऑनलाइन मध्ये पैसे दिले की कर्तव्य संपलं.कौशल्यापेक्षा कौशल्य प्रमाणपत्र देणाऱ्या अनेक संस्था हात धुवून मागे लागल्या आहेत.द्रोणाचार्य आता खूप स्वस्त झालेत, स्वतःची ते जाहिरात करतात.एकलव्य अंगठा देत नाहीत, तर अंगठा दाखवत आहेत.
विचारात मुलं जरी ऑनलाइन असली तरी आचारात ऑफलाईन झाली आहेत हे त्यांनाही कळले नाही. संवादाचे सुद्धा कष्ट न घेणारी पिढी मूकबधिर झाली आहे.
वृद्धापकाळात नांगी टाकणाऱ्या अवयवांनी शैशवातच नांगी टाकणें सुरू केले आहे. श्रमप्रतिष्ठा जाऊन खोटी प्रतिष्ठा जपण्यात माणसाच आयुष्य चाललें आहे. परिमांण बदलले की परिणांम बदलतात. गांधी, जयंती आणि पुण्यतिथि अभिवादन, पुतळे, चलनी नाणं, लेख,पुस्तकें, एवढ्या पुरते़च तुम्ही सिमित आहात काय? असा प्रश्न पडतो.
जीभ कापून, गुडघा दाबून चित्कार थांबवायचे असेअनेक नवीन तंत्र आता आले आहेत.
मी नशा केली नाही
मी काही सांगणार नाही
हावभांव करणं माझा
जन्मसिद्ध अधिकार आहे
\"माल है क्या\" हीच जीवनाची इतिकर्तव्यता झाली आहे. समाजाचा ताल इतका बिघडला आहे की तुमची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
तुमचा मृत्यू घडवून आणला,पण तुमच्या मृत्यू ने इतिहास घडविला. तुमच्या विचाराने पिढ्या घडवल्या. तुमच्या वैचारिक वारसा अजून जिवंत आहे. तुमची साधी राहणी, उच्च विचारसरणी अजून रुचत नाही, म्हणून रुजत नाही.पैशांच्या मूल्ल्यां पुढे, नैतिक मूल्ये निष्क्रय झाली आहेत.
इन्सान की औलाद ने इन्सानियत कब की छोडी है.
I cannot breathe म्हणणाऱ्याला नऊ मिनिटात त्याचा श्वास जाईपर्यंत गुदमरून मारण्यात येतं. गर्भार हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अनंनस खायला दिलं जातं. अत्याचार सार्वत्रिक झाला की त्याचा वणवा होतो. अनेक अत्याचार घडतात हे ज्याची चर्चा होते तोच अत्याचार समजला जातो. भयानक क्रूर घटना समाजात आधुनिक मोबाईल च्या टिप कागदाने टिपता येतात व व्हायरल करता येतात. जे व्हायरल होतं, त्याची चर्चा होते,त्याच्यावर बुद्धिवंत चर्चा करतात,
सेमिनार, वेबीनार होतात, संशोधन पेपर सादर केले जातात,अनेकांना डॉक्टरेट पदवी मिळते. विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या
कपाटात धूळ खायला अजून एक ग्रंथ कपाटात जाऊन बसतो.
जे जेआजव्हायरलहोतं,तेवढंच आयुष्य दिसतं. सगळ्यांना हिमनगाच टोकच पाहायचंय. कारण ते पाहायला सुखद असतं.
लोकांना सुखाची टुलिप गार्डन पाहायला आवडते. डम्पिंग कचरा ग्राउंड कुणाला चआपल्या सभोवताली नको असतो.
इन्सान की औलाद यंत्रमानव बनत आहे,भावनाशून्य. मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच, आपण कशी दिली याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.
प्रत्येक न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून दिली जात आहे.
शरीर धडधाकट असताना मृत्यूने आपल्या उरावर बसून आपला प्राण घेणे क्लेशदायकच.
एक कृष्णवर्णीयओरडून ओरडून सांगत होता, श्वास घेऊ शकत नाही माझ्या मानेवर गुढगा काढा, मी मरत आहे, मला वाचवा अस असताना सुद्धा पाहणारे ओरडत, चित्रीकरण करत होते. परंतु त्याच चित्रीकरणामुळे जगाने याची देहा याची डोळा लाईव्ह मृत्यू पाहिला आणि सगळे तात्पुरते पेटून उठले.
रंग माणसाच्या जीवनात रंग भरतात माहीत होतं, पण माणसाला उद्ध्वस्त करतात, हे अनेक वर्षापासून पाहतोय.आपल्या आयुष्याचा शेवट कसा आणि कधी होईल हे कुणालाच सांगता येत नाही. \"नरे ची केला हीन किती नर\" आमच्याकडे म्हणले जाते पण एखाद्याचा गुन्हा असेल तरी त्याच्यासाठी कोर्ट आहे. पाशवी अत्याचार होतो तेव्हा माणसे हतबल होतात. मानेवरचा गुडघा नऊ मिनिट काढलाच नाही, मानेवर दाबून ठेवला आणि श्वास घेता आला नाही. श्वास घ्यायला सुद्धा जेव्हा परवानगी लागते तेव्हा जगणं अवघड होऊन जातं. श्वास म्हणजे जीवन. सगळं संपलं असतानाअखेरचा श्वास जीवनाचे The end करतो. अडचणीत माणसं मदत करत नाहीत, चित्रीकरण करतात. कृष्णवर्णीयाला वाचवता आलं असतं, त्यासाठीच पोलीस असतात पण पोलीस आणि जनसमुदाय असतानाही मृत्यू होतो.
श्वापद सगळीकडेच आहेत नवनवीन तंत्र शोधण्यात माणसांचा हात कोणी धरणार नाही, विषाणूचा प्रसारा पेक्षाही त्यांचा प्रसार झपाट्याने होतो.
गुडघ्याने मान दाबत श्वासच चिरडून टाकायचा. फटाक्याने भरलेले अननस खायला देणे. तसं त्रासदायक प्राण्यांना आपण संपवतोच. अनेक हत्या, आत्महत्या यांची दखल घेतली जात नाही. जे दिसतं तेच सत्य,जे viral होतं तेच आणि तेवढेच सत्य. उपद्रव न करणाऱ्या ची हत्या केली की आपल्याला हळहळ वाटतेच. लोक मृत्यू ला जवळ करतात किंवा मृत्यू माणसाला जवळ करतो.
जगायचं कुणी याचा न्यायनिवाडा माणसेंच करत आहेत. प्रत्येक व्यक्ती न्यायालय आहे व स्वतः न्याय-निवाडा देत आहे.
समाधी पूर्वी स्वेच्छेने घेतली जायची आज ती जबरदस्तीने घ्यायला लावली जात आहे.
I cannot breathe म्हणून कुणाला समाधी घ्यावी लागते तर कुणाला पाण्यात तोंड बुडवून जलसमाधी घ्यावी लागते.
दवाखान्यातवास्तव इतकं भयानक आहे की मृत्यूच्या बाहुपाशात जावं लागतं किंवा जावं वाटतं. बेडवर निष्प्राण पडून सलाईन च्या नळ्याकडे पाहण्यापेक्षा घरी जीव सोडलेला अनेकांना आवडतो. आपला मृत्यू आपल्या अंगणातच व्हावा आपल्या आकाशातच व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाचा आंगण, आकाश अवकाश ठरलेलं असतं. जेवढ्या वाटा तेवढया पळवाटा आधीच तयार असतात.दृष्टीआड सृष्टी प्रत्येकालाच आवडते.
संघर्ष जेव्हा दुबळा पडतो तेव्हा अमानवीय शक्तीचा विजय होतो.
ज्याचं त्याचं जीवन म्हणजे ज्याचा त्याचा संघर्षच असतो.
कुणी संघर्षावर स्वार होतो तर कुणाला संघर्षांपुढे हार मानावी लागते. Survival of the fittest हेच जगण्याचं सूत्र आहे. असहाय्य परिस्थितीत , नैराश्याच्या गर्तेत शरीराचा आणि मनाचा दुबळेपणा जेव्हा हातात हात घालून मृत्यूच्या स्वाधिन होतो, तोच अखेरचा श्वास असतो. मनापुढे शेवटी शरीर लुळपांगळ होतं. निसर्गात वर्णद्वेष नाही पण मनात वर्णद्वेष आहे. मनाचा प्रत्येक सेकंद वेगळ्या रंगात रंगलेला असतो. एखाद्या सेकंदात तो आत्महत्या करतो, हत्या करतो, जीवदान देतो, मन दुखावतो, मन प्रसन्न करतो. हे सगळे अनाकलनीय आहे.
चित्रपट चालू असताना आपण फक्त प्रेक्षक असतो.नंतर फक्त समीक्षा आपल्या हातात असते.
भयानक क्रूर घटना समाजात आधुनिक मोबाईल च्या टिप कागदाने टिपता येतात व व्हयरल करता येतात. जे व्हायरल होतं, त्याची चर्चा होते,त्याच्यावर बुद्धिवंत चर्चा करतात,
जेआज व्हायरल होतं तेवढंच आयुष्य दिसतं. सगळ्यांना हिमनगाचं टोकच पाहायचंय. कारण ते पाहायला सुखद असतं.
लोकांना सुखाची टुलिप गार्डन पाहायला आवडते. डम्पिंग कचरा ग्राउंड कुणाला चआपल्या सभोवताली नको असतो.
इन्सान की औलाद यंत्रमानव बनत आहे,भावनाशून्य. मृत्यूचं लाईव्ह रेकॉर्डिंग करून ब्रेकिंग न्यूज पहिल्यांदाच, आपण कशी दिली याच श्रेय घेण्याची स्पर्धा लागली आहे.
प्रत्येक न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून दिली जात आहे.
शरीर धडधाकट असताना मृत्यूने आपल्या उरावर बसून आपला प्राण घेणे क्लेशदायकच. शरीर मरतं,विचार नाही.विचार अमर असतात.विचार हा एक प्रसाद आहे.प्रसादाने भक्ती वाढते,अनुयायीनिर्माणहोतात.अनुयायी पुन्हा विचार पेरतात.विचार हवा तो प्रसार करतात.
शरीरातून आनुवंशिकता वाहते ती विचाराचं वहन करते.विचाराचं कलम केलं की तेही अनेक पिढ्यांपासून चालत राहतं.
जगावर तुमची छाप पडली आहे.जगभर तुमचे पुतळे आहेत.गांधींना कोण ओळखत नाही?आमच्या कडे कुणी आवडलं की फोटोत बंदिस्त करतात व भिंतीला टांगतात. असं केलं की प्रेम ही दिसत व जवाबदारी ही झटकता येते.
बापू तुमच्या साक्षीने फारच भयांण चाललं आहे. तुमची शिडी वापरून लोकांनी आपले मनसुबें पूर्ण केले आहेत.
तुमच्या फोटोला हार व समाधीवर ओंझळभर फुले वाहीली की हवे ते करायला लोक मोकळे होतात.
तुम्ही नोटावरील चित्रांत आहांत, पण निवडणुकीतील नोटाच्या बाबतीत तुम्हीसुद्धा असाह्य आहात. नोटा मध्ये या पैकी कोणीच नको म्हणलं तरी नको ते निवडून येतंच आहेत. नोटा म्हणजे एक वैधानिक इशारा झाला आहे. वैधानिक इशारा दिलं की सरकारचं कर्तव्य संपत, जबाबदारी संपते.वैधानिक इशारा हे गोमुत्रा सारखं शिंपडलं की हवें ते करायला लोक मोकळें. धूम्रपान असो, दारू पिणे असो, चुंबन असो आलिंगन असो ,अश्लीलता, बलात्काराची दृश्य दाखवणं असो, कोपऱ्यात फक्त वैधानिक इशारा लिहायचा.
ऑफिसमध्ये तुमच्या फोटो समोर भ्रष्टाचार होतो, पैशाची देवाण-घेवाण होते.
लोकं इतकी धिट झाली आहेत की स्पर्धक ही आलिंगन, देण्याच्याबहाण्याने परीक्षकांचे चुंबन घ्यायला मागेपुढे पहात नाहीत,इतकी नीतिमत्ता ढासळली आहे.
नव्या नोटा वर ही तुम्हींच विराजमान झालात पण तुम्ही नोटा बंदी,महागाई, भ्रष्टाचार रोखू शकला नाहीत.
गांधी है तो मुमकिन है,म्हणंत,
गांधींच्या फोटोला हार व समाधींवर फुले उधळतां यायला हवीत.खोट्या शपथा घेता यायला हव्यात.
भाषणात गांधीचे गोडवे गाता यायला हवेत.इतकं केलं की सात पिढ्यांची कमाई करण्याचं नवीन तंत्र माणसाने शोधून काढलंय.
भांडणारे गळ्यात पडत आहेत आणि गळ्यात पडलेले भांडत आहेत.
पूर्वी तत्वांसाठी काही पण होतं,आता तत्वांसाठी काहीहीं आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, मानवी व्यवहार भावभावना, सगळेंच गढूळ झालें आहे. चांगल्या विचारांची तुरटी दुुर्मिळ झालीआहे.
राजकरणात गांधी ही पहिली पायरी चढलीच पाहिजे. अनेका साठी,गांधी यशाची पहिली पायरी आहे.
यशोशिखराकडे जाताना पहिली पायरी विस्मरणात जाते. तरीही देशाला आपले विचारच तारू शकतील हा विश्वास तिसरे युद्धहोण्याच्या पूर्वसंध्येला बळावत आहे.
शाळेतल्या प्रतिज्ञेच्या चिंधड्या उडत आहेत.वादामुळे सारे भारतीय माझे बांधव आहेत का? हा प्रश्न पडू लागला आहे. शाळेतील मुले निरागसपणे प्रार्थना व प्रतिज्ञा म्हणायचें, आता यांचीच समाधी झाली आहे. तरुण फ्री काश्मीर ची मागणीकरतात,पोलीसावर दगडफेक करतात,हिंसे मध्ये भाग घेतात. तुमचा अहिंसेचा डोस, कोरोनाचा डोस अनेकांना नकोय.
मतासाठी तुमच्या नावाचा वापर करून जोगवा मागणे आजही सुरूआहे.
नई तालीम शिक्षण पद्धती ही तुम्ही दिलेली अमूल्य भेट होती,पण ती गुंडाळून ठेवली गेली,कारण कुणालाच नको आहे मूल्य आणि श्रमप्रतिष्ठा.
नई तालीम हेच आजच्या शिक्षण पद्धती वर जालीम औषध आहे.पण मस्तका पेक्षा पुस्तकाला महत्व आलंय. पुस्तकात आहे तेवढच वाचायचं, लक्षात ठेवायचं. मस्तकात जे आहे त्याचा विकास करणे अभिप्रेत आहे. शिक्षण म्हणजे स्वतः मधील उत्कृष्ट शोधणे,व त्याला बाहेर काढणे.
गांधी आज पुस्तकात व अभ्यासक्रमात रुतून बसले आहेत, त्यांना बाहेर पडून त्यांच्यासारखें जगलं पाहिजे, तरच प्रश्न सुटतील. तुमचं नाव वापरून अनेकांना राजकारणात यायचंय. स्वतःचा जम बसवण्यासाठी दुसर्यांना फसवायचे आहे.
वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीड परायी जाने रे हे तुमच्याबरोबरच इतिहासजमा झाले आहे.नव्या पिढीसमोर गांधी नाही वेगळी आंधी आहे. तुमचं तत्वज्ञान लोणचं म्हणून चवीपुरतं वापरलं जात आहे.दुसऱ्यांच्या अंगावर कपडे नाहीत म्हणून तुम्ही स्वतः कपड्यांचा त्याग केला. आता अस्तित्वासाठी कपड्यांचा त्याग केला जात आहे, व त्याकडे उत्कृष्ट न्यूड फोटोग्राफी म्हणून पाहिलं जातं. विचार
तोकडे असलें तरी कपडे तोकडे वापरूनअस्तित्व सिद्ध करणारे प्रसिद्ध होत आहेत.
तुम्ही विस्मृतीत चाललांत
तरीही चिरंतन मुल्याप्रमाणे तुम्ही चिरंतन राहणारच.
तुमचाच....
डॉ अनिल कुलकर्णी. A37 सहजानंद सोसायटी कोथरूड. पुणे 411 0 38.
९४०३८०५१५३[email protected]

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Dr.Anil Kulkarni. Pune

Retd.

Ex -Director Education Dept.