विक्रमचं वाचकांना पत्र

Sneha Dongare Bandhan


नमस्कार, हाय हॅलो


 नेहमी आतूरतेने तुम्ही मला भेटायला येता. आज म्हटलं जरा आपण तुम्हाला भेटायला जाऊया. कोणाला शोधताय ? कारखानीस मॅडम! त्या नाही आल्यात. मी एकटाच आलो आहे आज तुम्हाला भेटायला. आल्या असत्या पण मी काही विचारलं नाही. तसंही हल्ली माझ्यासोबत एकही शब्द नीट बोलता येत नाही तिला. तुम्हाला तर माहीतच आहे. असो, एकूणच काय सध्या अनघा आणि सगळेच नाराज आहेत माझ्यावरती अर्थात मीही काही 'गुडबॉय ' नाही हे तुम्हाला आणि मला सुद्धा माहित आहे. मला तर हल्ली नकोसं वाटतं घरातलं सगळं वातावरण. पण नकोसं वाटुन जाणार तरी कुठे? कॉलेज सुटलं की घरी जावं लागतं. मॅडमच्या घरी गेलो असतो for a change पण आमच्या सासूबाई दारात सुद्धा उभं करत नाहीत मला. Hope everything'll be fine. ते राहू द्या. सध्या आमच्याकडे वार्षिक परीक्षांचं वातावरण आहे आणि तुमच्याकडे मस्त गुलाबी थंडी आणि दिवाळी. थंडी म्हटलं की मला आमच्या जुन्या आठवणी आठवतात. आमच्या म्हणजे जितेंद्र, नीतू सोबतच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी नव्हे! मॅडम सोबतच्या आठवणी असं म्हणायचं होतं मला. आम्ही गेलो होतो ना ते रात्रीचं सौंदर्य शोधायला! रस्त्यांवर भटकायला.... हा तर त्या आठवणी. सध्या आठवणींवर दिवस ढकलतोय. पाहू आता पुढे काय होतं ते. पण तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त एन्जॉय करा. एकमेकांची काळजी घ्या आणि माझ्या पुरुष मित्रांनो पाडवा आहे जरा लक्षात ठेवा आणि तुमच्या 'मॅडम' ला गिफ्ट द्यायला विसरू नका. मागे माहिती आहे ना मी जरा गिफ्ट द्यायला उशीर केला तर ही पण खोलीतच ढिम्मपणे बसून राहिलेली. नंतर लॅपटॉप मिळाला तेव्हा जरा खुशी झाली. असो पुन्हा एकदा सगळ्यांना हॅप्पी दिवाली. मी असाच बोलत राहीन. तुम्ही बसालसुद्धा ऐकत. पण सध्या वेळ नाही. तरी आता वेळ काढून तुम्हाला भेटायला आलो होतो. मला माहित आहे मी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. तसं माझ्या फिमेल फॅन्स किती आहेत ते मलाही माहीत नाही आणि अनघालाही नाही. बरंय नाहीतर त्या नताशामुळे काय झालंय ते पाहताय ना! तुम्हा सगळ्या जणींची नावं आमच्या मॅडम ना कळली तर काय होईल माझं God knows. बरं, निघतो आता. चला बाय बाय. पुन्हा एकदा

Happy Diwali. Love You All. 

    तुमचाच विक्रम.

🎭 Series Post

View all