Aug 16, 2022
कथामालिका

सिंह..

Read Later
सिंह..
सिंह (Leo )


रात्रीच्या अवकाशात ठळकपणे दिसणारा आणखी एक मनमोहक तारकासमूह म्हणजे सिंह तारकासमूह होय .सिंह राशीचक्राचा भाग असुन पाचव्या क्रमांकाची रास आहे .

१० ऑगस्ट १५ सप्टेंबर या काळात सुर्य या राशीत मुक्कामाला असतो .

आकाशात हा तारकासमूह सिंहाची आक्रुती दर्शवतो .

मघा , पूर्वा फाल्गुनी व उतरा फाल्गुनी अशी तीन नक्षत्र या राशीत पहायला मिळतील .

यात एक कोयत्या सारखा आकार दिसतो याला सिकल असे म्हणतात .

ही रास निरिक्षण करण्यासाठी मार्च महिना हा उत्तम ..

दिनांक १४ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर या कालावधीत या राशीत उल्कावर्षाव होतो

..ई .स .१८३३ व ई .स .१९६६ रोजी या राशीत प्रचंड उल्कावर्षाव झाल्याच्या नोंदी आहेत

या उल्कावर्षावासाठी टेम्पल -टटल हा धूमकेतू कारणीभूत आहे

.या उल्कावर्षावाला LEONIDS असे म्हणतात .

ग्रीक पुराणांत या अतिशय मोठ्या सिंहाला मारण्याची जबाबदारी ह हर्क्युलिस या योद्धावर सोपवली होती..

मात्र कुठल्याच हत्याराने या सिंहाला जखम होत नसे..

शेवटी हर्क्युलिस त्याच्या मानेवर स्वार झाला.. आणि त्या सिंहाचा गळा दाबला तेंव्हा कुठे तो मेला..

मग त्याने त्या सिंहाचं कातडे सोलून मोठ्या अभिमानानं आपल्या कमरे भोवती गुंडाळले..


आकाशात बऱ्याच राशी अश्या आहेत की, त्यांचे आकार त्यांच्या नावाशी जुळत नाही...

मात्र सिंह राशीत आपण सिंहाची आकृती बऱ्या पैकी पाहु शकतो..


लेखन: चंद्रकांत घाटाळ.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक