
मधुरा आई आणि बाबा . तिघांचं विश्व. अजुन कुणीच नाही. आई आणि बाबा दोघंही नोकरी करणारे. पण मधुराची पूर्ण काळजी घेऊन ,तिच्या वेळा सांभाळून दोघे आपली नोकरी करत होते , तिला जमेल तस सांभाळत होते . पण आजच्या सारखं पाळणाघरात ठेवलं नव्हत .तरी आई जास्त मिळायची . अर्थात आई ची पण कसरत होत होतीच ,पण मधुरा म्हणजे आई चा जीव होती .तिच्याशी खेळणं , तिच्या सोबत वेळ घालवणे . सगळ्या मध्ये मग मधुरा ल आईच लागायची. वॉक असो किंवा भाजी आणायची असो , आईचं कॉलेज असो किंवा बँक मध्ये , सगळी कडे आई सोबत मधुरा असायची. बँकेत लोक म्हणायचे ' ही पण अकाउंट काढणार का ? बरं ,पैसे आण बघू बाळा ' मधुराला राग यायचा. ' हे लोक मलाच का पैसे मागतात ?' . पण अनेकदा मॅडम ची मुलगी म्हणून कॉलेज मध्ये मजा असायची. कधी कुणी चॉकलेट द्यायचं तर कुणी खाऊ . मधुराला आपल्या आईसारखी बोर्ड वर लिहायची. कधी एकदा आईसारखी टीचर होते असं तिला झालं होतं.
बाबा नेहमी कामावर असायचे ...रविवारीही . मग काय आई आणि मधुरा . सकाळचं आवर ,अभ्यास कर , आईला स्वैपाक करायला मदत कर ,संध्याकाळी तिघांनी फिरायला किंवा सिनेमाला जायचं. छान दिवस होते.
मधुरा मोठी झाली , आणि त्यांच्याकडे अजुन एक छोटी परी आली . अगदी मधुरासारखी. गोड. तिचंच नाव मधुरा असायला हवं होतं असं मधुराला वाटलं , पण आईला तिने मीरा नाव ठेवायला सांगितलं . आई बाबांना पण आवडलं. झालं , मधुराचं विश्र्वच बदललं .ती सारखी बाळाच्या मागे. पण काळजी पण घ्यायची बाळाची. दोघी छान मोठ्या झाल्या. अगदी बहिणी - बहिणी शोभायचा .
दोघींची शिक्षणं ,इतर छंद वर्ग सगळं सुरू होतं. आता मधुराच्या लग्नाची तयारी सुरू झाली आणि बघता बघता ती मुंबईला जाऊन स्वतःचा संसार करू लागली. मीरेची मात्र जरा अभ्यासाची परवड झाली. ताईच नाही म्हटल्यावर तिचा चांगलाच हिरमोड झाला होता.पण तिच्या सोबत आई होती . मधुरा आता सेटल झाली होती. एक मुलगा पण होता . त्याचं करण्यात ती रमली होती.पण जमेल तसं माहेरी जायची. घरी सगळ्याना वेळ द्यायची.
आता मधुराच्या मुलाची मुंज होती. तिने पत्रिका छापल्या , मुहुर्त केला , तयारी केली.तेव्हा मधूराची आई म्हणाली आपल्या मावशीला आणि मामाला पण बोलावू. मधुराला काही कळलं नाही . मावशी आणि मामा? आपण त्यांना कधी पहिलाच नाहीये ! काय झालं होतं कुणास ठाउक ! पण आई कधी माहेरी गेली नव्हती एवढं मधुराला जाणवलं. तिने सुद्धा कधी मामा , मावशीला घरी आलेले पाहिले नव्हते . पण मधुराने ठरवले . आता मात्र आई साठी त्यांना बोलवायचे . त्यांना आमंत्रण द्यायचे , जमलं तर फोन लावून बोलायचं ...सांगायचं मी माझ्या आईची मुलगी आहे. म्हणून बोलावते आहे. तिने फोन केला ,पत्रिका मेल केली . सगळे तिच्याशी छान बोलले .नक्की येऊ म्हणून कळवल. मधुराला बरं वाटलं. तिला वाटलं ..इतके वर्ष आईला कधी माहेर नव्हतं का? का आपण गेलो नव्हतो ? लहानपणी वाटायचं की सगळ्यांना मामाचा गाव असतो...आपल्याला कुठे होता ? आपण नेहमी तिघेच असायचो आणि नंतर मीरा आली ...आता तर सगळ्यांना मोबाईल वर डायरेक्ट कॉल करता येतो ...तेव्हा एक शक्य नव्हतं .पण आता नाही. आता सगळे काँटॅक्ट सुरू करायचे. ...आईसाठी.
एका लेकीचा निर्णय...
आणि सगळे मुंजीला आले . सगळे आईला ,मधुराला , मीरेला भेटले. सगळयाच कौतुक केलं . छान दिवस गेला. सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले .
आणि मधुराला आज आई साठी खूप छान वाटलं. तिला आज पहिल्यांदा आई आपल्या माणसांमध्ये रमल्या सारखी वाटली .
आणि त्यानंतर मात्र आई ' माहेरी ' जाऊ शकली . हक्काने. मधुरा सुद्धा आपल्या मावशी आणि मामांकडे जाऊन हक्काने राहून आली.