लेखिका सुप्रिया जाधव : शांत व सोज्वळ व्यक्तीमत्व

ईरा : शब्द व लेखणी यांचा सुंदर मिलाफ
लेखिका सुप्रिया जाधव : शांत व सोज्वळ व्यक्तिमत्व ..!!


शब्दांना सोनचाफ्याचा सुंगध देणाऱ्या लेखिका ..!!

लेखिका जेंव्हा प्रामाणिकपणे लिहीत असतात तेंव्हा त्या समाजातील अनेक घटनांचा साक्षिदार असतात. सभोवार घडणारे बदल त्यांना लेखणीत कैद करु वाटतात ... कधी त्याची उत्तम कथा होते तर कधी कविता , चारोळी , लेख अशा स्वरुपात बहरणारी लेखणी वाचकांना दर्जेदार साहित्य पुरविते.लेखिका म्हणून लिखाणाचा झालेला आनंद अवर्णनिय असतो.
ईराने लेखनक्षेत्रांत पाऊल टाकले आणि अनेक लेखकांचा उदय झाला.आपले लिखाण स्वच्छ मनाने प्रसिद्ध करणारे लेखक ईरावर मनापासून प्रेम करु लागले.वाचक व लेखक यांचा सोनेरी मिलाफ या व्यासपीठावर पहायला मिळाला व एक सौहादपुर्ण वातावरण ईरा व्यासपीठाने निर्माण केले. साहित्यक्षेत्रात एक वेगळे पर्व म्हणजे ईरा..!! ते देते मनाला व जगण्याला नवी उर्मी ...!! या कुटुंबातील थोर लेखिका म्हणजे आदरणीय सुप्रिया जाधव ..!! ईरावर त्यांचे लेखन सतत सुरु असते.शांत , सुस्वभावी व हसरे व्यक्तिमत्व लेखनकलेत आपला प्रभाव टिकवून आहे.छोटे विषयांना सुंदर कलाटणी देण्याची कला फार छान आहे. आपल्या कथेतून चांगला संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न उल्लेखनीय आहे.  त्यांचे सर्व लेखिकांच्याबरोबर मैत्रीचे नाते चांगले आहे.मुलांना शिकवण्यात त्यांचा चांगला हातखंडा आहे.सुसंस्कारीत मुले निर्माण करुन त्यांना ज्ञानाचे धडे देण्याचे अनमोल कार्य त्या करत आहेत.सतत मुलांच्यात गुंतुन रहाणे त्यांना फार आवडते. सर्वांना आदर देणाऱ्या , ओघवती भाषाशैली वापरणा-या , कौटुंबिक जबाबदारी सांभाळून लेखन करणाऱ्या  प्रेमळ व सदाबहार लेखिकेला चांगले आरोग्य , सुखसमृद्धी लाभावी , तुमच्या मार्गदर्शनाने सुज्ञ मुले तयार व्हावीत त्यांचे लेखन  असेच तजेलदार व्हावे यासाठी मनापासून शुभेच्छा ...!!

             ©®नामदेवपाटील