लेखिका शीतल माने : प्रतिभासंपन्नतेची सोनेरी लेखणी

ईरा : लेखणीचा आधार

एक काळ असा होता स्रीयांचे लेखन क्वचितच नजरेसमोर दिसायचे.आपल्यात लिहण्याची प्रचंड क्षमता असूनसुद्धा त्यांचे विचार माध्यमाअभावी रखडले होते.परंतू काळ बदलला आणि परिस्थितीने वेगळी कलाटणी घेतली.प्रसार माध्यमांचा बोलबाला वाढू लागला.माध्यमांतून विचारमंथन होऊ लागले.स्रीही शिक्षित झाली.ज्ञानाने समृद्ध झाली.विचारात परिपक्वता येऊ लागली.विविध क्षेत्रात स्रीयांनी आपला ठसा उमटवला त्यामुळे स्रीयांना आपल्या विचारांची जाणीव झाली आणि मग स्रीने आपल्या जिद्दीने अनेक शिखरे पादाक्रांत केली.माध्यमांची आता रेलचेल वाढली होती आपणही लिहते झाले पाहिजे हि भावना तिला स्वस्थ बसू देईना…!! यासाठी तिने लेखणी हातात घेतली आणि लेखनक्षेत्रांत अभूतपूर्व साहित्याची निर्मिती झाली.
आपल्या मौलिक विचारांची देवाणाघेवाण माध्यमांतून करण्यास लेखिकांंनी सुरवात केली अशावेळी स्री लेखिकेच्या प्रचंड ईच्छाशक्तीने " ईरा " सारख्या प्रेरणादायक व्यासपीठाची निर्मिती महिला लेखिकांंना वरदान ठरली.स्वतः लेखिका असल्यामुळे आदरणीय संजना इंगळे यांनी हक्काच्या शब्दांना आधार दिला.महिलांची लेखणी ख-या अर्थाने इथूनच गती घेऊ लागली.ईरावर महिलांचे लेखनपर्व सुरु झाले.विविधतेने नटलेले त्यांचे विचार वाचकांना कथेतून मनसोक्त वाचायला मिळायला लागले.ईरावर दिर्घकालीन लिहण्याची महिला लेखिकांंची ईच्छा पुर्ण झाली.समृद्ध विचारशैलीने भारलेल्या लेखिका ईराचे नाव अजरामर करु लागल्या.ईरा आता नव्या ढंगात नव्या रुपात सज्ज असून नवलेखकांचे ते हक्काचे व्यासपीठ बनले आहे.
ईराच्या ताफ्यात अनेक गुणी लेखिका आहेत.वेगळ्या धाटणीच्या लिखाणाने त्या प्रसिध्द आहेत.अशाच हरहुन्नरी व बौध्दिक संपन्नता लाभलेल्या लेखिका आदरणीय शीतल माने या आहेत.सातत्यपूर्ण लेखन ही त्यांची खाशीयत आहे.कोणताही गाजावाजा नाही , प्रसिद्धीचा हव्यास नाही , वेगळे विषय घ्यायचे , बदलणाऱ्या समाजाचे निरिक्षण करायचे , कथेतील पात्रांना संवादाने सजवायचे आणि अविश्रांत लेखन करायचे असा सुंदर अविष्कार असणा-या लेखिकेने अनेक कथा लिहल्या.निशिगंधा , लग्नगाठ , अॕडव्हान्स बुकींग , स्विकार , परकाया मानसी ,सुखांत अर्धागिनी , संघर्ष , रेशीगाठ विभक्त आणि विभक्त अशा कथामधून त्यांच्या कल्पक बुद्धिमत्तेची चुणूक दिसते.ईरा आयोजित विविध स्पर्धेत त्या हिरिरीने सहभाग घेतात.ऐतिहासिक चॕम्पियन स्पर्धेत त्यांनी आपल्या संघाचे कल्पक नेतृत्व केले होते.सर्वांना मदत करणे , सुसंवाद साधने , हसतमुख रहाणे प्रेरणा देणे यामुळे त्यांचा सहवास सर्वाना उत्साह देतो.ईरात त्यांचे लेखन बहरत आहे.
अशा या शांत , सयंमी , चतुरस्र लेखिकेचे पुढील आयुष्य असेच निरोगी आरोग्यदायी व समृद्धीने नटावे यासाठी मनापासून शुभेच्छा …!!

लेखनाचा हा जोश
ईरात बहरतो
शीतलजींचा प्रत्येक शब्द
अजरामर होतो

©®नामदेवपाटील