लेखिका मीनाक्षी वैद्य : लेखणीला समृद्ध करणारी प्रतिभावान लेखिका

ईरा : शब्दांची जादू


शब्दांना दिव्य स्वप्न पडावं आणि साहित्यक्षेत्रात अजरामर निर्मिती व्हावी तिथं लेखणीने वाचकांना समृद्ध करुन सोडावे असं अल्पावधीतच माध्यमांच्यात गाजावाजा करणारे नाव म्हणजे " ईरा." सुरुवातीला मोजक्या लेखकमंडळी सामिल होती.हळूहळू लेखकांचा ओढा ईराकडे वाढू लागला.चांगले आणि दर्जेदार लेखकांचे लेखन वाचकांच्या मनाचे ठाव घेऊ लागले.वेगवेगळ्या कथा , कथामालिका यामुळे दिर्घकालीन लेखनातील सातत्यता ईरावर पहायला मिळाली.नवनवीन स्पर्धेचे आयोजन , लेखनाचा योग्य मोबदला , लेखकांचा यथोचित मानसन्मान , लेखनातील समस्यांवर तातडीने मदत , लिखाणास सतत प्रेरणा देणे या सर्व गोष्टींचे तळमळीने नियोजन करणाऱ्या आदरणीय संजना मॕडम व योगिता मॕडम यामुळे साहित्यक्षेत्रात" ईरा " हे बावन्नकशी सोनं आहे यातील एक अनमोल रत्न म्हणजे आदरणीय लेखिका मिनाक्षी वैद्य ...!!

शांतता मनाचा मोठेपणा दाखवते.शांततेत अनेक गोष्टींचा जन्म होतो.शांततेमुळे मनाची पारदर्शकता समजते अशाच शांत आणि मनमिळावू स्वभाव , दिलदारवृत्ती , मदतीची भावना असणा-या , मुलांच्यात रमणा-या , लेखनावर गाढ श्रद्धा असणा-या लेखिका मीनाक्षी मॕडम ईरा व्यासपीठाला लाभल्यामुळे त्यांचे दर्जेदार साहित्य वाचकांना वाचायला मिळाले आहे.त्यांच्या कथेतून समाजातील विविध स्तरातील बदलांचे सुक्ष्म निरिक्षण पहायला मिळते.त्यांच्या स्वभावाप्रमाणे लेखणीने कधीच गाजावाजा केलेला नाही.कधीही प्रसिद्धीचा हव्यास केला नाही.शांत , निर्मळ झ-यासारखे लिहित राहून समाधान देणे हाच शुद्ध हेतू त्यांचा आहे.सख्या तू पैलतिरी , मृण्मयची डायरी , ग...गणवेशाचा , कामिनी ट्रॕहल्स अशा अनेक कथा त्यांच्या प्रतिभासंपन्नतेची चुणूक दाखवतात.संवादाची मार्दवता , सहज सुंदर भाषा , हृदयस्पर्शी विषय , उत्कंठावर्धक कथानक , उत्तम निरिक्षणक्षमता हि त्यांच्या लिखाणाची मर्मस्थाने आहेत.त्यांच्या कविता या हृदयाला भिडणा-या असतात , बहारदार सादरीकरणातून त्यांच्या कवितांचे दर्शन घडते." स्नेहमंगल क्रिएशनव्दारे जीवनातील विविध गोष्टींमध्ये त्या लेखनाच्या माध्यमांतून मदत करतात.ईरा व्यासपीठाने बाल ईरा पेजची निर्मिती केली त्यातही मुलांचे बाल कथा या सादरीकरणातून मुलांना उत्तम मार्गदर्शन केले.त्यांचे बालसाहित्य मुलांना फार उपयुक्त आहे.त्यांचा साहित्यक्षेत्राचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायक आहे.ईरा व्यासपीठाला त्यांच्या रुपाने एक दर्जेदार व अनुभवशिल लेखिका मिळाल्या आहेत.

लेखनक्षेत्रांत आपल्या मनांतील कंगोरे टिपत रहाणे आणि समाजाला चांगले विचार देणे यासारखे समाधान केवळ लेखकानाच मिळाले आहे .यातून मिळणारा निर्भेळ आनंद हा अलौकिक असतो तोच आनंद लेखिका मीनाक्षी मॕडम यांनी जीवनात साध्य केला आहे.कुटुंबाची जबाबदारीचे ओझे पेलत त्यांनी लिखाणाला महत्व दिले आहे.त्यांची ही लेखनकला अशीच बहरत रहावी , त्यांना सुखी व आरोग्यदायी आयुष्य लाभावे यासाठी भरभरुन शुभेच्छा ...!!

              लेखणीने  मुक्त लिहावे 

             अवघे जीवन समृद्ध करावे 

                        ©®नामदेवपाटील