लेखिका धनश्री साळुंखे : वाचनातून लेखणीचा सुखद प्रवास

ईरा : शब्दांची लेखणीला साथ
लेखिका धनश्री साळुंखे : वाचनातून लेखणीचा सुखद प्रवास

जीवन विचारांनी समृद्ध करायचे असेल तर वाचन फार गरजेच आहे.नियमित वाचनाची सवय मनाला योग्य संस्कार व वळण लावते.वाचनामुळे विचार समृद्ध होतात पर्यायाने प्रत्येक ठिकाणी याचा वास्तवदर्शी अनुभव येतो.वाचनाचा छंद मनाला रुंजी घालतो आणि मनमुराद आनंद देतो,वाचनामुळे अनेक व्यक्तीमत्व घडली आहेत , घडत आहेत.अशाच वाचनाची आवड जपणा-यात त्यातून लेखनप्रवास सुखद करणाऱ्या आदरणीय धनश्री साळुंखे या ईराच्या उत्कृष्ट वाचक व लेखिका आहेत.

लेखक अनेक विषय हाताळत लिहीत असतात त्यांना कशाचेही भान नसते इतके ते लिखाणात समरस असतात अशावेळी वाचकांनी त्यांच्या लेखनाला दाद दिली तर ते आणखी उमेदीने लिहतात याचा प्रत्यय ईरा व्यासपिठावर आलेला आहे.ईरावर लेखकांचे लेखन म्हणजे शब्दांचा वर्षाव असतो पण याच लेखनाला एख वाचक म्हणून धनश्री साळुंखे यांनी लेखकांना अचंबीत केलं आहे.दररोज येणाऱ्या लेखकांच्या कथा धनश्रीजी अत्यंत तन्मयतेने वाचतात.केवळ वाचून थांबत नाहीत त्यावर अप्रतिम अभिप्राय देतात .हा अभिप्राय म्हणजे कथेची उत्तम समीक्षा असते.यामुळे लेखक सुखावतो व आपल्या लिखाणाचे सार्थक झाल्याची त्यांना जाणिव होते.हे निरंतर कार्य करणाऱ्या धनश्रीजीनी यात सातत्य ठेवले आहे त्यामुळे ईरावर त्यांची प्रगल्भ वाचक म्हणून ओळख खरोखरच प्रशंसनिय आहे.

वाचनातून आलेल्या अनुभवातून त्यांनी हळूहळू आपला मोर्चा लिखाणाकडे वळविला आणि अल्पावधीतच त्यात यशही मिळवले.कथेची उत्तम मांडणी , भाषाशैली , संवाद , उत्कंठावर्धक शेवट या सगळ्या गोष्टींचे भान राखत दर्जेदार लेखानाकडे त्यांची चाललेली वाटचाल प्रेरणादायक आहे.ईरावर त्यांचे लेखन बहरत आहे.लेखन आणि वाचनाच्या अनोख्या संगमामुळे ईरावर त्यांची प्रतिमा उजळली आहे.अशा या प्रेमळ आणि दुस-यांचा आदर करणाऱ्या , लेखन , वाचनाचा वसा जपणा-या लेखिकेला पुढील लिखाणासाठी खूपसा-या शुभेच्छा …!

©नामदेवपाटील