लेखणीतील दुर्गा

ईरा शब्दांचे सोनेरी विश्व
एक दुर्गा अशीही ..

कांही स्रिया सर्व क्षेत्रात काम करतात परंतु त्यांना प्रसिद्धीचे वलय कधिच नसते.अत्यंत प्रामाणिकपणे काम करायचे व अपेक्षाविरहीत राहायचे असा त्यांचा बाणा असतो.अशाच लेखनाच्या क्षेत्राशी जोडलेल्या दुर्गेशी ओळख झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू समजले.
ईरा व्यासपिठ निर्माण झाले आणि लेखणीच्या भावनांना मुक्त वाट मिळाली.आपले छंद म्हणून जोपासताना एखादे व्यासपीठ मिळावे आणि लेखनाला प्रेरणा मिळावी अशीच परिस्थिती स्री लेखिकांंच्यात झाली.एका स्री लेखिकेने ही महिलांची परवड ओळखली आणि महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि " ईरा " व्यासपिठाची निर्मिती केली.लेखिका निष्ठेने लिहू लागल्या.वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला त्यामुळे लेखनाला गती मिळाली.आज महिला लेखिका आनंदाने या व्यासपीठावर व्यक्त होत आहेत.

ईरा व्यासपीठ गती घेत होते.लेखिकांंचा लेखनाचा प्रवाह वाढत चालला होता.वाचकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच होता.अशाच वेळी निशा थोरे नावाच्या लेखिका ईरावर दाखल झाल्या.आपल्या लेखनात त्यांनी सातत्य ठेवले.अनेक कथा त्या ईरावर लिहू लागल्या.वाचकांची पसंती वाढू लागली तसे निशा थोरे यांच्या लिखाणाला प्रेरणा मिळाली.ईराच्या विविध स्पर्धेत त्या भाग घेऊ लागल्या.अनेक कथा विजयी झाल्या.ईरावरील त्यांची कथा स्पर्श हिचे पुस्तकात रुपांतर झाले.ईरावरील लेखकांच्या त्यांना ब-याच ओळखी झाल्या.साहित्यक्षेत्रातील विविध गोष्टीवर संवाद होऊ लागले त्यामुळे निशा थोरे हे ईरावरील आदराचे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध झाले.या सर्वाची दखल ईराच्या सर्वेसर्वा संजना मॕडम यांनी घेतली आणि निशा थोरे यांना ईराच्या प्रशासकीय सेवेत दाखल करुन घेतले.एकीकडे योगिता मॕडम ईराचे काम बघत होत्या पण ईरावरील नव्या लेखकांना जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य निशा मॕडम यांचेकडे देण्यात आले.

ईरावर चॕम्पियन ट्राॕफीचे दरवर्षी आयोजन केले जाते.तसेच अनेक छोट्या स्पर्धा घेतल्या जातात.या सर्व स्पर्धा आयोजनात निशाजी हिरिरीने पुढाकार घेऊन स्पर्धा व्यवस्थित पार पाडतात.स्पर्धेचे नियम सांगणे , शंकाचे निरसन करणे , लिखानात कांही अडचण असेल तर ती सोडवणे , लिखाणाबद्दल मार्गदर्शन करणे अशा अनेक गोष्टींचा त्या पाठपुरावा करतात.अनेक नव लेखिकांंना त्यांनी एकहाती ईरावर लेखन करण्यास प्रवृत्त केले आहे.

शालेय जीवनापासून लेखनाची आवड जपताना आईवडिलांकडून स्वावलंबनाचे धडे घेऊन शिक्षण जिद्दीने पूर्ण करणाऱ्या निशा मॕडम यांनी नोकरीसुद्धा जिद्दीने मिळवलेली आहे.मिळालेल्या नोकरीत प्रामाणिक काम आसताना माणूसकीचा महिमा कायम ठेवला आहे.कुठे जाईल तिथं माणसे जोडण्याचे काम त्या मनापासून करतात.अकौंट विभागात जबाबदारीचे काम करताना त्यांनी लेखनाचा छंद जपला आहे.त्यातूनही वेळ काढून त्या स्वतः कथामालिका लिहतात.ईराच्या स्पर्धेचे नियोजन करतात. लेखिकांंचा शोध घेऊन त्यांना ईरावर लिहायला प्रोत्साहीत करतात.कौटुंबिक जबाबदारीचे भान राखत इतक्या सा-या गोष्टी करणे स्रीला सहज जमते हे त्यांनी दाखवून दिले आहे.लेखनक्षेत्रात स्वतःला वाहून घेणाऱ्या लेखिका फार कमी असतात पण निशा मॕडम यांनी साहित्यक्षेत्राला लेखणीबरोबरच माणूसकीचा सेतू बनवण्याचे धिरोदत्त कार्य केले आहे.लेखनक्षेत्रातील या नवदुर्गेला व त्यांच्या कार्याला सलाम ..!! असेच कार्य करून जीवन आणखी प्रेरणादायक बनवा ..!!

विविध क्षेत्रांत महिला काम करतात पण लेखन क्षेत्रातील असे कार्य दुर्लक्षित राहते यासाठी निशाजींचा हा केलेला गौरव सर्वाना प्रेरणा देणारा ठरावा.

©®नामदेवपाटील