Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

लेखणीची किमया

Read Later
लेखणीची किमया

लघुकथा

नाव - लेखणीची किमया

विषय -  आणि ती हसली

फेरी - राज्यस्तरिय लेख / लघुकथा स्पर्धा


ऐका एका स्त्रीची कहाणी. आटपाट नगर होतं. जमिन-जुमला,

धनधान्याने अगदी समृद्ध. अशा या नगरात अनेक घरांमधील..

स्त्रियांना लेखनाची आवड होती. एखादा कागद किंवा वही..

घेऊन त्यात त्या आपल्या मनातल्या गोष्टी लिहायच्या.त्यांचा

तो जणू छंद होता. पण त्यातली एक स्त्री आणखीनच दुःखी -

कष्टी होती. मनातल्या मनात झुरणारी. उपाय काही सापडेना.

काय करावं कळेना. मग तिने तिच्या लेकीला फोन लावला.

 'अगं समू कशी आहेस ?'

 'अगं मी ठिक आहे.लेक म्हणाली.'

लेकीने आपल्या आईचा आवाज ओळखला. आई काय झालं , 

बरं नाही कां गं ? 

काही नाही गं....

मन उदास झालंय. आई उत्तरली.

अगं घरात कशाला कमी नाही. पण मनाला सुख नाही.

काय करू मी ?

कसं करु?

आईच्या सर्व गोष्टी आता लेकीच्या लक्षात आल्या.

ती काय समजायचं ते समजली. आईला लिहिण्याची आवड.

व्यक्तीचा एखादा छंद त्याला स्वस्थ बसू देत नाही. लेकीने आईला

एक उपाय सांगितला. 'उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.'

' उरणार नाही, मातणार नाही , घेतला वसा टाकणार नाही.'

आई बोलली. आई तुझी लेखणीच तुझी प्रतिभा आहे. लेक सांगू..

लागली. अगं आई असं कर. 'ईरा ब्लाॅगिंग ' नावाचा ॲप उघड.

आणि त्यावर लिहायला सुरुवात कर. सुरुवातीला काही अडचणी .

येतीलच. त्यावर त्यांच्याकडे उपाय आहे. त्यांची एक टीम आहे.

कुठलीही अडचण आली की त्यांना तू विचार. अगदी छान

समजावून सांगतील ते सर्व तुला.

आई सुखावली . पण तिला अॅप उघडणं जमेना. पुन्हा लेक..

तिच्या मदतीला धावून आली 'आई, जमतंय नां गं?

लेकीनं विचारलं.' नाही ग मला अॅप उघडायला जमतचं नाहीआहे.

थांब आई,मीच येते. लेक म्हणाली.

आणि दुसऱ्या दिवशी येऊन तिने आईला तिच्या मोबाईलवर

ईरा ब्लॉगिंग ॲप डाऊनलोड करून दिला. सर्व माहिती

समजावून सांगितली व ती निघून गेली.


आईचा आनंद गगनात मावेना. काय लिहू मी काय नको

असं तिला झालं. घरातील काम पटापट आटोपून ती ब्लॉग 

लिहायला बसायची. तिला प्रसन्न वाटू लागलं. घरची कामं..

सांभाळून ती आता तिचा छंद जोपासू लागली. शरीराचे दुखणे

विसरली. तिला उमगलं की मनाला निरोगी ठेवणंही तितकंच

महत्त्वाचा आहे. सारखं सारखं मनात झुरत राहिलो तर अनेक

आजारांना निमंत्रण मिळतं.' शरीर स्वस्थ तर मन स्वस्थ.'

अशाप्रकारे तिने स्वतःला लेखनामध्ये गुंतवून घेतलं. लिखाणाचा

छंद जोपासताना कधी कधी ती लिखाणात दंग व्हायची.

घरातल्या कामाचा विसर पडायचा. नवरा म्हणायचा 'अगं..

आज जेवायचं नाही कां? अहो जेवून घ्या तुम्ही. मी जेवते नंतर.

असंच व्हायचं. काही करायचं म्हटलं तर असं होणारचं...

गोष्टी मागेपुढे व्हायच्याचं. त्यासाठी तिने वेळेचे नियोजन करायचे 

ठरवले. अशा तऱ्हेने वेळेचे नियोजन झाले. आणि काळ-काम-..

वेग यांचे गणित सुटलं. आता तिच्या मनीचं आभाळ निवळू लागलं.

शुगर लेव्हल कंट्रोल मध्ये आली. आनंदाचं नवीन तंत्र उमगलं.

आणि ती मनाशीच खुदकन हसली.


वास्तवाच्या पायावर उभी राहू लागली. हळूहळू तिची लेखणी

सुधारली. आता ती ईरा वर ब्लॉग टाकू लागली. त्यात तिला

आणखीनच आनंद मिळू लागला.

अशातच  '  ईरा राज्यस्तरीय साहित्य करंडक स्पर्धा '

घोषित झाली. स्पर्धेत भाग घ्यावा असं तिला मनापासून वाटू लागलं.

पुन्हा अडचणी. पण ज्या काही अडचणी येतील त्या सोडवू पण..

स्पर्धेत मात्र भाग घ्यायचाचं असं तिनं मनाशी ठरवलं

लेकीचाही आग्रह'आई तू स्पर्धेत भाग घे .स्पर्धेसाठी तिनं..

आपलं नाव दिलं. लेकिन सांगितलं, आई काही अडचण आली तर..

मला सांग. आणि तिने ईराच्या प्रशासकीय टीमची माहिती

आईला दिली. अग आई, काही काळजी करू नको. अगं,

तुझ्या मोबाईल मधील शब्द मैफिल या ग्रुपवर देखील वेळोवेळी

सूचना दिल्या जातात. त्या वाचत रहा, म्हणजे तुला त्याची

मदत होईल.


स्पर्धेचे नियम, वेळापत्रक यासंबंधी तुला काही अडचण आली तर

निशा थोरे मॅडमला मेसेज कर.

पेजवर ब्लॉग येण्याविषयी काही अडचण असेल तर योगिता

मॅडमला मेसेज कर.

सारंग चव्हाण सरांना तुझ्या कथा, कविता चेक करायला

तू सांगू शकतेस.

आणि हो एखादेवेळी ॲप, वेबसाईट याविषयी काही अडचण 

आली तर शुभम मटाले सरांना मेसेज कर.

अगं आणखी तुझ्या मैत्रिणी आहेतच की ग्रुप वरच्या.

निता, संगिता,छाया, समृद्धी, अश्विनी,रोशनी,वृशाली, मृणालताई.

तूच तर नेहमी सांगत असते ,आमचा ग्रुप खूप छान आहे.

निता,संगिता,छाया त्या तर मला नेहमीच मदत करत असतात.

मग आता तुम्ही सर्वजणी मिळून एकमेकींमध्ये चर्चा सुद्धा

सुद्धा  करता येऊ शकते. अगदी बिनधास्त तू या स्पर्धेत भाग घे.

अगं, तूच तर आम्हाला एक सुविचार नेहमी सांगत असते.

 ' धोके पत्करा, जिंकलात तर कॅप्टन व्हाल, आणि हरलात तर

इतरांना मार्गदर्शन कराल. 'अन् आता तूच विचार करतेस.'

लेकीचे म्हणणे तिला पटले. तिने आपले वाचन वाढवले.

स्पर्धेची तयारी सुरू केली. जगण्यातला आनंद जणू ती टिपू लागली.

एक एक करून लघुकथा, कविता लिहू लागली. आणि स्पर्धेसाठी

ईरा ब्लॉगवर टाकू लागली. मनातून खूप आनंदीत झाली.

समाधानाची बकुळ फुलं वेचू लागली. थोडा आनंद इतरांनाही

वाटू लागली.


गावातील ज्या ज्या स्त्रियांना लेखनाची आवड होती त्यांना त्यांना

ती आता ' ईरा ब्लॉगिंग ॲप 'विषय माहिती देऊ लागली.

त्यांना यथाशक्ती मदत करू लागली. त्यांच्या अडचणी सोडवू..

लागली.

आता तिच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. एक

आत्मिक तेज तिच्या चेहऱ्यावर झळकत होतं. अगदी

सुहास्य वदनाने ती आता वावरत होती.

अशी ही एका स्त्रीची कहाणी ईरा ब्लॉगिंग मुळे सुफळ..

संपूर्ण झाली. तशीच ती सर्वांची होवो. ही साठा उत्तराची

कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


लघुकथा आवडल्यास लाईक व कमेंट जरूर करा.

समाप्त.

धन्यवाद.

लेखिका- सौ.रेखा देशमुख

टीम-अमरावती


.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//