लेखणी एक अस्त्र...

Lekhani ek astra

लेखणी एक अस्त्र...

आंबेडकर म्हणाले होते की "एका लेखणीत हजार तलवारीची ताकद असते" ते आजच्या काळात अगदी सत्यच ठरत आहे कारण हजार तलवारीने जरी पराक्रम केला आणि लेखणी कुचकामी निघाली तर त्या हजार तलवारीचे कर्त्रुत्व नाहिशे होते. लेखणीत खूप ताकद आहे, जे जग बदलवू शकते.

लेखणी ही बुद्धिमत्तेची सूचक आहे, ते आपले विचार व्यक्त करण्याचं साधन आहे, लेखणी विचारक्रांतीची समर्थक आहे. ज्ञानाचा प्रचंड साठा जो जगात आज टिकून आहे तो लेखणीच्या चमत्काराचा परिणाम आहे. लेखणीनेच व्यास आणि वाल्मिकी, कालिदास आणि भावभूती, शेक्सपियर इत्यादींना अमर बनवले आहे.

महाभारत, रामायण, शकुंतल, हॅमलेट, गीतांजली इत्यादी साहित्य लेखणीमुळेच उदयास आले. ज्ञानाचा दिवा लावून त्यांनी जगात प्रकाश पसरविला आहे. जी शक्ती तोफ, तलवार आणि बॉम्बच्या अनेक गोळ्यांमध्ये सापडत नाही ती शक्ती लेखणीमध्ये लपलेली आहे. लेखणीमधूनच अक्षरांच्या ठिणग्या आणि विचार बाहेर पडतात.

लेखणी माणसांच्या मनात क्रांती घडवू शकते. लेखणी एखादया व्यक्तीचं जग बदलवू शकते, विचार बदलवू शकते.


लेखणीने अनेक क्रांती घडवून आणल्या आहेत जगातील अनेक महापुरुषांनी आपल्या सशक्त लेखनातून आपल्या काळातील विचारात क्रांती घडवून आणली आहे.

लेखणी शक्तिशाली साधन आहे.
लेखणी एक अस्त्र आहे, जे जग बदलवून टाकतं.

ईरासाठी झोकून दिले स्वतःला
संसाराचा गाडा सोबत घेऊन
बीज रुजवलं साहित्य सेवेचं
कार्य हाती घेतलं लेखणीचं...