लेखाचा धसका घेतलेले आजोबा

Social Media And Life


रघु आजोबा म्हणजे एकदम दिलदार व्यक्तिमत्व...सत्तरीला पोहोचलेलं शरीर विशितल्या तरुणाला लाजवेल असे..अंगकाठी मध्यमच होती..."जिंदगी एक सफर सुहाना"म्हणत प्रत्येक क्षण वेचून वेचून जगणारे..

त्यांची बायको गेल्यावर्षी आजाराने गेली..रघु आजोबा वर्षभर आपले नाराजच होते... एक दिवस नातवाने आजोबांना टच स्क्रिन चा फोन आणून दिला तेव्हापासून आपले त्यात गर्क झाले..


आजोबांचा छंद म्हणजे लेख वाचने ,कविता वाचणे....जे जे आवडेल ते आपल्या मित्रांना फॉरवर्ड करणे... त्यावर कोणी खूप छान असं म्हंटलं तरी आजोबा फार खुश....दिनक्रम असाच चालू होता..

सकाळचा नाश्ता झाला की आजोबा आपल्या एकमेव साथीदारासोबत रंगून जात....

सहज फेसबुक वर एक लेख वाचला..

Title होते..

"हार्ट अटेक येण्याआधी शरीर देते हे संकेत"


पूर्ण लेख वाचला...
आणि त्या संकेताशी आपलं काही मॅच होतंय का ते पाहू लागले..

काही लक्षण तर मलाही जाणवतात..

रघु आजोबांनी डोक्यालाच हात लावला..देवा मला येतो की काय अटेक??

पुन्हा त्याच्या खाली लेख आला.."किडनी खराब झाल्याची लक्षणं"


आधीच त्या अटेकची लक्षण वाचून गर्भगळीत झालेले रघु आजोबा अजूनच घाबरले..


नको बाबा हे असलं काही वाचत बसायला म्हणत फोन बाजूला ठेवला...


तेवढयात नातू आला..नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवणारे आजोबा तोंड पाडून बसले होते..


नातू:"काय आजोबा काय झाले??"


आजोबा:"बाबू,आता काही मी जास्त दिवस जगत नाही बघ..तुम्हाला निरोप देण्याची वेळ आली बघ.."

नातू:"काय झाले ते तरी सांगा आजोबा"
रघु आजोबाने फोन पुढे केला आणि तो लेख दाखवला..

म्हणाले

:"बाबू मला ही लक्षण दिसत आहेत रे..मला वाटतं मला अटेक येईल बघ"

हे ऐकून नातू जोरजोरात हसू लागला..

म्हणाला:"आजोबा,काय तुम्ही पण लहान पोरागत करताय??असं काही नाही..तुम्ही डॉक्टर आहात का?हा लेख वाचून अटेक येण्याच्या निष्कर्षावर पोहोचला?

आजोबा:"पिकलं पान कधीतरी गळून पडणारच की" आजोबांचे डोळे पाणावले.

आजोबा निराशावादी झाले.....

नातूला कळून चुकलं आता काय करायचे ते...


नातू:"चला माझ्या सोबत"

आजोबा:"कुठे?"

नातू:"चला म्हणतोय ना?


आजोबा :"बरं ,चल बाबा"

नातूने आजोबाला दवाखाण्यात नेहले.. पूर्ण बॉडी चेक अप करून आणला...


रिपोर्ट आले..आजोबा एक दम फिट and fine.. सर्व रिपोर्ट नॉर्मल..आजोबांचं चालणं फिरणं ,व्यायाम,आहार पाहिजे तसा होता....आजोबांना कसली गोळी सुद्धा न्हवती..


डॉक्टर आजोबांना म्हणाले :"आजोबा ,तुम्ही 100 वर्ष जगणार ..खूप छान रिपोर्ट आले बघा"

हे ऐकून आजोबांच्या डोक्यावर बसलेलं अटेक चं भूत चुटकीसरशी गायब झाले....


नातू:"आजोबा,आता खुश ना??

आजोबा:",हो एकदम खुश"

नातू:"म्हणालो होतो ना काही त्रास नाही तुम्हाला"

आजोबा:"हो पण ते वाचलं होतं तर त्या अटेकशी मिळतीजुळती लक्षणं दिसत होती म्हणून जरा भीती वाटली"

नातू:"आजोबा जरा नाही हा ,जास्तच घाबरले होते."

आजोबा हसू लागले आणि त्यांना पाहून नातूसुद्धा..


दोघांनी घरचा रस्ता गाठला..


©®अश्विनी ओगले.

कसा वाटला लेख नाक्को अभिप्राय द्या....