

मागील भागात आपण पाहिले की वृंदाचा कंबरेखालील भाग बधीर झाला व त्यामुळे तिला उठता येत नव्हते. ती घरातील सर्वांना आवाज देते व सर्वजण धावत बेडरूममध्ये येतात. आता पाहूया पुढे.
"वृंदा अग, काय झालं तुला?"
" सुरेश अरे मला उठताच येत नाहीये."
"अगं पण असं एकाएकी काय झालं?"
" सासुबाई मी झोपलेली होते, पण एकाएकी कंबरेखालचा भाग मला बधीर झालेला जाणवला . मग मी उठण्याचा प्रयत्न केला तर उठताच येत नाहीये."
"आई काय झालं उठ ना ग आई?"
" विहान ,निधी काही नाही बेटा.. आईच जरा दुखतय. तुम्ही चला बर तिकडे त्या खोलीत."
" आई, मुलांना बाहेरच्या खोलीत ने बर. उगाच ते घाबरतील."
"हो सुरेश. पण आधी तू डॉक्टरांना फोन कर आणि त्वरित बोलावून घे."
" हो आई लगेच फोन करतो."
थोड्या वेळात डॉक्टर येतात.
"वृंदाताई, काय होतय तुम्हाला? "
वृंदा सगळे व्यवस्थित सांगते. डॉक्टरांनाही थोड्यावेळ कळत नाही काय झालं ते.
" मला वाटतं सुरेश, आपल्याला यांना हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल आणि काही टेस्ट ताबडतोब करून घ्याव्या लागतील."
सुरेश वृंदाला हॉस्पिटल मध्ये नेतो आणि तिथे तिच्या काही टेस्ट होतात. थोड्याच वेळात टेस्ट रिपोर्ट घेऊन सुरेश डॉक्टरांना भेटतो.
"डॉक्टर हे टेस्ट रिपोर्ट."
" ओके.मला काही शंका आहेत.मला वृंदा ताईंशी बोलावे लागेल !"
" ठीक आहे डॉक्टर!"
सुरेश डॉक्टरांना वृंदाकडे घेऊन जातो..
"लहानपणी तुम्ही कधी तुमच्या पाठीवर पडल्या होत्या का?"
"अम मला एवढं नीट अस काही आठवत नाही!"
"मग अशात तिथे काही लागलं होतं का?"
" नाही."
"खरंतर तुमच्या कंबरेपासून मेंदूत जाणाऱ्या मज्जातंतू डॅमेज झालेल्या आहेत. त्यामूळे तुमचे कंबरेखालील शरीर बधीर झाले आहे."
"पण हे असं एकाएकी कसे काय झाले?"
"मला वाटतं कधीतरी इथे तुम्हाला मार लागलेला आहे पण तुम्हाला तो लक्षात नाही! अचानक त्यांच्यावर ताण येऊन असे झाले आहे!"
"पण मग यावर आता पर्याय काय?"
"यावर आता फिजिओथेरपी आणि मेडिसिन्स हाच पर्याय!"
"बापरे! संपल आता सगळं! माझे काही खरे नाही!डॉक्टर मी कधी चालू शकेल का? मी अशीच कायम अंथरुणाला खिळून असेल?माझा संसार? माझी मुले यांचं काय होईल?"
" हे बघा, वृंदाताई, अशी हिंमत हारून काही होणार नाही! योग्य फिजिओथेरपी आणि मेडिसिन तुम्हाला पुन्हा चालण्यात आणि पूर्ववत होण्यास नक्कीच मदत करतील अशी मी ग्वाही देतो! आपल्याला यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल!सुरेश प्लीज तुमच्या मिसेस ला जरा सांभाळा!"
"हो डॉक्टर मी तिला समजावून सांगतो!"
डॉक्टर तिथून निघून जातात..
"सुरेश,सासूबाई कसे मॅनेज करतील आता सगळं? मुलांची परीक्षा तोंडावर आलेली आहे, तुमच्या खाण्यापिण्याची किती आबाळ होईल! बापरे मला आता हे सहन होत नाही.. "
तेवढ्यात वृंदा जरासा उठायचा प्रयत्न करते.
" आ,आई.."
"वृंदा शांत हो, शांत हो! हे बघ मी सारे व्यवस्थित मॅनेज करेल. दोन्ही मुलांचा अभ्यास मी स्वतः घेईल. घरात सर्व कामांसाठी बाई लावेल. मी आई आणि मुले सर्व काही व्यवस्थित सांभाळून घेऊ तू फक्त आणि फक्त तुझी स्वतःची काळजी घ्यायची. तू आजवर आमची फार काळजी घेत आलेली आहेस ,आता तू पूर्णपणे स्वतःची काळजी घ्यायची. तू लवकरच पूर्ववत होशील, पुन्हा स्वतःच्या पायांवर उभी राहशील असा मला पूर्ण विश्वास आहे, कारण मी आणि आपले कुटूंब सतत तुझ्या पाठीशी असणार आहे!"
" सुरेश,होईल ना सारे व्यवस्थीत?"
" हो होईल.. माझ्यावर विश्वास आहे ना तुला?"
" हो!"
असे म्हणत, सुरेश वृंदाचा हात हातात घेतो.
वृंदा, या धक्क्यातून सावरू शकेल? तिचा संसार करू शकेल ? तिच्याशिवाय तिचे कुटुंब परिपूर्ण होईल? अचानक ओढवलेल्या या संकटातून तिची सुटका होईल का? नक्की हेच आहे का तिच्या जीवनाचे विधिलिखित?
पाहूया पुढील भागात..
भाग ३ समाप्त..
©® सौ प्रियंका शिंदे बोरुडे