जीवनाचे विधिलिखित - भाग १

कधी कधी आपल्या जीवनाचे विधीलिखित आधीच ठरलेले असते आणि त्यानुसार आपोआप आपण तिथवर जाऊन पोहोचतो.


"वृंदा, माझा चष्मा, रुमाल कुठे आहे?"

"हो हो आणते..हे घ्या!"

"चल येतो मी. ऐक ना ऑफिसवरून येताना फळे,भाज्या घेऊन येईन. काल रविवार होता तरीही जमलं नाही ना आपल्याला बाजारात जायला!"

"तुम्ही काही आणू नका फळे व भाज्या! तुम्ही काहीही घेऊन येता!"


"सुरेश, बरोबरच बोलतीये वृंदा!"


"तुम्ही सासू - सूना सारख्याच आहात. ठीक आहे. आपण दोघे मी ऑफिसवरून आल्यावर जाऊ या . वृंदा,तू तयार रहा,ओके! मी निघतो आता ,मला उशीर होतोय."


" हो,चालेल."


वृंदाची सकाळच्या कामांची लगबग सुरू होती.


"निधी, विहान अरे उठा ना! शाळेत जायचं नाही का आज?"
तसेच बेडरूम मध्ये जाऊन ती निधी आणि विहानला उठवते.
"ए आई झोपू दे ना थोड्यावेळ!"


" अरे विहान काय हे? दीदी उठली पण !चल उठ!"


वृंदा दोन्ही मुलांचे व्यवस्थित आवरते.
"विहान ,निधी पटकन नाश्ता करून घ्या. डबे बॅगेत टाका.बस येईलच आता."


"ए आई प्लीज माझा डबा बॅगेत टाक ना! मी जरा प्रोजेक्टचे सामान चेक करते."


"हो निधी टाकते ह बेटा.ऐक प्रोजेक्टच सादरीकरण चांगलं कर!"


"विहान आवरल का बाळा सर्व?"


" हो आई! मी रेडी आहे."


वृंदा मुलांना घेऊन बसस्टॉप वर येते.मुले व ती शाळेच्या बसची वाट पाहत उभे असतात. 

     वृंदा तिच्या आयुष्यात खूप खुश असते.देवाने कसलीही कमी ,उणीव तिला आजवर कधीही भासू दिली नाही.अगदी दृष्ट लागण्याजोगे सारे काही सुरळीत सुरू होते. वृंदाचे पंचकोनी कुटुंब होते; वृंदा, सुरेश, विहान,निधी आणि सासूबाई!

     वृंदा एम कॉम झालेली एक सुशिक्षित मुलगी. लहान असताना कोकणात असलेल तिचं कौलारू टूमदार घर तिला खूप प्रिय होत. आई-वडिलांनी लाडात वाढवलेली एकुलती एक मुलगी. वडिलांनी तिला अगदी तिला हवं ते करण्याची आधीपासून मुभा दिली होती. छोटी वृंदा आईचे घर काम अगदी नीट लक्ष देऊन बघायची. आपली आई किती छान टापटीप आवरते, घर स्वच्छ ठेवते, आलेल्या पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य करते, मला आणि भाऊ अंशुलला हव नको ते सगळं बघते. खरंच मला आईसारखच बनायचं, असा विचार ती लहानपणापासून करत असे. शिक्षणाची आवड तशी तिला होतीच,शिवाय वाचनाचीही प्रचंड आवड! पण मैत्रिणी एम कॉमला ऍडमिशन घेत होत्या ;म्हणून तिनेही एम कॉम ऍडमिशन घेतले आणि ते पूर्ण देखील केले.


     तर अशी होती वृंदा. आता तिच्या आयुष्यात सुरेश कसा आला? सर्व संसार व्यवस्थित चालू असताना दैवाने काय खेळ तिच्याशी केला? आणि ती हरली की जीवनाचे विधीलिखित समजून पुढे गेली?


नक्की वाचा पुढील भागात..


भाग १ समाप्त .
सौ प्रियंका शिंदे बोरुडे 

# फोटो : साभार गुगल 

🎭 Series Post

View all