लेडीज स्पेशल.. अंतिम भाग -10

वर्षा नंतर खुप काही चेंज झालेल असतं.

भाग -10


सोनाली हातातलं पाकीट तसच ठेऊन तिच्या पाठी पाठी पळत जाते. प्रीती ला जाताना पाहून सोनाली ला रडु येत. काही वेळा नंतर सोनाली आत येते. आत येऊन ति दार लावते, काही वेळ ति शांतच असते. नंतर तिचं लक्ष टेबलावर ठेवलेल्या पाकिटा कडे जात. ति पाकीट खोलते, त्यात काही पैसे नि घराची किल्ली असते.


तितक्यात तिला प्रीती चा कॉल येतो.

प्रीती बोलते, " तुझ्यासाठी काही पैसे आणि घराची किल्ली आहे त्या पाकिटामध्ये. "


सोनाली तिचे आभार मानत बोलते, " थँक्स, पण हे सगळं करायची काय गरज होती. तु केलंस तितकं खुप आहे. "


प्रीती बोलते, " तु माझी मैत्रीण आहे, आणि एकदा मी काही मैत्री केली तर मी ति कायम स्वरूपी निभावते. "


सोनाली बोलते, " पुन्हा एकदा थँक्स. "


प्रीती बोलते, " बरं, चल मी एअरपोर्ट ला पोहचते आहे. आपण नंतर बोलू. "

असं बोलून प्रीती फोन ठेवून देते.


एक वर्षा नंतर.


रमाची आई रमाला फोन लावते आणि बोलते, " रमा, उद्याच लक्षात आहे ना ?"


रमा आईला विचारते, " काय ग काय आहे उद्या ? "


आई तिला आठवण करून देत बोलते, " हे काय विसरलीस कि काय उद्या तुला बघायला येत आहेत, माहित नाही का? "


रमा बोलते, " अरे हो कि विसरलीच मी. "


आई तिला ओरडत बोलते, " छान, मला वाटलेलंच. तु विसरली असणार. "


रमा आईला बोलते, " कामाच्या गोंधळात नाही ग लक्षात राहील, उद्या मी सांगते सुट्टी. "


आई बोलते, " बरं ठीक आहे. "

आणि आई फोन ठेवते.

संध्याकाळ होते, रमा ऑफिस मधुन सुटते. नेहमी प्रमाणे ति लेडीज स्पेशल पकडते. पण ह्या वेळेस खुप काही बदललेलं असतं.


हो बरोबर वाचलात तुम्ही.

आज रमा एकटी च ट्रेन मध्ये चढते. तिच्या मैत्रिणी, कोणीच तिच्या सोबत नसतात. नयनाच्या आईच्या निधना नंतर, आणि प्रीतीच गोव्याला जाण्याने. खुप काही बदललेलं असतं.


रमाची नजर अचानक एका सीट जवळ जाते. ति जवळ जाते, ट्रेन मध्ये खुप गर्दी असते.

रमा जोरात ओरडते, " सोनाली.. तु इतक्या महिन्यानंतर ट्रेन ला कशी..? "


सोनाली खुप बदलली होती. तिच्या गळ्यात नेहमी असणारे मंगळसूत्र ही नव्हते. हातातून बांगड्या ही काढल्या होत्या. तिचा पेहराव ही बदलला होता. खुप बारीक झाली होती.


सोनाली बऱ्याच वर्षा नंतर रमाला पाहते आणि तिच्या डोळयांतून पणी येत.

सोनाली बोलते, " रमे यार आहेस कुठे ? विसरलात तुम्ही सगळे.. "


रमा बोलते, " नाही ग, उलट तुच किती चेंज झाली आहेस."


सोनाली बोलते, " परिस्थिती अशी आली कि चेंज व्हावं लागलं, बरं तु एकटीच नयना कुठे आहे ? "

सोनाली नयना ला शोधत विचारते.


रमा बोलते, " ति आईच्या निधना नंतर ट्रेन ला खुप कमी असते. दिसली तर दिसते ट्रेन ला. "


सोनाली बोलते, " म्हणजे..? "


रमा बोलते, " मध्ये लग्नाचं विचार करत होती ति. "


सोनाली बोलते, " अच्छा.. आणि तुझं कस चाललंय.. "


रमा बोलते, " माझं मस्त, उद्या मला बघायला येत आहे सो सुट्टी वर आहे. "


सोनाली खुश होऊन बोलते, " अरे वाह छान कि.. "


रमा पुन्हा तिला विचारते, " तुझं कस चाललंय..? "


सोनाली बोलते, " माझं.. मी डिवोर्स घेतलाय, आता वेगळी राहते. "


रमा ला ऐकुन खुप धक्का बसतो.


रमा बोलते, " किती चेंज झालं ना सगळं.. एक काळ असा होता आपण एकत्र होतो. आणि आज कोण कुठे नि कोण कुठे.. "


.... समाप्त...

🎭 Series Post

View all