लेडीज स्पेशल... भाग -9

सोनाली अमित च घर सोडुन प्रीतीच्या घरी येते.

भाग - 9


आई ला दरवाजावर आदळताना पाहुन विहान रडु लागतो. सोनाली विहान ला घेते आणि घरातुन निघुन जाते. ती अर्ध्या रस्त्यावर येते तिला सुचत नसत कि नक्की आई कडे जाव कि अजुन कुठे. घरी गेली तर आई बाबांना नक्की काय सांगाव, कि मी का तडकाफडकी आली. ती प्रीती ला कॉल लावते.

प्रीती कॉल उचलते.

प्रीती बोलते " निघालात का मॅडम ऑफिस ला ? "

सोनाली बोलते " नाही ग प्रीती मी आज ऑफिस ला जात नाही आहे ! "

प्रीती सोनालीची मस्करी करत बोलते " का ग, अच्छा अमित आलाय म्हणुन का ? " 

सोनाली प्रीती ला शांतपणे उत्तर देत बोलते " नाही ग !"

प्रीती बोलते " मग काय झाल ? काही प्रॉब्लेम आहे का ? "

प्रीतीच बोलण ऐकुन सोनाली रडु लागते.

सोनाली रडत रडत म्हणते " मी घर सोडलंय अमित च ! मला कळत नाही आहे. मी काय करू विहान ला घेऊन कुठे जाऊ. "

प्रीती तिला शांत करत बोलते " बर तु माझ्या घरी ये ! "

सोनाली बोलते " तुझ्या घरी ? "

प्रीती बोलते " हो का ग काय झाल ? तु येऊ शकतेस. "

सोनाली बोलते " ठीक आहे येते मी !"

काही वेळा नंतर सोनाली प्रीती च्या घरी पोहचते.

प्रीती दरवाजा खोलते.

प्रीती सोनाली ला घरात घेते " ये आत ये...! "

सोनाली सोबत तिचा विहान असतो. आजच्या घडलेल्या गोष्टी मुळे विहान खुप घाबरलेला असतो.

प्रीती सोनाली ला गरम गरम चहा नि नाश्ता देते. विहान ला सुद्धा चहा नि बिस्कीट देते..

प्रीती सोनालीला शांतपणे विचारते " नक्की काय झालं ? "

सोनाली तिला घडलेला प्रकार सांगते.

सोनाली बोलते " मी अमित ला खुप समजावल, पण त्याने मला घरातुन चालती हो म्हणुन सांगितलं. "

प्रीती सोनालीचा पुर्ण बोलणं ऐकुन घेते आणि बोलते " ठीक आहे ना ,त्याला एकट्याला राहायचं तर मग राहूदे कि. तु आता पुन्हा त्याच्या कडे जाऊ नको. "

सोनाली बोलते " हो मी तेच ठरवलं आहे ! पण अस विहान ला घेऊन जाऊ तरी कुठे ? "

प्रीती तिच्या ह्या बोलण्यावर रागवत म्हणते " का, हे नाही का तुझं घर ? "

सोनाली ला प्रीतीच्या बोलण्यात आपुलकी जाणवते " हो पण तु तरी किती दिवस अस मला बघणार, आणि तु ही तर जातेस गोवा ला कायमची. "

प्रीती तिला समजावत बोलते " मी गोवा जात असली तरी तु ह्या घरात राहु शकतेस. मी ह्या घराची चावी तुझ्या कडे देऊन जाते ! तु नि विहान इथे कायम चे राहु शकतात. "

सोनाली ला प्रीतीच्या ह्या बोलण्यावरून खुप रडु येत, तिला भरून येत. आताच्या ह्या जगात इतकं कोणी कोणासाठी करत नाही. नि आमची ट्रेन मधली मैत्री आणि ती इतकं माझ्या साठी करतेय.

सोनाली बोलते " अग पण, तु हे सगळं कस.. "

प्रीती बोलते " कस बस मला नाही माहित. तु हव तर मला ह्या घराच जमेल तस रेंट दे. बस ! तुला अस ऑड नाही वाटणार. "

सोनाली ला तिच हे बोलणं ओके वाटत ती बोलते " हा हे चालेल. मी रेंट देईन. तर मला ही बर वाटेल राहायला."

प्रीती हसते आणि बोलते " आता कस बोललीस. "

सोनाली प्रीती ला विचारते " तु आज जाणार आहेस ना ? "

प्रीती बोलते "हो बघ सांगायच राहील तुला , मी आज जातेय. पण जायच्या आधी तुला काही गोष्टी सांगेन म्हणतेय."

सोनाली तिला विचारते " काय ? "

प्रीती हसते आणि बोलते " अग इतकं काही नाही, विहान साठी खायला सध्या साठी आहे. बाकी मी ऑर्डर करेल. आणि काही वाटल तर बाजुला काकी आहेत त्यांना सांग. "

सोनाली बोलते " अग इतकं कशाला, मी करेन हॅन्डल. "

प्रीती बोलते " मैत्री आहे आपली, मरे पर्यँत निभावेन मी. " आणि सोनालीला गच्च मिठी मारते.

सोनाली चे डोळे पाण्याने भरून येतात. दुपार होते प्रीती, सोनाली आणि विहान छान जेवून घेतात. प्रीती ने सोनाली आणि विहान साठी छान जेवण बाहेरून ऑर्डर केलेलं असत. विहान च पोट भरल्या मुळे तो झोपी जातो. दुपारचे तीन वाजतात, सोनालीचा डोळा लागलेला असतो. प्रीती निघायच्या तयारीला लागलेली असते. बऱ्याच वेळा नंतर सोनालीला जाग येते.

प्रीतीची झालेली तयारी पाहुन सोनाली विचारते " हे काय निघायची तयारी ? "

प्रीती बोलते " हो ग..!"

प्रीती ची बुक केलेली गाडी बाहेर उभी असते.

प्रीती बोलते " गाडी बाहेर आली आहे. मी निघते. "

सोनाली तिला गच्च मिठी मारते. प्रीती तिच्या हातात एक खाकी कव्हर ठेवते. आणि बॅग घेऊन निघते.

.,.. क्रमश..



🎭 Series Post

View all