लेडीज स्पेशल.. भाग -8

अमित पियुन घरी येतो..

भाग -8


प्रीती " खांदा फक्त पुरुष देऊ शकतो का..? " प्रीती शांतपणे बोलते...

सोनाली " म्हणजे..? नक्की काय बोलायचं आहे तुला..? " प्रीती ला बोलते..

प्रीती " नाही कोणी पुढाकार घेत.. कोणी खांदा द्यायला येत नाही तर, आपण देऊ खांदा..!"

रमा " हो.. पण.. आपण फक्त तिघी आहोत मग कस..?"

प्रीती " मग काय झालं नयना ही आहे कि.. झाले मग.!"

सोनाली " ठीक आहे..!"

सोनाली, प्रीती आणि रमा नयनाच्या आई ला खांदे द्यायला पुढे येतात. नयना ही खांदा द्यायला पुढे येते.. तितक्यात सोसायटी मधील एक व्यक्ती त्या तिघींच्या मदतीला येतो...नयना आई साठी मडके पकडते..तिला वाटलेलं कि आई साठी खांदा कोण देईल पण प्रीतीच्या ह्या निर्णयाने नयना ला धीर भेटतो.. आणि निदान थोडी तरी माणुसकी आहे शिल्लक ह्याच उदाहरणं आज नयना ला मिळत..

सर्व कार्य संपवून त्या तिघी ही नयनाच्या घरी येतात...नयना जमिनीवर कोसळते आणि रडु लागते..

नयना " आई.ss आई ss आयुष्यात ला महत्वाचा निर्णय फक्त तुझ्या साठी घेणार होती नि तु मला अर्धवट सोडुन गेली..! आई गं.. " रमा तिला कस बस सावरते.

प्रीती सोनाली ला खुनवते.. सोनाली किचन मध्ये जाते. तिला चहा आणि पणी आणुन देते..

नयना " नको मला.. प्लीज..!"

सोनाली " नको ग अस करुस, अस उपाशी राहुन कस चालणार मला सांग..? "

प्रीती " थोडं चहा घे पियुन बर वाटेल तुला.!"

रमा " अस उपाशी राहिलीस तर आई ला चालणार का तुझ्या..? "

आई च नाव ऐकुन नयना अजुन रडु लागते..

प्रीती " नयना.. नयना..प्लीज शांत हो.. बघ आम्ही आता निघतो.. तु काही ही असेल आम्हाला सांग आम्ही येऊ.. "

नयना प्रीती च ऐकुन फक्त होकारार्थी मान हलवते..

सोनाली, रमा आणि प्रीती तिच्या घरून निघतात..रमा घरी येते. आई दरवाजा उघडते.. आई तिच्यासाठी गरम पणी ठेवते..

आई " रमे..पाणी गरम आहे आंघोळ करून घे लवकर..!"

रमा गपचूप जाते आणि फ्रेश होते.. आई तिला गरमा गरम जेवण वाढते...

ती आईला गच्च मिठी मारते आणि रडु लागते..

आई " रमे काय झालं रडायला.? " आई रमा रडायला लागते म्हणुन काळजीने विचारते..

रमा " आई तु आम्हाला सोडुन नाही ना जाणार..? "

आई " अग वेडा बाई काय झालं..? आणि मी का जाईन सोडुन..? " आई रमाची समजूत काढत बोलते..

रमा आई च्या बोलण्याने शांत होते..आणि ती नयनाच्या आई बद्दल तिच्या आई ला सांगते.. आईला हे सर्व ऐकुन धक्का बसतो.. आणि नयना बद्दल खुप दुःख होत.. सोनाली घरी पोहचते तितक्यात तिला अमित चा मॅसेज येतो..

अमित चा मॅसेज " मी ऑन द वेय आहे.!"

सोनाली त्याचा मॅसेज पाहते. पण रिप्लाय द्यायची तिला इच्छा होत नाही.. ती मुलाला घेऊन घरी येते.. फ्रेश होते. रात्रीचे दहा वाजतात.. विहान जेऊन झोपून जातो. सोनाली अमित ची वाट पाहत पाहत थोड डोकं टेकून पडलेली असते.. तितक्यात दारावरची बेल वाजते.. सोनाली खडबडून जागी होते.. घड्याळात पाहते. रात्रीचा एक वाजलेला असतो.. ती डोर ओपन करते.. अमित आत येतो. सोनालीला त्याच्या अंगातून ड्रिंक चा वास येतो..

सोनाली " हे काय तु ड्रिंक घेतली आहेस.? " ती थोड भडकूनच बोलते.

अमित " हो..! घेतली तर..? "

सोनाली " अच्छा अजुन पार्टी संपली नाही का.? "

अमित " तुला काय प्रॉब्लेम आहे..? "

सोनाली " मला आहे प्रॉब्लेम.. आणि घरी लहान मुल आहे ह्याचा तर विचार कर.. "

अमित तिला इग्नोर करत रूम मध्ये जातो. विहान झोपलेला असतो.. तोह विहान च्या जवळ जातो. सोनाली त्याच्या पाठी पाठी जाते..

सोनाली " ड्रिंक घेऊन माझ्या मुलाच्या जवळ नाही जायचं तु.!" आणि त्याला ती ढकलून बाजुला सारते.

अमित " तोह माझा ही मुलगा आहे.. तुझ्या एकटीचा नाही.. "

सोनाली " तुझा मुलगा असता तर, तु असा पियुन आला नसता. "

अमित " तुझा मुलगा आहे ना. मग त्याला घे नि चालती हो माझ्या घरातुन.!" अमित आणि सोनालीचा खुप वाद होतो.. विहान घाबरून उठतो.. आणि रडु लागतो.. सोनाली अमित ला ढकलून विहान ला छातीजवळ धरते, त्याला शांत करते.. अमित ला उभ रहायची सुद्धा शुद्ध नसते..

तोह बडबड करत बाहेर हॉल मध्ये जाऊन पडतो. सोनाली बेडरूम चा दरवाजा लावुन घेते. सकाळ होते. काल झालेल्या तमाशा मुळे सोनाली खुप थकलेली असते.. ती मोबाईल मध्ये वाजले किती ते पाहते.. सकाळचे आठ वाजलेले असतात.. ती विहानच्या अंगावरून हात फिरवते.. तिला अमित चा खुप राग आलेला असतो.. तिला आज अमित चा निर्णय लावायचा असतो.. म्हणुन ती बर नसल्याच कारण सांगुन ऑफिस ला रजा घेते.. ती अलगद रूम चा दरवाजा लावते.. बाहेर हॉल मध्ये सोफ्यावर अमित आडवा झालेला असतो, बाजुला ड्रिंक चा ग्लास तसाच पडलेला असतो. हे पाहुन सोनालीला अमित चा अजुन राग येतो.. ती मुकाट्याने फ्रेश होते.आणि बॅग भरायला घेते..तितक्यात अमित ला जाग येते..

अमित " हे काय, म्हणजे मनावर घेतलस तर तु.!"

सोनाली त्याच बोलणं इग्नोर करते..

अमित " मी काही तरी विचारलंय तुला.? " अमित रागात विचारतो.

सोनाली " हो, मी काही दिवस माझ्या आई कडे जातेय.!"

अमित " गुड.. जा पण विहान ला इथे ठेऊन जा..!\"

सोनाली " का..? तोह माझा मुलगा आहे. आणि तुझ्या सारख्या बेवड्या आणि बेजबाबदार माणसा सोबत त्याला एकटं ठेऊ..!"

अमित " मी बेजवाबदार कि तु..? "

सोनाली " तुझ्या शी बोलण्यात अर्थ नाही..!"

अमित " चल जा, चालती हो.. " आणि अमित तिला ढकलतो.. ती दरवाजावर जाऊन आदळते. तिच्या हाताला मार लागतो..


..... क्रमश..




🎭 Series Post

View all