लेडीज स्पेशल.. भाग - 7

नयना तिच्या आयुष्यातला मोठा निर्णय घेणार.. पण त्या आधीच तिची आई हे जग सोडुन जाते...
भाग -7

नयना " अगं अजुन काही ठरलं नाही...ठरलं कि नक्की पार्टी..!" तितक्यात नयना च्या मोबाईल वर अजिंक्य चा मॅसेज येतो...
अजिंक्य चा मॅसेज " उद्या संध्याकाळी ठिकाणी सहा वाजता दादर ला भेटू..!"
नयना त्याला रिप्लाय देते...
नयना चा मॅसेज " ओके..!" नयनाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ख़ुशी असते...
तितक्यात रमा च स्टेशन येत.. रमा ट्रेन मध्ये चढते...
प्रीती " चला बोलण्या बोलण्यात कधी स्टेशन आलं कळलंच नाही...!"
सोनाली " आता गप्पा गोष्टी अजुन छान रंगणार...!" रमा ला पाहुन सोनाली म्हणते...
रमा " चला बोला कोण काय काय न्यूज देणार आहे... प्रीती तुझी पार्टी राहिली आज ...!"
सोनाली " प्रीती पार्टी देईल च पण नयना मॅडम कडे न्यूज आहे...!" सोनाली नयना कडे पाहत म्हणते...
रमा " खरं कि काय.. म्हणजे ठरलं कि काय लग्न...? "
नयना " अजुन नाही गं... उद्या त्याने दादर ला बोलावलंय भेटायला... सहा वाजता..!"
सोनाली " ओह्ह्ह हो...!"
प्रीती " जा... नक्की... जा... आम्ही पार्टी ची वाट पाहू...!" आणि प्रीती हसू लागते...
रमा " काय मग प्रीती मॅडम.. झाली का मीटिंग..!"
प्रीती " हो.. प्रमोशन ही झालं...!"
सोनाली " गुड... आता तर नक्की पार्टी हवी... " सोनाली खुश होऊन बोलते...
प्रीती " पण...? " प्रीती मध्येच शांत होते.. ति तिघींच्याही तोंडाकडे पाहते...
सोनाली " पण काय...? "
रमा " तू सरप्राईज वगरे तर नाही ना देणार आहेस...? "
प्रीती " बरं ऐका... माझ प्रमोशन झालय आणि मला गोवा ट्रान्सफर देतेय कंपनी...!"
सोनाली प्रीतीचा बोलणं ऐकुन शांत बसते...
रमा " म्हणजे तू गोवा शिफ्ट होतेयस...? " रमा तिला प्रश्न करते...
प्रीती " हो.. बरोबर ओळखलस...!"
नयना " अगं पण का...? "
प्रीती " अगं राणी प्रमोशन दिलय म्हणुन...!"
सोनाली " त्यांना सांग हे असं नको प्रमोशन तुला...!"
प्रीती " अगं असं कस बोलणार मी... शेवटी करिअर आहे माझं... " प्रीती सोनाली ला समजावत म्हणते...
नयना " बरोबर आहे प्रीती च... "
सोनाली खुप नाराज होते.. प्रीती तिची खास मैत्रीण असते.. आणि ति प्रत्येक गोष्ट प्रीती शी शेर करत असते... प्रीती नाही तर सोनाली ला खुप एकटं वाटणार होत..सोनाली प्रीती च्या ह्या प्रमोशन ने खुश नसते...
प्रीती " सो उद्या माझ्या कडून पार्टी...!"
नयना " तुम्ही करा पार्टी मी उद्या तस ही काही नाही आहे...!"
रमा " अरे यार... बरं... परवा करू कि..!"
प्रीती " हो.. ठरलं तर मग परवा पार्टी... माझ्याकडून..!"
रात्रीचे दहा वाजतात.. प्रीती ला सोनालीचा मॅसेज येतो...
सोनालीचा मॅसेज " यार तू हे चांगल नाही केल.. तुला हवच आहे का हे प्रमोशन...? "
काही वेळा नंतर प्रीती सोनालीच्या मॅसेज चा रिप्लाय देते..
प्रीतीचा रिप्लाय " अग डिअर का नर्वस होते आहे.. मी जरी लांब गेली तरी मध्ये मध्ये तुम्हाला भेटायला येणार आहे मी.. "
पुन्हा सोनालीचा मॅसेज..
सोनालीचा मॅसेज " ठीक आहे.. पण नक्की ना...!"
प्रीतीचा रिप्लाय " हो... आपल्या मैत्री शप्पथ..! बरं चल गुड नाईट.. " आणि प्रीती ऑफलाईन जाते...
सकाळ होते... नयना छान मुड मध्ये असते.. तिने आज ऑफिस ला रजा घेतलेली असते.. करणं तिला संध्याकाळी अजिंक्य ला भेटायला जायचं असत.. आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय ति आज घ्यायला जाणार होती... ति छान आई साठी गरमा गरम नाश्ता बनवते.. छान कांदेपोहे वरून ओले खोबरे घालुन.. ति आई ला मुदामच आज सकाळी उठवत नाही.. तिचा छान नाश्ता तयार होतो...
नयना " आई गं उठ कि..!" नयना आई ला उठवते पण आई काही उठत नाही.
नयना पुन्हा आई ला आवाज देते... " आई गं..उठ ना काय झालं.. " तिला वाटत आई गार झोपली आहे.. ति आईला हात लावुन हलवते.. खुप उठवायचा प्रयत्न करते.. नयना खुप घाबरते आणि ति रडायला लागते.. ति पटकन जाऊन डॉक्टरांना कॉल लावते..काही वेळा नंतर डॉक्टर घरी येतात..आईच अंग थंड गार पडलेलं असत..
डॉक्टर " अचानक काय झालं..? " डॉक्टर नयना ला विचारतात..
नयना " माहित नाही डॉक्टर.. सकाळी तिला आराम भेटावा म्हणुन मी तिला काही उठवलं नाही.. पण जेव्ह्स उठवायला आली तेव्हा मात्र आई उठलीच नाही..!" आणि नयना ढसाढसा रडु लागते...
डॉक्टर " मग छातीत वगरे काही दुखत वगरे आहे अस बोलल्या का..? " डॉक्टर पुन्हा प्रश्न करतात...
नयना " नाही...! रात्री छान जेवली गप्पा गोष्टी केल्या आम्ही..!"
डॉक्टर " मला माफ करा पण आई तुमच्या...!" आणि डॉक्टर निघुन जातात...
नयना जोराने रडु लागते... नयना ही तिच्या आईला एकुलती एक असते.. वडील गेल्या नंतर आई नि ति ह्या दोघीच एकमेकांना होत्या... नयना चा रडण्याचा आवाज ऐकुन आजूबाजूचे जमा होतात...
नयना रडत रडत सोनालीला मॅसेज करते..
नयना चा मॅसेज " माझी आई आज मला सोडुन गेली.. प्लीज तुम्ही सगळे या..!" आणि नयना फोन सायलेंट ला टाकते...
काही वेळा नंतर सोनाली तिचा मॅसेज पाहते.. नयना चा मॅसेज पाहुन सोनालीला धक्का बसतो.. ति प्रीती आणि रमा तिघीही नयना च्या घरी पोहचतात... नयना आईच्या धक्याने खचून गेलेली असते.. नयना ला आपल्या मैत्रणींना पाहुन अजुन रडु येत..
नयना रमा ला मिठी मारत म्हणते.." आज आयुष्याचा खुप महत्वाचा निर्णय घ्यायला जाणार होती.. तेही आई च्या ख़ुशी साठी.. ते सुख पाहण्या आधीच आई मला एकटं सोडुन गेली..!"
रमा " हे अस अचानक झालं.. आम्हालाही तितकाच मोठा धक्का बसलाय..!"
सोनाली " आई च नसणं काय असत कळतंय मला.. नयना..!" नयनाची समजूत काढत सोनाली म्हणते..
आई ला जाऊन बराच वेळ होतो.. दुपारचे दोन वाजतात.. पण आई ला खांदा द्यायला तिचे कोणी नातेवाईक येत नाही.. कारण वडिलांचे तिच्या लहानपणी अचानक जाणे. आणि म्हणुन त्या नंतर कोणी ही जास्त त्यांच्या शी संबंध ठेवलाच नाही..
प्रीती " कोणच येणार नाही का आई ला खांदा देण्यासाठी..? " प्रीती नयना ला विचारते...
नयना " नाही..!" नयना शांतपणे उत्तर देते..
सोनाली रीतीनुसार चार पुरुष लागतील म्हणुन आजू बाजूच्यांना खांदे देण्यासाठी खुप समजावते... पण कोणच यायला तयार नाही म्हणुन नयनाला अजुन रडु येत...
प्रीती ला तिचं रडणं पाहवत नाही..आणि म्हणुन ति पुढाकार घेते..

.... क्रमश...

































🎭 Series Post

View all