लेडीज स्पेशल.. भाग -6

नयनाच्या मोबाईल वर अनोळखी व्यक्तीचा मॅसेज येतो... प्रीती बॉस ने केलेल्या प्रमोशन ने खुश होते...

भाग - 6


नयना मॅसेज ओपन करते..

अनोळखी व्यक्ती चा मॅसेज " हाय मी अजिंक्य... माझा फोटो पहिला का तुम्ही..? लग्नासाठी..!"

नयना त्याला रिप्लाय करते...

नयना चा मॅसेज " हो पहिला.. आपण एकदा भेटू शकतो का ...?" नयना चा रिप्लाय...

अजिंक्य चा मॅसेज " हो नक्की... उद्या भेटू आपण.. मी कुठे भेटायचं हे सांगतो..!"

नयना चा मॅसेज " हो नक्की... " आणि नयना ऑफिस च्या कामाला लागते... 

रमा ऑफिस ला पोहचते... तितक्यात तिला बॉस च्या कॅबिन मधुन कॉल येतो...रमा बॉस च्या कॅबिन मध्ये जाते...

बॉस " रमा... तुझी आम्ही बदली करायची ठरवली आहे..? "

रमा " काय... कस शक्य आहे बॉस....? मी तुम्हाला माहित आहे.. आधी ही सांगितलेलं... कि मला दुसऱ्या ठिकाणी काम करणं शक्य होणार नाही...!" रमा बॉस च्या निर्णयाने खुप भडकते...

तिला दुसऱ्या ठिकाणाहून अपडाउन करणं शक्य होणार नसत...

बॉस " तुझं काम खुप लेट असत.. दिलेलं काम वेळेत तू पुर्ण करत नाही... म्हणुन आम्ही तुला दुसऱ्या ठिकाणी पाठवतोय...!"

रमा " ह्या पुढे असं होणार नाही बॉस...!" रमा बॉस ला खुप गयावया करते...

बॉस " ठिक आहे तुला हा महिना भराची मुदत देतो... नाही तर तुला दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल..."

रमा " ठिक आहे बॉस...!"

असं बोलुन रमा कॅबिन मधुन निघते...

सोनाली कामावर पोहचते.. तिचा मुड खुप खराब असतो... ति कस बस काम आटपट असते.. तिचं लक्ष सारखं सारखं मोबाईल कडे असत..ति अमित च्या मॅसेज ची वाट पाहत असते...

प्रीती चा सोनाली ला कॉल येतो..

प्रीती " हेय... मॅडम आलात का ऑफिस ला.. "

सोनाली " हो.. अगं...!" शांत पणे सोनाली फोन वर बोलते...

प्रीती " काय गं काय झालं..? अमित चा काही कॉल...?"

सोनाली " नाही पण... मॅसेज आलेला काल रात्री..!"

प्रीती " ओके पोहचला का...तोह..? "

सोनाली " पोहचला ही असेल.. त्याला विचारलं तर भडकला माझ्यावर...!" आणि सोनाली रडायला लागते...

प्रीती " डिअर नको रडूस... मला माहित आहे ना... मी अनुभवलंय सगळं... म्हणुन तर त्याला सोडुन आज मी वेगळं राहतेय ना... "

सोनाली " खरं सांगु तर...! तुझं बोलणं मला काल रात्री थोडं पटलं...!"

प्रीती " तोह आला कि शांतपणे बोल त्याच्या शी..! आणि असं रडुन कस चालणार...!" प्रीती तिला समजावत म्हणते..

सोनाली " भेटू आपण संध्याकाळी ट्रेन ला..!"

आणि सोनाली कॉल ठेवते...

सोनाली ला प्रीती शी बोलुन खुप बरं वाटत...ति पुन्हा रिलॅक्स होऊन कामाला लागते....

बॉस " प्रीती जरा कॅबिन मध्ये ये ..!" प्रीतीचा बॉस तिला डेस्क जवळ येऊन आत यायचा निरोप देतो...

प्रीती " येस बॉस.. " प्रीती त्याच्या केबिन मध्ये जाते...

बॉस तिच्या समोर एक लेटर पुढे करत..

बॉस " वाच..!"

प्रीती लेटर हातात घेते.. आणि खोलते..

प्रीती लेटर वाचून खुप खुश होते...

प्रीती " थँक्स बॉस.. फक्त प्रमोशन होणार होत ना.. सो हे...? " प्रीतीच्या हातात प्रमोशन झालेल्याच लेटर असत.. आणि त्यात ति गोवा शिफ्ट व्हावं असं नमुद केलेलं असत कंपनी ने..

बॉस " हो पण.. कंपनी बोलते कि तू गोवा शिफ्ट होऊन तिथली कंपनी सांभाळ आणि म्हणुनच कंपनी तुला तिथे बंगलो देतेय... "

प्रीती ला हे सगळं ऐकुन नक्की कस रिऍक्ट व्हावं कळत नव्हतं...

तिला फक्त समोर कंपनी कडून भेटलेली प्रमोशन इतकंच काहीस दिसत होत...

प्रीती " बॉस मी कधी पासुन शिफ्ट होऊ शकते..? "

बॉस " तुला ह्या तीन चार दिवसात शिफ्ट व्हावं लागेल... आणि हो ह्याची प्रोसेस कंपनी आज उद्या मध्ये चालु करेल..!"

प्रीती ला हे सर्व ऐकून खुप आनंद होतो... तिला शिफ्ट होण्याचं टेन्शन च नसत.. तिने आता पर्यंत बँक अकाउंट खुप छान मेंटेन ठेवलेल असत... शिवाय तिला पगार ही ऍडव्हान्स मिळणार असतो...

प्रीती " ओके बॉस... बरं मी काम आवरायला घेते...!" असं बोलुन प्रीती कॅबिन बाहेर जाते...

संध्याकाळ होते... नेहमी प्रमाणे ऑफिस सुटत.. सोनाली आणि नयना ट्रेन मध्ये चढतात..

सोनाली " नयना अगं कसल्या तरी टेन्शन मध्ये दिसते आहेस...? सगळं ठिक आहे ना...? "

नयना " हो गं सगळं ठिक आहे... अगं तुला माहित आहे आई मुलगा बघतेय लग्नासाठी...!"

सोनाली " हो.. माहित आहे..!"

नयना " त्याचाच सकाळी मॅसेज आलेला.. तोह उद्या भेटायचं बोलतोय...!"

सोनाली " छान कि... मग टेन्शन कसलं.. भेट कि त्याला...!"

नयना " अगं पण...? " तितक्यात प्रीती च स्टेशन येत... प्रीती ट्रेन च्या गर्दीतून आत येते.. धक्का बुक्की करत...

प्रीती " हुश्श... किती ति गर्दी...!" आणि सोनाली नयनाच्या पुढ्यात येऊन उभी राहते...

नयना " वाह विमान आता उतरलं वाटत...!" आणि प्रीती कडे पाहुन हसू लागते...

सोनाली " एक दिवस काय विमानाने गेली तर मॅडम ना गर्दी टोचायला लागली का...? " नयना आणि सोनाली प्रीतीची खेचू लागतात...

प्रीती " अच्छा आता खेचा हा माझी...!" आणि ट्रेन चालु होते...

नयना " नाही गं...!"

सोनाली " सो कशी झाली ऑफिस मिटिंग...? " सोनाली आणि नयना कुतूहलाने तिला विचारू लागतात.

प्रीती " गुड... आणि एक न्यूज आहे.. तुम्हा सर्वांसाठी...!"

सोनाली " काय...!"

नयना " एक मिनिट... लग्न तर ठरवून नाही ना आलीस...? " आणि नयना हसू लागते...

प्रीती " का मॅडम तुमचं ठरलं कि काय...? "

सोनाली " हो तर... ठरल्यातच जमा आहे कि....!"

प्रीती " खरंच कि काय... चला म्हणजे पार्टी...!"


.... क्रमश..
🎭 Series Post

View all