लेडीज स्पेशल... भाग - 3

प्रीती बॉस सोबत मीटिंग ला जाणार असते...

भाग -3


काही वेळा नंतर लंच टाइम होतो...

सोनालीचा मॅसेज पाहुन प्रीती तिला कॉल करते..

प्रीती " काय गं उद्या तर तुला वेळ नव्हता मग परत असा मॅसेज केलास...? "

सोनाली " काही नाही गं नेहमीच आहे, उद्या रविवार ना सो त्याच अचानक काम आलं, सो तोह आज च ऑफिस कामा साठी बाहेर जातोय...!" सोनाली प्रीती ला सांगते..

प्रीती " अगं पण एकच दिवस भेटतो आणि त्यात हे अस का बरं ...? "

सोनाली " बॉस आहे ना तोह... मग ऑफिस मीटिंग असणार...!"

प्रीती " किती सहजतेने बोलतेस..नक्की मीटिंग आहे कि...? " प्रीती सोनाली ला प्रश्न करते...

सोनाली " मला कळतंय तु काय बोलतेस ते.. पण ते कस शक्य आहे..? "

प्रीती " मी मनात आलं तेच बोलली.. आणि सॉरी.. तुला प्रश्न केला म्हणुन...!" प्रिति तिची माफी मागते...

सोनाली " मैत्रीण आहेस... सो नो सॉरी प्लीज... हक्क आहे तुझा... "

प्रीती " थँक्स.. " असं बोलुन प्रीती फोन ठेवते..

सोनाली ला प्रीती शी मनमोकळ्या पणाने बोलुन खुप बरं वाटल होत.. मन सोनालीच हलक झालं होत... तु पुन्हा ऑफिस च्या कामाला लागते...

प्रीती ला तिच्या बॉस चा कॅबिन मधुन कॉल येतो...

प्रीती आत जाते..

प्रीती " मे आय सर...? " कॅबिन मध्ये जात विचारते..

बॉस " येस प्रीती... सो आजची मीटिंग कन्फर्म आहे ना ? "

प्रीती " हो बॉस... फिक्स आहे.. "

बॉस " तु क्लायंट ला विचारून पुन्हा कन्फर्म केलस ना ...?\"

प्रीती " येस बॉस... आणि तिकीट सुद्धा कन्फर्म झाल्या आहेत..! रात्री आठ वाजताची बुक आहे..दोन तासात गोवा पोहचू आपण ..! आणि तिथंले हॉटेल सुद्धा बुक आहे कन्फर्म.. " प्रीती बॉस ला पुर्ण शेड्युल सांगते...

बॉस " गुड... म्हणुन मला तुझं काम आवडत...!" बॉस तिच्या जवळ येत म्हणतो...

प्रीती " ओके बॉस... "

बॉस " प्रीती मी असा विचार केलाय कि आफ्टर मीटिंग मी तुझी इनक्रेमेन्ट करायचं ठरवलंय..!"

प्रीती " खरंच बॉस... थँक्स बॉस... " प्रीती इन्क्रिमेंट मिळणार म्हणुन खुश होती.. तिला नाती पेक्षा पैसा खुप महत्वाचा होता.. तिने लग्न झाल्यावर खुप सोसलं होत.. रोज नवऱ्याचा मार आणि शिवीगाळी तिला नकोशी झाली होती... आणि म्हणुनच तिने डिवोर्स घेतला होता...आणि स्वतःच्या पायावर उभी होती कोणावरही अवलंबुन न राहता... आणि पैसा महत्वाचा म्हणून ति बॉस ची असिस्टंट म्हणुन काम करत होती...

प्रीती ग्रुप वर मॅसेज टाकते खुश होऊन...

प्रीती " गर्ल्स... सोमवारी भेटू तेव्हा पार्टी माझ्याकडून.." प्रीती चा मॅसेज..

काही वेळा नंतर रमा फ्री होऊन रिप्लाय देते..

रमा " का मॅडम... अचानक काय झालं... आणि स्पेशल..? " रमा चा रिप्लाय...

प्रीती " माझी इन्क्रिमेंट झाली आहे..!""

रमा " युप्पी.. नक्की... फक्त पार्टी च कि.." रमा चा रिप्लाय 

प्रीती " ह्म्म्म जे ज्याला हवं ते... " प्रीती चा रिप्लाय..

रमा " ओके चला भेटू लवकरच...!"

संध्याकाळ होते.. ऑफिस सुटत... लेडीज स्पेशल ट्रेन येते...सोनाली ट्रेन मध्ये चढून नेहमी प्रमाणे, नयना आणि रमा साठी जागा पकडते.. ट्रेन सुटते.. नयना ट्रेन मध्ये चढते..

नयना " आज ट्रेन खाली का दिसतेय..? "

सोनाली " तेच ना ..? मी चढताना सुद्धा इतकी गर्दी नव्हती..!"

नयना " ह्म्म्म !!"

सोनाली " कसा गेला आजचा ऑफिस डे तुझा..? "

नयना " बोरिंग...? "

सोनाली " का गं... "

नयना " काम इतकं होत कि जेवायला सुद्धा वेळ नव्हता... आणि त्या मुळे आज आई शी कॉन्टॅक्ट ही झालं नाही... " 

सोनाली " आज प्रीती नाही ट्रेन ला..!"

नयना " हो गं मी वाचला मॅसेज..! पण कामा मुळे विचारता आल नाही..!"

तितक्यात रमा च स्टेशन येत.. रमा ट्रेन मध्ये चढते...

रमा " हेय... प्रीती नाही ति आज ..? " रमा प्रीती ला इथे तिथे शोधात विचारते...

सोनाली " आम्ही आता तेच बोलत होतो... तिचा मॅसेज आलेला... "

रमा " ओह्ह्ह मी विसरली च.. ति आज मीटिंग साठी बाहेर जातेय ना...? "

नयना " मीटिंग..??? "

सोनाली " ऑफिस मीटिंग गं..!"

नयना " ओके... "

रमा " ति इन्क्रिमेंट होणार असं काही बोलत होती...!"

सोनाली " हो.. "

तितक्यात नयना ला तिच्या आई चा कॉल येतो..

नयना. " हा गं आई बोल... आत्ताच ट्रेन पकडली... "

आई " अगं मी तुला एक फोटो पाठवलंय.. जरा पाहुन सांग मला.. " आई रमा ला व्हाट्सअँप ला मुलाचा फोटो पाठवते...

नयना " अगं आई थांब कि इतकी कसली घाई आहे..?"

नयना आई वर चिडत म्हणते... तिचं चिडणं पाहुन रमा आणि सोनाली एकमेकींन कडे पाहतात...

नयना " मी घरी आली कि बोलते.. चल ठेवते...!"


....... क्रमश...









🎭 Series Post

View all