लेडीज स्पेशल.. भाग - 2

सोनाली अमित च्या वागण्याने नाराज असते

भाग - 2


रमा " काय गं काय झालं इतकं नाराज का होतेस..? "

सोनाली " काय सांगु ! त्याला मुळीच वेळ नाही माझ्यासाठी... "

नयना " अगं दोघंही कामात असतात. मग ह्या सगळ्यात तुम्हा दोघांनाही वेळ काढावा लागणार.. "

सोनाली " माहित आहे गं... पण मी एकटीने वेळ काढून काय होणार... हे त्याला ही समजलं पाहिजे ना... "

प्रीती " काय गं सोना... तुझा मुलगा किती वर्षाचा आहे..? "

सोनाली " चार वर्षाचा..!"

नयना " मग त्याला एक दिवस माझ्या कडे राहूदे.. म्हणजे तुम्हा दोघांना ही तेवढाच वेळ मिळेल एकमेकांन साठी... "

प्रीती " हेय... चांगली आयडिया आहे... काय बोलते सोना ...? "

सोनाली " नको गं... तुम्ही आयडिया दिलात त्या बद्दल थँक्स.. पण नको... "

बऱ्याच वेळा च्या गप्पा नंतर रमा च स्टेशन येत.. चला बाय माझं स्टेशन आलं.. भेटू संध्याकाळी...

रमा स्टेशन वर उतरते...

प्रीती " नयना मॅडम लग्न कधी करतायत...? "

नयना " कोणी चांगला भेटला तर नक्की करेन.. "

सोनाली " नयना तु आणि लव्ह मॅरिज करशील वाटत नाही... कारण तु आई च्या ख़ुशी पुढे स्वतःची ख़ुशी नाही पाहणार... "

नयना " बरोबर आहे तुझं.. कारण आई ला माझ्याशिवाय कोणी नाही हे तर माहित आहे तुम्हाला.. "

सोनाली " प्रीती यार तु कधी करणार... तु तर बऱ्यापैकी सेटल आहेस..? "

प्रीती " आपण लग्नाच्या फ़ंद्यात नाही पडणार... एकदा पडलो बस झालं... " प्रीती च्या बोलण्यात लग्न बद्दल चा तिरस्कार दिसत होता...

सोनाली " यार अस बोलु नकोस... जे झालं ते तुझ्या नशिबात होत अस समज.. जे घडणारच होत... आणि तु अस जर म्हणालीस तर नयना मॅडम लग्न बद्दल कधीच विचार करणार नाही... " आणि सोनाली नयना कडे पाहुन हसते...

नयना " नाही गं मी काही विचार करणार कारण... एकटं आयुष्यभर किती राहायचं ना अस...!" नयना समजुतीने बोलते..

सोनाली " अगदी बरोबर बोललीस... आता बघ ना घरात आम्ही एकमेकांना वेक नाही दिला... किंवा भांडलो नाही ना तर अगदी चुकल्या चुकल्या सारखं वाटत... "

नयना " आपण सकाळी एकत्र गाडीला असतो.. म्हणुन एकमेकांचे प्रॉब्लेम आपण एकमेकांना शेर तर करू शकतो... "

प्रीती " तस ही आपली मैत्री ह्या ट्रेन मधली तिही एकदम भारी... " आणि प्रीती सोनाली, नयना ला टाळी देते...

नयना " चल बाय माझं स्टेशन आलं.. नाही तर इथेच बोलत राहीन अजुन... " अस बोलुन नयना स्टेशन वर उतरते...

ट्रेन चालु होते...

प्रीती " मला कधी कधी नयना च टेन्शन येत गं सोना..."

प्रीती उदास होऊन बोलते...

सोनाली " का गं ..? "

प्रीती " बघ ना ति तिच्या आईला एकुलती एक... आणि त्यात तिला सासर चांगले भेटेल कि नाही माहित नाही...!"

सोनाली " लग्न कोणाशी ही होउदे आपण मैत्रीण म्हणुन तिच्या सोबत कायम राहणार... "

प्रीती " अगदी बरोबर... तिच्या आईला लग्नात होईल तितकी मदत आपण करायची.... "

सोनाली " येस ठरलं तर मग... "

तितक्यात प्रीती आणि सोनाली च स्टेशन येत... प्रीती आणि सोनाली ट्रेन मधुन उतरतात.. प्रीती आणि सोनाली एकमेकींन पासून काही अंतरावरच कामाला असतात...थोडे चालत चालत दोघी पुढे येतात.. प्रीती ऑफिस च्या गाडी साठी थांबते...आणि सोनाली ऑटो पकडुन ऑफिस जाते....

चौघींचा व्हाट्सअँप ला ग्रुप असतो... नेहमी प्रमाणे ऑफिस गेल्यावर मॅसेज टाकतात... " आम्ही पोहचलो... "

काही वेळा नंतर प्रीतीचा ग्रुप ला मॅसेज येतो...

प्रीती " गर्ल्स... आज मी ट्रेन ला नाही आहे... बॉस सोबत मिटिंग आहे सो लेट होईल.... " प्रीतीचा मॅसेज..

काही वेळा नंतर रमा रिप्लाय देते..

रमा " ओह्ह्ह म्हणजे उद्या चा प्लॅन फिस्कटला... तुला तर लेट च होईल मीटिंग आहे म्हणजे... " रमा चा मॅसेज.

सोनाली " ओके "" सोनाली चा रिप्लाय..

नयना " ओके " नयना चा रिप्लाय...

सोनाली ला तिच्या नवऱ्याचा कॉल येतो..

पण ति ऑफिस मध्ये व्यस्त असल्यामुळे ति कॉल घेऊ शकली नाही... पुन्हा तिच्या नवऱ्याचा म्हणजे अमित चा कॉल येतो...

सोनाली " हॅल्लो... अरे काय किति कॉल करशील.. नाही उचलला म्हणजे कामात असणार माहित आहे ना...!" सोनाली फोन वर अमित वर खुप चिडलेली असते..

अमित " मी ही कामात असतो खाली बसलेला नसतो ना..!" अमित ही उत्तर देतो..

सोनाली " तुझ्या डोक्यावर कुणी भुण भुण करायला नसत... काय काम होत ते बोल... तस ही मला खुप काम आहे...!" सोनाली फोन वर बोलते...

अमित " मी हे सांगायला कॉल केलाय मी ऑफिस कामासाठी बाहेर जातोय...!"

सोनाली " कधी आणि हे कधी ठरलं..? "

अमित " आज..!"

सोनाली " पण उद्या एकच दिवस आपल्याला भेटतो.. आणि त्यात ही तुझ्या ऑफिस च काम आलं...!"

अमित " मी तुझी परवानगी घेत नाही जातो आहे हे सांगायला कॉल केलाय... "

सोनाली " ओके " आणि सोनाली कॉल कट करते.. तिला अमित चा खुप राग आलेला असतो...

पण ति भांडण नको म्हणुन गप्प बसते.. आधीच तिला खुप वर्क लोड असतो कामाचा.. त्यात अमित च हे अस वागणं नि बोलणं...

सोनाली ग्रुप मध्ये मॅसेज टाकते...

सोनाली " उद्या चा काही प्लॅन... गर्ल्स...!""" सोनालीचा मॅसेज..

सगळ्याच कामात असल्या मुळे तिला कोणी रिप्लाय नाही देत...


.... क्रमश...🎭 Series Post

View all