Jan 23, 2022
वैचारिक

झेप सकारात्मकतेकडे - काळाची गरज

Read Later
झेप सकारात्मकतेकडे - काळाची गरज


सकारात्मकता म्हणजे काय? सोप्या अर्थात सांगायचे झाल्यास ज्या विचारापासून आपल्यला आनंद मिळतो, ज्या विचारापासून आपले मन प्रफुल्लित होते. साकारत्मकतेमुळे आपल्या मनाला आणि शरीराला खूप फायदे होतात हे सगळ्यांना कळत असते पण वळत नाही, याचे कारण आहे आपले नकारत्मक विचार. उदाहरणार्थ माझ्याबाबतीत असे का घडते, मी हे करू शकणार नाही, मी आजारी तर पडणार नाही ना, असे अनेक विचार मनामध्ये येत असतात, आपण कितीही मनाला सूचना दिल्या की, नकारात्मक विचार करायचा नाही तरीही आपल्या मनात ते सहज येत असतात आणि मन, नकारात्मक विचारांना आपलेसे करत असते. जरी आपल्याला ते नकोसे वाटत असतील तरीसुद्धा ते आपल्या मनामध्ये थैमान घालत असतात आणि मग निर्माण होते ते नैराश्य आणि सकारत्मक विचार मागे पडतात. यासाठी काही उपाय आहे का?

सगळेजण खूप उपाय सांगतात जसे आपण रोज योगा, व्यायाम केला पाहिजे, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत, सगळ्याविषयी चांगले मत निर्माण केले पाहिजे तर हे अगदी बरोबर आहे. आपल्याला माहित आहे बहुतेक आजारांचे आणि दुःखाचे प्राथमिक कारण म्हणजे नैराश्य. आणि असे नाही कि आपण नैराश्य घालवण्याचा प्रयत्न करत नाही, सगळेच प्रयत्न करत असतात कोणीतरी बाहेर निसर्गाच्या सानिध्यात फिरण्याची योजना बनवतात, कोणीतरी आपल्या आवडीचे खेळ खेळतात, पुस्तके वाचतात आणि सर्व करूनसुद्धा एकूण 5% लोक ते साध्य करू शकतात आणि 95% लोक परत नाकारत्मकतेच्या विचारात अडकतात. सकारात्मकतेचे अनेक व्हिडीओ सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहेत ते आपण पाहतो पण त्याचा परिणाम काही मर्यादित वेळेपर्यंत असतो त्यानंतर परत नकारत्मक विचार..... का आपण इच्छा असूनही साकारत्मकतेकडे वळू शकत नाही तर याचे मूळ कारण म्हणजे मानसिकता. आपण ही मानसिकता साकारत्मतेमध्ये बदलू शकतो का?

नक्कीच... जर आपण आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येण्यापासून थांबवू शकत नाही तर त्या नकारात्मक गोष्टींना सकारत्मक गोष्टींमध्ये परिवर्तित करू, आहे ना साधा सोपा उपाय.

आता विचार कसे परिवर्तित करू शकतो, नकारात्मक विचार तर सहज येत असतात आपण जाणूनबुजून कसे काय बदलू शकतो. तर हा परिवर्तित शब्द आहे "परंतु". हा शब्द जितका नकारात्मकता जागवत असतो त्यापेक्षाही प्रभावशाली आपण याचा साकारात्मकतेसाठी वापर करू शकतो म्हणतात ना काट्याने काटा काढला पाहिजे तर "परंतु" मुळे जर नकारात्मकता वाढत असेल तर त्या उलट हाच शब्द वापरून आपण तेच नकारात्मक विचार सकारात्मक विचारामध्ये परिवर्तित करू शकतो चला थोडी उदारहराने पाहू.
माझ्याबाबतीत असे का घडते परंतु मी निरोगी आहे आणि ही परिस्तिथी मी बदलू शकतो.
मी हे करू शकणार नाही परंतु मी प्रयत्न करेन.
मी आजारी तर पडणार नाही ना परंतु असे काही होणार नाही.
मला हे जमणार नाही परंतु मी प्रयत्न करेन.
मी नापास झालो तर, परंतु पुढच्यावर्षी मी अजून प्रयत्न करणार आणि नक्कीच माझे ध्येय गाठणार
मी कोणाला आवडत नाही , परंतु माझ्या आईबाबांना तर मी खूप आवडतो त्यांच्यासाठी मी आनंदी राहणार आहे.
मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले नाही, परंतु दुसऱ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन नक्की भेटेल तेथे मी माझा आदर्श प्रस्थापित करेन.

अशाप्रकारे तुम्ही कोणत्याही नकारात्मक गोष्टीला परंतु लावून त्याचक्षणी त्याला सकारात्मक बनवा मग आपल्याला जाणवेल कि आपण किती सहजरित्या आपल्या जीवनात आपल्या कटुंबात आपण आनंद आणू शकतो.

आणि ही काळाची गरज आहे कारण नैराश्येतून होणारे परिणाम आपण रोज टीव्ही, वर्तमानपात्रातून वाचताच असतो तर हे बदलण्याची आवश्यकता आहे आणि सकारात्मक विचार हा एकमात्र उपाय आहे असे आपण मानू शकतो. जर सगळेजण सकारात्मक विचार करू लागले तर जीवनातील नैराश्याला आपण निश्चितच हरवू शकतो.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

PraJyotsna

Pharmacist

Independent Girl