फायद्याचा आळशीपणा (भाग-४)

Work smart not hard.

फायद्याचा आळशीपणा (भाग-४)

© प्रतिक्षा माजगावकर 

(मागील भागात आपण गुगल सर्च करण्याची पद्धत पाहिली.... कसा थोडासा इनपुट मध्ये बदल केल्यावर आपला बराच वेळ वाचतो हे पाहिलं... आता पुढे...)
**************************
             जेव्हा आपल्याकडे खूप वेळ असतो आणि आपल्याला काही टाईमपास हवा असेल तेव्हा गुगल वर सुद्धा छान वेळ घालवता येतो... आपण आता बघूया कसं.... 

१. गुगल वर जाऊन सर्च बार मध्ये google gravity असं टाइप करायचं! या नंतर जी सगळ्यात पहिली लिंक असेल ती ओपन केल्यावर तुम्हाला एक गंमत पाहायला मिळेल. ती काही मी सांगणार नाही... तुम्ही स्वतः सर्च करा आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा. 

२. गुगल मध्ये google underwater टाइप करून पहिल्या लिंक वर क्लीक करा आणि पहा काय जादू होतेय.... 

३. एव्हाना आता फ्रेंड्स सिरीज सगळीकडे गाजली आहे.... त्यातल्या कोणत्याही पत्राचं नाव गुगल मध्ये टाका... आणि तिथे उजव्या बाजूला येणाऱ्या गोष्टीवर क्लीक करा आणि पहा काय होतंय.... 

४. गुगल चे थ्री डी animals! हे पाहण्यासाठी कोणत्याही प्राण्यांचं नाव टाइप करा... आणि view इन 3D वर क्लिक करा... यामुळे तुम्हाला ते प्राणी तुमच्या घरात पहायला मिळतील... लहान मुलांना हे फार आवडतं! त्या प्राण्यांबरोबर तुम्ही छान फोटो काढू शकता... पाच मिनिटांनी ते आपोआप गायब होतात... 
उदा. Tiger 3D 
असं टाइप केल्यावर तिथे view in 3D चा पर्याय येतो! 
हो पण हा option सगळ्याच मोबाईल ला support होत नाही... ज्यांचे आताचे लेटेस्ट मोबाईल असतील त्यात हे होईल... 

५. गुगल वर जाऊन google barrel roll असं टाइप करा आणि पहा तुमच्या स्क्रीन ला काय होतंय... 

हे सगळं try करून झाल्यावर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला मजा आली की नाही... आणि हे गुगल चे option कसे वाटले.... आता आपण थोडं youtube बद्दल शिकूया... 

आपण youtube वर खूप व्हिडिओ बघतो... काही टाईमपास करण्यासाठी तर काही नवीन शिकण्यासाठी! पण, गुगल प्रमाणेच जर इथेही तुम्ही काही ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला व्हिडिओ मिळणं एकदम सोपं होऊन जाईल... कसं ते आता आपण पाहूया.... 

१. जेव्हा तुमच्याकडे कमी वेळ असतो आणि तुम्हाला शॉर्ट duration चे व्हिडिओ पहायचे असतात तेव्हा सर्च मध्ये टॉपिक च नाव लिहून स्वल्प विराम (,) देऊन shortअसं लिहिलं की शॉर्ट duration चे व्हिडिओ तुमच्या समोर येतात... 
उदा. समजा तुम्हाला एखाद्या कामावर लक्ष केंद्रित रहाण्यासाठी टिप्स हव्या आहेत आणि वेळ कमी असल्यामुळे शॉर्ट व्हिडिओ हवे आहेत... तर सर्च करताना how to increase focus, short असं लिहायचं! 

२. याच्याच उलट जेव्हा जास्त वेळ असेल आणि पूर्ण डिटेल मध्ये माहिती हवी असेल तर स्वल्प विरामानंतर long लिहायचं! यामुळे फक्त तेच व्हिडिओ तुमच्या समोर येतील जे मोठे आहेत....

३. समजा तुम्हाला एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे व्हिडिओ हवे आहेत तर तुम्ही त्यांचं नाव लिहू शकता... 
उदा. How to increase focus, short, sandeep maheshwari
या मुळे संदीप माहेश्वरी यांचे लहान व्हिडिओ तुमच्या समोर येतील. 

४. समजा तुम्हाला सारखं सारखं टाइप करायला कंटाळा येतोय... तर तुम्ही पूर्ण प्लेलिस्ट काढू शकता.. 
उदा. How to increase focus, playlist 

५. समजा तुम्हाला एखाद्या टॉपिक चे चॅनेल शोधायचे असतील तेव्हा स्वल्प विरामानंतर channel असं लिहायचं... 
उदा. Marathi katha, channel 
या मुळे या टॉपिक शी रिलेटेड सर्व चॅनेल तुमच्या समोर येतील... 

६. आपण गुगल मध्ये जसं वजा (-) चं चिन्ह वापरून नको असलेली माहिती स्किप केली होती तसंच youtube मध्ये सुद्धा करता येतं! 

७. जेव्हा दोन गोष्टींची तुलना करायची असते तेव्हा समोर येणाऱ्या व्हिडिओ मध्ये त्यातल्या एकाच गोष्टी बद्दल माहिती मिळते... हे टाळण्यासाठी सर्च करताना allintital: असं लिहायचं. 
उदा. Allintitle: android vs iphone 
या मुळे youtube तुम्हाला तेच दाखवेल जे तुम्हाला हवं आहे.... 

काय मग कश्या वाटल्या या सगळ्या टिप्स? कमेंट करून नक्की सांगा... 

समाप्त. 
***************************
काय मग कसा वाटला हा फायद्याचा आळशीपणा? फायदा झाला की नाही? तुम्हाला सुद्धा काही टिप्स माहित असतील तर कमेंट मधून नक्की सांगा... आणि हो गुगल वर आज सांगितल्या प्रमाणे सर्च करून नक्की बघा आणि सांगायला विसरू नका तुम्हाला आवडलं की नाही. 

🎭 Series Post

View all