फायद्याचा आळशीपणा (भाग-३)

Work smart not hard.

फायद्याचा आळशीपणा (भाग-३)

© प्रतिक्षा माजगावकर 

(मागील भागात आपण गुगल लेन्स मधले सगळे पर्याय कसे वापरायचे हे पाहिलं... आशा आहे ते तुम्हाला उपयोगी येत असतील... आता पुढे...)
****************************
             आजकाल आपल्याला काही अडलं, की आपण लगेच जातो गुगल बाबांकडे! त्यांच्याकडे तर सगळी उत्तरं एका क्लीक वर मिळतात... काहीवेळा आपल्याला जी माहिती हवी असते ती मिळे पर्यंत गुगल ची खूप पानं पहावी लागतात... पण, यात सुद्धा तुम्ही थोड्या ट्रिक्स वापरून तुम्हाला हवी असलेली माहिती शोधलीत तर तुमचा खूप वेळ वाचू शकतो.... आणि बरोबर तेच पान तुमच्या समोर येईल... तेच आज आपण पाहणार आहोत! 

१. कधी कधी आपण एखादं असं वाक्य वाचतो जे आपल्याला खूप आवडतं! मग ते कोणी लिहिलं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर गुगल वर ते अवतरण चिन्हात (" ") टाकायचं! याचा अर्थ असा की, हे मी जे लिहिलं आहे त्याच क्रमाने शब्द, स्पेलिंग सगळं असलं पाहिजे... याचा उपयोग जॉब शोधण्यासाठी होऊ शकतो. 
उदा. समजा, तुम्ही अकाउंटंट चा जॉब शोधत आहात, तर सर्च करताना job vacancy in mumbai "accountant" तर तुम्हाला तेच दिसणार जिथे अकाउंटंट च्या जागा असतील... म्हणजे आता दहा पानं शोधत बसण्यापेक्षा एकाच ठिकाणी काम होणार. 

२. जेव्हा तुम्ही एखादं आर्टिकल वाचता आणि कधी वाचलं हे लक्षात नसेल आणि तेच पुन्हा वाचायचं असेल तर हा पर्याय! आपण उदाहरणावरून बघूया...
उदा. समजा, तुम्ही लोकसत्ता पेपर मधून करिअर विषयक काही वाचलं आहे तेच तुम्हाला पुन्हा वाचायचं आहे तर गुगल वर तुम्ही site: loksatta career असं टाकलं की लेटेस्ट करिअर च्या बतम्यांपर्यंत घेऊन जाईल... म्हणजे सगळे पेपर चाळत बसावे लागणार नाहीत. 

३. समजा, तुम्ही how to manage time शोधलं तर त्यात मिक्स result येतात... तुम्ही student असाल तर या सर्च मध्ये थोडा बदल करायचा... तो म्हणजे +student असं लिहायचं. म्हणजे तुमचं इनपुट असं असेल; How to manage time +students 
या एका + च्या चिन्हाने फक्त student शी रिलेटेड माहिती तुम्हाला मिळेल. याचा उपयोग तुम्ही जॉब साठी सुद्धा करू शकता... म्हणजे आपण वर पाहिलं तसं केल्यावर जर तुम्ही + email असं लिहिलं तर त्यांचा कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्हाला मिळेल. 

४. कधी कधी असं होतं ना, आपल्याला काही शब्द आठवतात काही आठवत नाहीत ते सुद्धा आपण गुगल मधून शोधू शकतो. जो शब्द आठवत नसेल तिथे तुम्ही स्टार (*) वापरू शकता. याचं इनपुट 
शब्द * शब्द
म्हणजे, आपण गुगल ला असं सांगतोय की, मला हे दोन शब्द आठवतायत मधला शब्द तू तुझ्या हिशोबाने घाल! 

५. माहिती शोधताना कधी तरी आपल्याला नको असलेली माहिती समोर येते मग अश्यावेळी तुम्ही वजा (-) च चिन्ह वापरू शकता. 
उदा. समजा तुम्ही origin of blackberry केलं तर सगळी कडे फळं येतात... पण, तुम्हाला blackberry company विषयी माहिती हवी असेल तर सर्च करताना origin of blackberry -fruit केलं की तुम्हाला सगळी माहिती मोबाईल विषयी मिळेल. 

६. जर तुम्हाला गुगल वरून कोणतं पुस्तक किंवा ppt किंवा excel फाईल डाउनलोड करायची असेल तर हा पर्याय नक्की वापरा. कधी आपण pdf मध्ये पुस्तक डाउनलोड करायचा विचार करतो पण ते नाव टाकल्यावर त्याच्या खरेदी लिंक समोर येतात म्हणून सर्च करताना पुस्तकाचं नाव नंतर अल्पविराम (;) आणि फाईल टाइप लिहायचं म्हणजे आपल्याला हवं तसं ते मिळतं! 
उदा. तुम्हाला श्यामची आई हे पुस्तक pdf स्वरूपात हवं आहे तर इनपुट येणार 
श्यामची आई; file type: pdf 
असंच जर कोणत्या विषयावर च प्रेझेन्टेशन हवं असेल तर ppt, वर्ड फाईल हवी असेल तर docs, एक्सएल फाईल हवी असेल तर xls हे वापरून तुम्ही आयत्या फाईल घेऊ शकता... 

काय मग आवडले का पर्याय? या टिप्स वापरून तुम्ही नक्की गुगल वर सर्च करून बघा. 

क्रमशः..... 
***************************
आजची हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या भागात आपण गुगल वर मस्त मस्त टाईमपास सुद्धा कसा करता येईल हे पाहू आणि youtube च्या सर्च बद्दल सुद्धा माहिती पाहूया. तोपर्यंत शिकत रहा आणि तुमच्या जवळच्या सगळ्यांना सुद्धा हि माहिती शेअर करून मदत करा. 

🎭 Series Post

View all