फायद्याचा आळशीपणा (भाग-१)

Work smart not hard.

फायद्याचा आळशीपणा (भाग-१)

© प्रतिक्षा माजगावकर 

        शीर्षक वाचून गोंधळ झाला असेल ना? आळशीपणा हा फायद्याचा कसा असू शकतो? पण, असं म्हणतात एखाद्या आळशी माणसाला जर कठीण काम दिलं तर तो बाकीच्या लोकांच्या मानाने ते काम अधिक सोपं करून लवकर करतो आणि ते परफेक्ट सुद्धा असतं! मला सांगा का नाही असणार ते परफेक्ट? आधीच जर तो माणूस आळशी असेल तर त्याला चुका करून पुन्हा तेच काम करायला आवडेल का? नाही ना... म्हणूनच तो त्या कठीण कामाला कसं सोपं करायचं याची नवीन पद्धत शोधून ते काम एकदम चोख करतो.... हा म्हणून आता लगेच सगळ्याच बाबतीत आळशी नका होऊ हा... विनोदाचा मुद्दा राहूदे... आता आपण आपल्या मेन मुद्यावर येऊया....
        सध्या रोज आपण तंत्रज्ञानाचा वापर करत असतो! प्रत्येक गोष्टीत आपल्याला त्याची गरज पडतेच! सगळेच जण जास्तीत जास्त करतात ते म्हणजे टायपिंग! आता तुम्ही म्हणाल टायपिंग करताना कसला आळशीपणा करणार? त्याला कुठे एवढा वेळ लागतो... पण, जे शिक्षक आहेत, लेखक आहेत किंवा ऑफिस मधून काही जणांना टाइपिंग ची कामं असतात त्यांच्या साठी हि टीप खूप फायदेशीर ठरू शकते.... जर मी म्हणलं या मुळे तुम्हाला एकही अक्षर टाइप करावं लागणार नाही... तर? विश्वास बसत नाहीये ना..... काही जणांच्या डोक्यात व्हॉइस टायपिंग चा पर्याय आला असेल.... पण, हे त्या पेक्षा वेगळं आहे.... व्हॉइस टायपिंग बद्दल सुद्धा माहिती मिळणार आहे पण, सुरुवात आधी आपल्या खास पद्धतीपासून... तुमच्या पैकी काही जणांना माहित असेल पण बाकीच्यांना नाही....
           आपण एक उदाहरण घेऊया.... समजा एक शिक्षक आहे, त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांनी लिहिलेल्या नोट्स ची वर्ड किंवा पी.डी.एफ. फाईल पाठवायची आहे.... त्यांनी जे लिहिलंय ते थोडक्यात आहे... त्यात काही बदल करायचे आहेत.... मग तसेच्या तसे फोटो पाठवून तर चालणार नाही.... ते व्यवस्थित टाइप करून द्यावं लागेल.... यासाठी हा सोपा उपाय... 
       गुगल लेन्स! हो हे प्ले स्टोअर वर असतं तेच अँप! ज्यांचे आत्ताचे लेटेस्ट मोबाईल आहेत त्यात इनबिल्ड असलेलं गुगल लेन्स! जर तुम्ही हे अँप वापरलं तर तुम्हाला फक्त जे पान टेक्स्ट रुपात हवंय तेवढं फक्त कॅमेरा समोर ठेवायचं आहे आणि काही सेकंदात झालं तुमचं टायपिंग च काम.... सगळ्यांची आता उत्सुकता ताणली गेली असेल ना हे कसं करायचं? सांगते.... 
           सगळ्यात आधी गुगल लेन्स डाउनलोड करून घ्या.... हे अँप वापरताना इंटरनेट सुरु असणं गरजेचं असतं! अँप ओपन केल्यावर तुम्हाला खालच्या बाजूला काही पर्याय दिसतील... त्यातल्या डाव्या हाताला पेपर सारखा एक आयकॉन दिसेल त्या वर क्लिक करा... तो option असेल टेक्स्ट चा! आता तुम्हाला जे टेक्स्ट मध्ये रूपांतरित करायचं असेल त्या पानाला स्कॅन करण्यासाठी आपण फोटो काढायला जसं करतो अगदी तसंच करा... हा फक्त नीट उजेडात हे काम करा...  सगळी अक्षरं दिसतायत ना हे नक्की पहा... नाहीतर जेवढा भाग क्लीअर दिसत असेल तेवढाच टेक्स्ट मध्ये रूपांतरित होईल.... तर मग, सगळं पान स्कॅन झाल्यावर तिथे तुम्हाला option येईल, कॉपी टेक्स्ट ऑन क्लिपबोर्ड आणि सिलेक्ट टेक्स्ट टू कॉपी... तुम्हाला जर सगळं च्या सगळं पान टेक्स्ट मध्ये हवं असेल तर सगळं सिलेक्ट करून कॉपी टेक्स्ट टू क्लीपबॉर्ड करा.... झालं तुमचं काम... मग हे वर्ड किंवा नोट्स मध्ये जाऊन पेस्ट करा... जे बदल करायचे आहेत ते करा आणि पाच ते दहा मिनिटांचे काम दहा ते पंधरा सेकंदात झालं! आवडला की नाही हा आळशीपणा? 
             आता काही जणांना प्रश्न पडला असेल, जर हे आमच्या हस्त लिखित लिपीत होतं तर, हा टेक्स्ट मोबाईल किंवा कॉम्पुटर मध्ये जो फॉन्ट असतो त्या सारखाच दिसणार का? तर उत्तर आहे हो! तुम्ही तुमच्या अक्षरात लिहिलेलं असुदे, कोणत्या छापील पानांचे असुदे... हे सगळ्याला सपोर्ट करतं! काहींच्या मनात आता प्रश्न आला असेल, जर आम्हाला कोणी फोटो पाठवलेला असेल आणि त्याचं टेक्स्ट मध्ये रूपांतर करायचं असेल तर? हे तर अजून सोपं आहे..... गुगल लेन्स च्या टेक्स्ट पर्यायात गेल्यावर तुम्हाला वरच्या बाजूला गॅलरी चा सिम्बॉल दिसेल.... तिथे क्लिक केल्यावर तुम्हाला ज्या फोटो मधल्या लेखनाचं टेक्स्ट मध्ये रूपांतर करू शकता.... काय मग आवडला का हा नवीन पर्याय? 
            आता आपण पाहूया व्हॉइस टाइपिंग बद्दल.... काही वेळेला आपल्या डोक्यात जे असतं ते आपल्याला कागदावर उतरवायचं असतं! इंग्लिश असेल तर ते लगेच होतं... पण, जर देवनागरी लिपीत आपल्याला हवं असेल तर थोडं सेटिंग मध्ये बदल करावे लागतात.... आपल्या की बोर्ड च्या उजव्या बाजूला एक माईक सारखं चिन्ह असतं त्याचा वापर करून व्हॉइस टायपिंग करतात..... त्या माईक वर क्लीक केल्यावर तिथे सेटिंग चा option दिसेल.... तिथे पहिलाच languages असा पर्याय असेल.... तिथे जाऊन default language इंग्लिश अन चेक करून मराठी करा.... आणि त्याच्या खाली ऑफलाईन स्पीच recognition मध्ये हिंदी भारत भाषा डाउनलोड करून ठेवा... आणि झालं तुमचं काम! आता तुम्ही जे मराठीत बोलाल ते देवनागरी लिपीत टाइप होईल.... आता तुम्ही फक्त बोलायचं आणि तुमचा मोबाईल तुमच्यासाठी टाइप करेल.... 

क्रमशः...... 
***************************
आपण या भागात टायपिंग बद्दल शिकलो.... गुगल लेन्स मधले बाकी option आणि अजून काही सोप्या ट्रिक्स पाहूया पुढच्या भागात.... तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.... 

🎭 Series Post

View all