हसणं

हसणं

गोष्ट छोटी डोंगराएवढी.                                       विषय:- चल हसूया आणि हसवूया                                                            शिर्षक:- ​​​​​​हसणं                                                              हसण्याचा विषय आला की पाहिले नाव समोर येते ते म्हणजे "चार्ली चॅप्लिन".. आणि "पु. ल देशपांडे". माणूस आयुष्यात कितीही दु:खी असला तरी इतरासमोर त्याला हसावेच लागते.जर तुम्ही हसाल तर तुम्हाला कळेल तुमचे जीवन खूप अनमोल आहे.खरोखर हसण्यासाठी तुम्हाला तुमचे दुःख विसरून त्याच्याशी खेळता आले पाहिजे.                                                                         "लाफ्टर इज द बेस्ट मेडीसीन ऑफ लाईफ". आयुष्यात बनता आल ,तर कोणाच्या तरी हसण्यामागच कारण बना....कोणाच्या रडण्यामागचे कारण नका बनू. वाटता आला तर सुख वाटत रहा.कारण दिल्याने नेहमीच वाढते..                                                                जेव्हा एखादा लेख , कथा , कविता लिहिली आणि ती  जर ईरा वाचकाना आवडली तर त्यांच्या चेहऱ्यावर एक छोटेसे का होईना स्मितहास्य येते ना....तेव्हा लिहण्याचे सार्थक होते... कारण आपण काय  लिहतो हे त्याच्या मनाला भिडते तेव्हा ते आपसूकच बोलतात की खूप छान  लिखाण करतात सगळे हीच तर पोच पावती असते सर्व लेखकाची. आपण त्याला लाईक कॉमेंट करत नाही तो भाग वेगळा.                                                                      पु.ल. देशपांडे तुम्ही होतात म्हणून जगण्याची हसरी रीत समजली ...तुम्ही होतात म्हणून हसण्यावर प्रेम करता आल... प्रियजन गोळा करता आले आणि त्यांचं हसणं किती महत्त्वाचं आहे ते कळलं....!
                                                                                 कधी कधी वाटते "खरच मी स्वतः आनंदी आहे का?" काही वेळानंतर मला माझा आतला आवाज  मला सांगू लागला, नाही! मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे? आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोलले, पण काहीच मेळ बसत नव्हता.                                                                                  शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे. तो म्हणाला, आपल्या शरीरात 'चार संप्रेरके' असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-
१) एंडॉर्फिन्स.
२) डोपामाईन.
३) सेरोटोनिन.
४) ऑक्सिटोसिन.

आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

                               १)"एंडॉर्फिन्स" :-
आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते. मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण "एंडाॅर्फिन्स" आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात. "हसणे" हा एंडाॅर्फिन्स निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे. आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे "एंडाॅर्फिन्स" निर्मितीसाठी मदत करू शकते.

                               २)"डोपामाईन":-
आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात "डोपामाइन" तयार होत असते. जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात "डोपामाइन" तयार होत असते. यातून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते. आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी औंकरतो तेव्हा सुद्धा "डोपामाइन" तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते.

                                ३)"सेरोटोनिन":-
जेव्हा पण इतरांच्या आनंदासाठी किंवा फायद्यासाठी काही करतो तेव्हा "सेरोटोनिन" तयार होते. जेव्हा आपण स्वार्था पलीकडे जाऊन निसर्गासाठी, समाजासाठी, इतर लोकांसाठी किंवा आप्तेष्टांसाठी काही कृती करतो तेव्हा "सिरोटोनिन" तयार होते. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर अथवा सामाजिक जीवनात इतरांना उपयुक्त अशी माहिती पुरवणे किंवा अशा प्रकारचे लिखाण करणे यामुळे सुद्धा "सिरोटोनिन" तयार होते. हे अशासाठी कारण आपण आपला बहुमूल्य वेळ इतरांना मदत करण्यासाठी खर्च करत असतो.

                                 ४)"ऑक्सिटोसिन":-
हे तेव्हा तयार होते जेव्हा आपण कोणाशीही जवळीक साधतो, आपलेपणाने वागतो. जेव्हा आपण आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला अलिंगन देतो तेव्हा "ऑक्सिटोसिन" तयार होते. मुन्नाभाई सिनेमा मध्ये दाखवलेली जादू की झप्पी खरंच काम करते. तसेच मैत्रीच्या भावनेने हात मिळवणे किंवा खांद्यावर हात ठेवणे यामुळेसुद्धा "ऑक्सिटोसिन" रिलीज होते.
                                             तर मित्रांनो, हे सर्व खूपच सोपे आहे.दररोज व्यायाम करून "एंडॉर्फिंन्स" मिळवा, छोट्या-मोठ्या पण अर्थपूर्ण अशा गोष्टी साध्य करून "डोपामाइन" मिळवा, इतरांना मदत करून सर्वांशी चांगले वागून बोलून "सेरोटोनिन" मिळवा आणि आप्तेष्टांना बिलगून "ऑक्सिटोसिन" मिळवा! 
                                                                                           अशाप्रकारे तुम्ही आनंदी राहायला शिकलात, की तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा आव्हानांना तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाल. आता आपल्याला समजले की उदास दिसणाऱ्या एखाद्या छोटुकल्याला किंवा चिमुरडीला आपण मिठीत घेण्याची गरज असते. 
  आपला आनंद दिवसागणिक वाढवत नेण्यासाठी...
                                                                   १) कोणतातरी खेळ खेळण्याची सवय लावून घ्या आणि खेळाचा आनंद लुटा. -"एंडॉर्फिन्स". 
                                                                     २) आपल्या आजूबाजूच्या लोकांचे छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कौतुक करा. कौतुक करण्याची संधी कधीच दवडू नका. - "डोपामाइन".
                                                                    ३) जे काही चांगले आपल्याकडे आहे ते इतरांनाही मिळावे यासाठी जमेल तितके प्रयत्न करा. - "सेरोटोनिन".
                                                                    ४) जवळच्या माणसांना विना संकोच आलिंगन द्यायला शिका. यातून मिळणारा आनंद हा वाटणाऱ्या संकोचापेक्षा किती तरी पटींनी अधिक असतो.- "ऑक्सिटोसिन".

                                             आनंदी राहा, मस्त जगा! हसा आणि हसवत राहा!                                                                                              ©® ॲड श्रद्धा मगर